agriculture news in marathi, weather, temperature, cold, forecasting | Agrowon

अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 4 जानेवारी 2018

पुणे : अरबी समुद्राजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याचा काहीसा परिणाम राज्यातील किमान तापमानावर होत असून, मध्य महाराष्ट्र, कोकणातील किमान तापमानात चढ-उतार होत आहे. उत्तरेकडून येत असलेल्या वाऱ्यामुळे विदर्भातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत चार अंशांपर्यत घट झाली आहे. बुधवारी (ता. 3) सकाळी आठ वाजेपर्यंत गोंदिया येथे 8.9 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

पुणे : अरबी समुद्राजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याचा काहीसा परिणाम राज्यातील किमान तापमानावर होत असून, मध्य महाराष्ट्र, कोकणातील किमान तापमानात चढ-उतार होत आहे. उत्तरेकडून येत असलेल्या वाऱ्यामुळे विदर्भातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत चार अंशांपर्यत घट झाली आहे. बुधवारी (ता. 3) सकाळी आठ वाजेपर्यंत गोंदिया येथे 8.9 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

सध्या उत्तर भारतातील पंजाबचा दक्षिण भाग, हरियाना आणि उत्तर राजस्थानात थंडीची लाट आहे. त्यामुळे बिहार, उत्तर प्रदेशातील काही भागांतील किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. राजस्थानातील सिकर येथील किमान तापमानाचा पारा शून्य अंशापर्यत खाली आला आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्तरेकडील वाऱ्यांचा जोर वाढल्याने त्यांचा परिणाम होऊन राज्यात थंडीत वाढ झाली होती.

कोकणातील भिरा येथे सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली. मुंबई, रत्नागिरी, भिरा येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन अंशांपर्यंत घट झाली. मध्य महाराष्ट्रातील निफाड येथे 9.6 अंश सेल्सिअस तापमाना नोंदविले गेले. जळगाव येथील किमान तापमानाचा पारा दहा अंशांच्या खाली होता. महाबळेश्वर, मालेगाव, नाशिक, सांगली, सातारा, सोलापूर येथील किमान तापमानाचा पारा दहा अंशांच्यावर होता. मराठवाड्यातील परभणी कृषी विद्यापीठाच्या आवारात 9.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. औरंगाबाद, बीड, परभणी शहर, नांदेड, उस्मानाबाद येथील किमान तापमान दहा अंशांच्या वर होते. विदर्भातील गोंदिया वगळता अकोला, अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ येथील किमान तापमान दहा अंशांच्यावर नोंदविले गेले.

बुधवारी (ता. 3) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअस)
मुंबई (सांताक्रूझ) 16.1 (-1), अलिबाग 17.5, रत्नागिरी 16.3 (-3), भिरा 14.0 (-2), डहाणू 16.9, पुणे 11.2 (1), जळगाव 9.8 (-2), कोल्हापूर 15.3 (1), महाबळेश्वर 13.5 (1), मालेगाव 11.8 (1), नाशिक 10.6 (1), निफाड 9.6, सांगली 13.6 (1), सातारा 12.0 (-1), सोलापूर 14.5 (-1), औरंगाबाद 12.2 (1), बीड 11.0 (-1), परभणी (कृषी विद्यापीठ आवार) 9.5, परभणी शहर 11.4 (-2), नांदेड 13.0 (1), उस्मानाबाद 10.3, अकोला 11.6 (-2), अमरावती 12.4 (-1), बुलडाणा 13.0(-1), चंद्रपूर 10.9 (-2), गोंदिया 8.9 (-4), नागपूर 10.5 (-1), वर्धा 12.7, यवतमाळ 12.4 (-2)

इतर अॅग्रो विशेष
आरोग्यदायी आहार हेच हवे लक्ष्य!पहिले आणि दुसरे महायुद्ध संपले, यामध्ये...
तापलेलं ‘दूध’अनिश्‍चित अशा शेतीला शाश्वत मिळकतीची जोड म्हणून...
खडकवासला, कलमोडी धरण भरलेपुणे  : जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाने...
दुधाचा भडका; सरकारची कोंडी पुणे  : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या...
दुधाचे टँकर बंदोबस्तात मुंबईकडे रवानानाशिक : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या...
कोकण, मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भात...पुणे: कोकण, मध्य महाराष्ट्राला सोमवारी (ता. १६)...
दूध आंदोलनाचे विधिमंडळातही पडसादनागपूर: दुधाला लिटरमागे प्रतिलिटर पाच रुपये...
बाजारपेठ ओळखून केळी बागेचे आदर्श नियोजनकठोरा (ता. जि. जळगाव) येथील पांडुरंग मोहन पाटील व...
एकात्मीक शेतीतून खुल्या झाल्या...आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ जिह्यातील...
दूधदर प्रश्नी विधिमंडळ दणाणले; सभेत...नागपूर : राज्यात सुरु असलेल्या दूध दर आंदोलनाचे...
दूध आंदोलन तापले, बहुतांश जिल्ह्यात...पुणे : शेतकऱ्यांना प्रति लिटर थेट पाच रुपये...
कोल्हापूरात दूध संकलन १०० टक्के बंद ! कोल्हापूर- गायीच्या दूधाला प्रतिलिटर पाच...
आंतरराष्ट्रीय सुबाभूळ परिषदेच्या...पोषण हा पशुपालनातील सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे....
चिंब झाली रान माती...कमी पाऊसमानानंतर उद्भवणारी पाणीटंचाई आणि दुष्काळी...
आंदोलन होणारचकोल्हापूर/ पुणे : अनेक दूध संघ अगोदरच गायीच्या...
काेकण, विदर्भात तुरळक ठिकाणी...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र...
साखर कारखान्यांकडे १२ हजार कोटींची...लखनौ ः उत्तर प्रदेशात २०१७-१८ च्या हंगामात...
संघांकडून दूध दरात तीन रुपयांची वाढपुणे ः दूध दरावर ताेडगा काढण्यासाठी राज्य सरकारने...
पीककर्ज वितरण केवळ ३० टक्केचपुणे : शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपात दिरंगाई...
सेंद्रिय भातशेतीसोबतच राबविली थेट...पुणे जिल्ह्यातील भोयरे (ता. मावळ) येथील रोहिदास...