agriculture news in marathi, weather, temperature, cold, forecasting | Agrowon

राज्यात थंडी वाढली
टीम अॅग्रोवन
सोमवार, 8 जानेवारी 2018

पुणे : उत्तर भारतातील राजस्थान, हरियाना, दिल्ली, उत्तर प्रदेशात सध्या काही भागांत थंडीची लाट आहे. त्याचा परिणाम राज्यातील किमान तापमानावर झाला आहे. राज्यातील काही भागांत थंडी पुन्हा वाढली असून, विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात थंडीची लाट आहे. रविवारी (ता. 7) सकाळी आठ वाजेपर्यंत मध्य महाराष्ट्रातील निफाड येथे 7.0 अशा किमान तापमानाची नोंद झाली, असे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

पुणे : उत्तर भारतातील राजस्थान, हरियाना, दिल्ली, उत्तर प्रदेशात सध्या काही भागांत थंडीची लाट आहे. त्याचा परिणाम राज्यातील किमान तापमानावर झाला आहे. राज्यातील काही भागांत थंडी पुन्हा वाढली असून, विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात थंडीची लाट आहे. रविवारी (ता. 7) सकाळी आठ वाजेपर्यंत मध्य महाराष्ट्रातील निफाड येथे 7.0 अशा किमान तापमानाची नोंद झाली, असे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

लक्षद्वीप आणि अरबी समुद्राजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याचा काहीसा परिणाम राज्यातील किमान तापमानावर होत असून मध्य महाराष्ट्र, कोकणातील किमान तापमानात चढ-उतार होत आहे. कोकणातील काही ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत एक अंशाने घट झाली आहे. रत्नागिरी येथे सरासरीच्या तुलनेत एक अंशाने वाढ झाली आहे. मुंबईतील किमान तापमान सरासरीएवढे होते.

मध्य महाराष्ट्रातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन अंशांपर्यंत घट झाली आहे. नाशिकमध्ये 8.8 अंशांची सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली असून जळगाव, निफाड येथील किमान तापमान दहा अंशांच्या खाली होते. पुणे, कोल्हापूर, महाबळेश्‍वर, मालेगाव, सांगली, सातारा, सोलापूर येथील किमान तापमान दहा अंशांच्या वर होते. मराठवाड्यातील काही भागांत आर्द्रता कमी झाली असून, किमान तापमान कमी अधिक होत आहे. औरंगाबाद, बीड, परभणी शहर, नांदेड, उस्मानाबाद येथील किमान तापमान दहा अंशांच्या वर होते.

विदर्भातील गोंदिया येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत पाच अंशांनी घट होऊन पारा दहा अंशांच्या खाली आला होता. उर्वरित चंद्रपूर, नागपूर, वर्धा येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन अंशांनी घट होऊन किमान तापमान दहा अंशांच्या वर होते. अमरावती, अकोला, यवतमाळ येथील किमान तापमानात किंचित घट झाली होती.

रविवारी (ता. 7) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअस) : मुंबई (सांताक्रूझ) 15.7, अलिबाग 18.0(1), रत्नागिरी 17.9 (-1), भिरा 15.0 (-1), डहाणू 16.4(-1), नगर 12 (1), पुणे 10.9, जळगाव 9.3 (-2), कोल्हापूर 15.3 (1), महाबळेश्वर 13.2, मालेगाव 12.0 (1), नाशिक 8.8 (-1), निफाड 9.6, सांगली 14.5 (1), सातारा 13.4 (1), सोलापूर 14.5 (-1), औरंगाबाद 12.2 (1), बीड 12.0,परभणी (कृषी विद्यापीठ आवार) 9.5, परभणी शहर 12.9 (-1), नांदेड 13.0, उस्मानाबाद 10.1, अकोला 11.9 (-1), अमरावती 12.4 (-1), बुलढाणा 13.6, चंद्रपूर 10.8 (-2), गोंदिया 8.0 (-5), नागपूर 10.2 (-2), वर्धा 10.7(-2), यवतमाळ 13.0 (-1).

 

इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...
ऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...
इथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...
‘ग्लायफोसेट’वर बंदी नाहीपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही...
विदर्भात पावसाची दमदार हजेरीपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प...
बचत गटांतून मिळाली विकासाला उभारीअस्तगाव (ता. राहाता, जि. नगर) हा तसा सधन परिसर....
कांदाचाळीसाठी सव्वाशे कोटींचा निधीनगर  ः एकात्मिक फलोत्पादन विकास...
शेती, आरोग्य अन्‌ शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...
महाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...
देशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर...
देशातील कृषी संशोधन व्यवस्था खिळखिळी...पुणे: केंद्र सरकारने देशातील १०३ पैकी ६१...
मराठवाड्यात ३५ टक्के खरिप पीककर्ज वाटपऔरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीककर्ज वाटप...
सुधारित तंत्राद्वारे केली केळी शेती...ब्राह्मणपुरी (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील...
पाणी अडवले, पाणी जिरवले पाण्याचे संकट...नांदेड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या...
राज्यात पाच कीटकनाशके विक्रीला दोन...अकोलाः राज्यात कीटकनाशक फवारणीद्वारे विषबाधा...
उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात...पुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ चक्रीवादळाने...
अकोला कृषी विद्यापीठात ड्रोनद्वारे...नागपूर ः ड्रोनद्वारे फवारणीचा राज्यातील पहिला...
विदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा पुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
राज्यातील १७ जिल्हे दुष्काळाच्या छायेतमुंबई ः राज्यात मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर अनेक...
प्रयत्नवादातून उभारलेला बेकर्स वेव्ह...वडगाव मावळ तालुक्यातील (जि. पुणे) दिवड येथील...