agriculture news in marathi, weather, temperature, forecast | Agrowon

मराठवाड्यातील किमान तापमानात घट
टीम अॅग्रोवन
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

पुणे : मराठवाड्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली. मंगळवारी (ता.7) सकाळी आठ वाजेपर्यंत उस्मानाबाद येथे 12.4 अंश किमान तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

पुणे : मराठवाड्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली. मंगळवारी (ता.7) सकाळी आठ वाजेपर्यंत उस्मानाबाद येथे 12.4 अंश किमान तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

उत्तरेकडून वारे वाहू लागले असल्याने राज्यातील किमान तापमानात घट होऊ लागली आहे. राज्यातील बहुतांश भागातील किमान तापमान तीन अंशांपर्यंत घटले आहे. त्यातच राज्यात हवामान कोरडे असल्याने थंडी वाढू लागली आहे; परंतु कोकणात किमान तापमान सरासरीएवढेच होते. मध्य महाराष्ट्रातील सोलापूरमधील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत 3.7 अंश सेल्सिअसने घट झाली असून, किमान तापमान 15.0 अंश सेल्सिअस एवढे होते. कमाल तापमानातही किंचित वाढ होऊन 33.6 अंश सेल्सिअस एवढे तापमान होते.

मराठवाड्यातील परभणी येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत सर्वाधिक 3.4 अंश सेल्सिअसने घट होऊन 14.0 अंश सेल्सिअसची नोंद झाली. त्यापाठोपाठ नगरमधील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत 2.7 अंश सेल्सिअसने घट झाली असून, येथे 13.2 अंश सेल्सिअस एवढे किमान तापमान होते; तर मुंबई, नागपूर, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, मालेगाव, भिरा येथील किमान तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढ झाली. पुणे, औरंगाबाद, नाशिक, सोलापूर, नगर, सातारा,
जळगाव, परभणी, अकोला येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत एक अंश सेल्सिअसने घट झाली आहे.

मंगळवारी (ता.7) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
मुंबई 24.4, सांताक्रूझ 23.1, अलिबाग 22.6, रत्नागिरी 23.0, डहाणू 21.7, भिरा 22.7, पुणे 14.8, नगर 13.2, जळगाव 14.2, कोल्हापूर 19.8, महाबळेश्वर 15.7, मालेगाव 15.6, नाशिक 13.2, सांगली 18.1, सातारा 16.0, सोलापूर 15.0, उस्मानाबाद 12.4, औरंगाबाद 14.8, परभणी 14.0, नांदेड 16.0, बीड, अकोला 16.5, अमरावती 18.2, बुलडाणा 16.4, ब्रह्मपुरी 17.2, चंद्रपूर 18.4, गोंदिया 15.0, नागपूर 16.5, वाशीम 15.2, वर्धा 16.7, यवतमाळ 14.8

इतर अॅग्रो विशेष
कोरडवाहू शेतकऱ्यांकडे लक्ष कधी देणार?आज घडीला कोरडवाहू शेतकरी मित्रांना एक विवंचना...
उद्विग्न शेतकरी; उदासीन बॅंकामृग नक्षत्र चार दिवस बरसल्यानंतर पावसाने उघडीप...
सतर्क राहा ! बियाणे खरेदीतील फसवणूक...पुणे : खरिपाची लगबग प्रत्येक शिवारापासून ते...
कृषिक्षेत्रात काॅर्पोरेट गुंतवणुकीसाठी...नवी दिल्ली : भारतातील कृषिक्षेत्रात काॅर्पोरेट...
यवतमाळात दोन दिवसांत ३० कोटींचे पीककर्ज...यवतमाळ : पेरणीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी...
पीककर्ज वाटपात गोंधळचअकोला : शेतकऱ्याला शेतातील कुठलेही काम करणे कठीण...
अल्पभूधारकांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी...केवळ शिक्षण आहे म्हणून व्यवसाय यशस्वी होत नाही,...
खरिपाची पेरणी ९३ लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः देशात यंदा वेळेवर मॉन्सून दाखल...
शेतकऱ्यांच्या जीवनात ‘ॲग्रोवन’चे...सातारा : जीवनमान उंचावण्यास मोठी मदत झाल्याने...
कीटकनाशक कक्षाला कमकुवत ठेवण्यात ‘यश’पुणे : विषबाधा, अप्रमाणित मालाचा पुरवठा यामुळे...
...आता बॅंकेसमोरच जीव द्या लागतेयवतमाळ : कर्जाच्या फायलीसाठीच दहा हजार खर्च झाला...
बचत गटाने दिली शेती, पूरक व्यवसायाला साथचिंचोली काळदात (ता. कर्जत, जि. नगर) गावातील दहा...
फळबागेतून माळरान झाले हिरवेगारमिरज शहरात वकिली करताना चंद्रशेखर शिवाजीराव...
चांगला निर्णय; पण उशिरानेच!बीटीबाबत बोंड अळ्यांमध्ये प्रतिकारक्षमता निर्माण...
प्रवास त्रिशुळी नदीबरोबरचा‘नेपाळ’ हा दक्षिण आशियामधील चीन, भारत आणि...
खाद्यतेलांचे आयात शुल्क वाढविले;...नवी दिल्ली/पुणे : देशातील सोयाबीनसह तेलबिया...
पीककर्जप्रश्‍नी जिल्हाधिकाऱ्यांचा...यवतमाळ/अकोला : राज्यातील शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप...
कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी...पुणे ः कोकण, मध्य महाराष्ट्रात कमी दाबाचे क्षेत्र...
आंबा महोत्सवात १५ कोटींची उलाढालपुणे ः शेतकरी ग्राहक थेट आंबा विक्री...
‘डीबीटी’तून औजारे वगळण्यासाठी 'आयमा'चा...पुणे: डीबीटीतून सुधारित औजारे वगळण्यासाठी...