मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाला थंडीने हुडहुडी

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाला थंडीने हुडहुडी
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाला थंडीने हुडहुडी

पुणे : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात घट होत असल्याने थंडीने चांगलीच हुडहुडी भरविली आहे. कोकणातील काही भागांतही थंडीला प्रारंभ झाला आहे. बुधवारी (ता.8) सकाळी आठ वाजेपर्यंत उस्मानाबाद येथे 12.0 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंद झाल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

कोकण व मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत हवामान ढगाळ असल्याने थंडीत चढउतार होत आहे. मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे असल्याने थंडी हळूहूळू वाढू लागली आहे. सध्या राज्यातील बहुतांशी भागात सायंकाळी हवेत गारवा तयार होत आहे. त्यामुळे रात्रीचा किमान तापमानाचा पारा खाली उतरत आहे. परंतु, पहाटे चांगलाच गारवा तयार होत असल्याने काही ठिकाणी धुक्‍याची स्थिती तयार होत असून गुलाबी थंडीने नागरिकांना हुडहुडी भरीत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक गरम ऊब मिळविण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून थंड पडलेल्या शेकोट्या पेटू लागल्या आहेत.

सध्या राज्यातील बहुतांशी भागात किमान तापमान तीन अंशांपर्यंत घटले आहे. त्यातच राज्यात हवामान कोरडे असल्याने थंडी वाढू लागली आहे. कोकणात काही भागात किमान तापमान सरासरीएवढेच होते. तर रत्नगिरी, भिरा येथील किमान तापमानात घट झाली होती. मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, नगरमधील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत 3.0 अंश सेल्सिअसने घट झाली. तर सातारा, नाशिक, जळगाव, पुणे येथील किमान तापमानात एक, दोन अंश सेल्सिअसने घट झाली आहे.

मराठवाड्यातील परभणी येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत सर्वाधिक 2.0 अंश सेल्सिअसने घट होऊन 15.0 अंश सेल्सिअसची नोंद झाली. औरंगाबाद, नांदेड, बीड, उस्मानाबाद येथील किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. विदर्भातील गोंदिया, यवतमाळ येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत 3.0 अंश सेल्सिअसने घट झाली. तर गोंदियामध्ये 14.5, यवतमाळमध्ये 15.0 अंश सेल्सिअस एवढे किमान तापमान होते. अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, नागपूर, वाशीम येथील किमान तापमानात किंचित घट झाली.

बुधवारी (ता. 8) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान, कंसात झालेली घट (अंश सेल्सिअसमध्ये) मुंबई 24.4, सांताक्रुझ 22.4, अलिबाग 12.3, रत्नागिरी 21.3 (-1), डहाणू 22.1, भिरा 19.0 (-1), पुणे 13.8 (-1), नगर 13.0 (-3), जळगाव 15.0 (-1), कोल्हापूर 18.3, महाबळेश्वर 15.3, मालेगाव 15.8, नाशिक 12.4 (-2), सांगली 17.1, सातारा 15.3 (-2), सोलापूर 15.3 (-3), औरंगाबाद 15.4, परभणी 15.0 (-2), नांदेड 17.0, बीड, उस्मानाबाद 12.0, अकोला 16.9 (-1), अमरावती 18.2, बुलढाणा 17.3, चंद्रपूर 18.8, गोंदिया 14.5 (-3), नागपूर 16.3, वाशीम 15.2, वर्धा 16.1 (-2), यवतमाळ 15.0 (-3)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com