agriculture news in marathi, weather, temperature, forecast | Agrowon

परभणीचा पारा ५.६ अंशांवर !
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 29 डिसेंबर 2017

पुणे : विदर्भासह मराठवाड्यात थंडीची लाट आली असून किमान तापमानाचा पारा घसरला आहे. गुरुवारी (ता.28) सकाळी आठ वाजेपर्यंत मराठवाड्यातील परभणी येथे ५.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली, असे वनामकृवितील हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

पुणे : विदर्भासह मराठवाड्यात थंडीची लाट आली असून किमान तापमानाचा पारा घसरला आहे. गुरुवारी (ता.28) सकाळी आठ वाजेपर्यंत मराठवाड्यातील परभणी येथे ५.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली, असे वनामकृवितील हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

उत्तर भारतातील हरियाना, चंडिगढ, दिल्ली, पंजाब, उत्तर पंजाब, उत्तर राजस्थान, कच्छ, मध्य प्रदेशचा पश्‍चिम भागात थंडीची लाट आहे. त्याचा काहिसा परिणाम राज्यातील किमान तापमानावर झाला आहे. त्यामुळे विदर्भापाठोपाठ, मराठवाड्यातील आणि मध्य महाराष्ट्रातील किमान तापमानात घट झाली आहे. सध्या वारेही उत्तरेकडून वाहत आहे. त्यामुळे थंडीने चांगलाच जम बसविला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन ते पाच अंशांपर्यंत घट झाली आहे. मध्य महाराष्ट्र, कोकणातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत एक ते तीन अंशाने घट झाली आहे.

कोकणातील मुंबई, रत्नागिरी, डहाणू, भिरा येथील किमान तापमानात घट झाली. अलिबाग येथील किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, जळगाव, नाशिक येथील किमान तापमानाचा पारा दहा अंशांच्या खाली उतरला असून कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन अंशांपर्यंत घट झाली आहे. महाबळेश्वर, मालेगाव येथील किमान तापमान सरासरीएवढे होते. मराठवाड्यातील औरंगाबाद, उस्मानाबाद, येथील किमान तापमान सरासरीएवढे होते. परभणी येथे 8.7 अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमान नोंदविले गेले. त्यापाठोपाठ उस्मानाबादमध्ये 8.7 अंश सेल्सिअस तापमान होते. विदर्भातील गोंदिया, नागपूर, अकोला येथील किमान तापमानाचा पारा दहा अंशाच्या खाली होता. अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन ते पाच अंशाने घटले होते.

गुरुवारी (ता.28) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअस)
मुंबई (सांताक्रुझ) 16.0 (-1), अलिबाग 17.4, रत्नागिरी 16.9 (-3), डहाणू 16.5 (-1), भिरा 16.0 (-1), पुणे 9.4 (-1), जळगाव 8.6 (-3), कोल्हापूर 14.3 (-1), महाबळेश्वर 13.0, मालेगाव 10.5, नाशिक 8.6 (-1), सांगली 12.6 (-1), सातारा 10.5 (-3), सोलापूर 11.9(-3), औरंगाबाद 10.4, परभणी 8.4 (-5), नांदेड 10.0 (-2), उस्मानाबाद 8.7, अकोला 9.6 (-4), अमरावती 12.8(-1), बुलढाणा 13.0(-1), चंद्रपूर 10.6 (-3),
गोंदिया 7.6 (-5), नागपूर 8.4 (-4), वर्धा 10.4 (-2), यवतमाळ 12.0 (-2)

इतर अॅग्रो विशेष
अकोला जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांना देणार...अकोला ः देशात राबवल्या जात असलेल्या प्रधानमंत्री...
दक्षिण महाराष्ट्रातील कारखान्यांत ८०...सांगली/कोल्हापूर ः साखरेला दर नसल्याने निराश...
सीताफळाच्या योग्य जातींची करा लागवडमहाराष्ट्रात सीताफळाच्या झाडांचे काही नैसर्गिक...
उत्पादकांसाठी बेदाणा गोडसांगली ः यंदाच्या बेदाणा हंगामात बेदाण्याच्या...
केळी दरात किंचित सुधारणाजळगाव ः रावेर, यावलमध्ये केळीची आवक वाढलेली...
मका चार वर्षांतील नीचांकी पातळीवरनवी दिल्ली ः बजारात मका आवक वाढल्यांतर मागणी कमी...
कामाच्या अतिरिक्त ताणामुळे पणन संचालक...पुणे ः पणन संचालकपदी पूर्णवेळ नियुक्ती असताना...
​​राज्य सरकार राबविणार मधुमक्षिका मित्र...पुणे : शहरी भागात मधुमक्षिकांचे पोळे दिसले, की ते...
ग्रामस्वच्छता अभियानात प्रभाग, गटातून...नगर ः ग्रामीण भागात स्वच्छतेची व्यापी...
केसर आंबा पाडाला आलाय...औरंगाबाद : आपली चव, गंध आणि रूपाने ग्राहकांना...
बदल्या समुपदेशनानेच...पुणे : राज्याच्या कृषी विभागात समुपदेशनाने बदल्या...
अरबी समुद्रात चक्रीवादळाचे संकेतपुणे : ‘सागर’ चक्रीवादळापाठोपाठ अरबी समुद्रात...
पाणलोट, मृदसंधारण घोटाळ्याचा पर्दाफाशपुणे : कृषी खात्यातील पाणलोट व मृदसंधारण...
ब्राझील, थायलंडचा यंदा इथेनॉलकडे वाढता...कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वत्रच...
बारमाही भाजीपाला शेतीला नर्सरी...ब्राह्मणगाव (जि. नाशिक) येथील केवळ वाघ पूर्वी...
सुधारित तंत्राची मिळाली गुरुकिल्लीअकोला जिल्ह्याचे मुख्य उन्हाळी पीक कांद्याची...
भाराभर चिंध्या राज्यात १२७ वा पशुसंवर्धन दिन नुकताच साजरा...
मथुरेचं दूध का नासलं?राज्यात मे महिन्याचे तापमान यंदा नैसर्गिक आणि...
चिमुरड्याच्या कॅमेऱ्यात कैद आनंदी शेतकरीआपल्याकडील शेतकरी आनंदी असू शकतो का? उत्तर...
‘अ’तंत्र निकेतनपुरेसा अभ्यास आणि तयारीअभावी, यंत्रणेचा विरोध...