agriculture news in marathi, weather, temperature, forecast | Agrowon

गोंदिया 7.6 अंशावर
टीम अॅग्रोवन
सोमवार, 1 जानेवारी 2018

पुणे : गेल्या काही दिवसांपासून थंडीत वाढ झाली आहे. रविवारी (ता. 31) सकाळी आठ वाजेपर्यत विदर्भातील गोंदिया येथे 7.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, असे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

पुणे : गेल्या काही दिवसांपासून थंडीत वाढ झाली आहे. रविवारी (ता. 31) सकाळी आठ वाजेपर्यत विदर्भातील गोंदिया येथे 7.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, असे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

यंदा झालेल्या चांगल्या पावसामुळे जमिनीत ओलावा टिकून आहे. त्यामुळे थंडीत सायंकाळपासून हवेत गारवा तयार होत आहे. त्यातच उत्तरेकडून वाहत असलेले थंड वारे व राज्यातील कोरडे हवामान यामुळे थंडीत चांगलीच वाढ झाली आहे. रात्रीपासून थंडी हुडहुडी भरीत असून पहाटे चांगलाच थंड गारवा तयार होत असून किमान तापमानाचा पारा अधिकच खाली उतरत आहे. हा थंड गारवा नागरिकांच्या अंगाला झोंबत असला, तरी तो सुखद दिलासा देऊन सकाळी जात आहे.

नववर्षाच्या स्वागताच्या मुहर्तावर मुंबई, रत्नागिरी, भिरा येथील थंडीचा पारा सरासरीच्या तुलनेत एक ते तीन अंशाने घटला आहे. अलिबाग येथील किमान तामपानाचा पारा सरासरीएवढा होता. त्यामुळे कोकणातही थंडी दिलासदायक असली, तरी ही थंडी आंबा पिकाला पोषक आहे. मध्य महाराष्ट्रातील निफाड येथे सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. येथे 8.0 अंश सेल्सिअसची तापमान नोंदविले गेले. त्यापाठोपाठा पुणे, नाशिक येथील पाराही दहा अंशाच्या खाली होती. तर जळगाव, कोल्हापूर, महाबळेश्वर, मालेगाव, सांगली, सातारा, सोलापूर येथील किमान तापमानाचा पारा दहा अंशाच्या वर होता.

मराठवाड्यातील परभणीतील कृषी विद्यापीठातील आवारात 8.2 अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली. उस्मानाबादमध्ये 9.1 अंश सेल्सिअस तापमान होते. परभणी, नांदेडमधील किमान तापमान सरासरीच्या तुलनेत दोन ते तीन अंश सेल्सिअसने घटले. विदर्भातील अकोला, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन ते पाच अशांनी घटले असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

रविवारी (ता. 31) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअस)
मुंबई (सांताक्रूझ) 16.3 (-1), अलिबाग 17.4, रत्नागिरी 16.8 (-3), डहाणू 17.8, भिरा 14.0 (-3), पुणे 9.9 (-1), जळगाव 10.2 (-1), कोल्हापूर 15.0, महाबळेश्वर 13.6, मालेगाव 11.8 (1), नाशिक 9.2 (-1), निफाड 8.0, सांगली 12.6 (-1), सातारा 11.0 (-2), सोलापूर 12.6(-3), औरंगाबाद 10.8, ,परभणी (कृषी विद्यापीठ आवार) 8.2, परभणी शहर 10.6 (-3), नांदेड 12.0 (-2), उस्मानाबाद 9.1, अकोला 11.3 (-2), अमरावती 13.4(-1), बुलढाणा 14.2, चंद्रपूर 10.6 (-3), गोंदिया 7.6 (-5), नागपूर 9.9 (-3), वर्धा 10.5 (-2), यवतमाळ 12.4 (-2)

इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्याच्या तहानेवर इस्रायली उपाय!७००-८०० मि.मी पाऊस पडणाऱ्या मराठवाड्यात...
जगणे सुसह्य करण्यासाठी जागे व्हाअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन शेती,...
‘महामेष’ योजना ३४ जिल्ह्यांत राबविणार...औरंगाबाद : राजे यशवंतराव होळकर महामेष योजना...
शेतीतील यांत्रिकीकरणासाठी हवे शासनाचे...अकोला ः अाजच्या बदलत्या काळात शेती पद्धतीत...
मध्य प्रदेशात गारपीटग्रस्तांना हेक्टरी...नवी दिल्ली ः मध्य प्रदेश राज्यात नुकत्याच...
गारपीटग्रस्तांना भरीव मदतीचा प्रस्ताव...नागपूर ः गारपीटग्रस्तांना सरकारकडून जाहीर करण्यात...
शेतकरी कंपन्यांच्या धान्य खरेदीबाबत...पुणे : हमीभावाने धान्य खरेदीत शेतकरी उत्पादक...
महसूल मंडळातील सरासरी उत्पादकतेनुसार...परभणी : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन...
गारपीटग्रस्त क्षेत्र तीन लाख हेक्टरमुंबई : राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या...
राजधानी दिल्लीत शेती क्षेत्रावर आज...नवी दिल्ली : देशाला नवे कृषी धोरण देण्यासाठी...
‘कापूस ते कापड’पासून आता ‘पिकणे ते...नाशिक : राज्यातील कापसावर प्रक्रिया होऊन...
उन्हाचा चटका जाणवू लागलापुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रवाह कमी होऊ...
बचत, व्यवसायातून मिळवली आर्थिक सक्षमता गोऱ्हे बु. (ता. हवेली, जि. पुणे) गावामधील...
एकट्या मराठवाड्यातच २ लाख हेक्टरचे...औरंगाबाद : मराठवाड्यात ११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान...
विश्वासघाताची किंमत मोजावी लागेल ः अजित...नगर : फेकूगिरी, दिशाभूल, फसव्या घोषणा, महागाईचा...
राज्यातील पाच हजार सोसायट्यांचे...खामगाव, जि. बुलडाणा : राज्यात आगामी काळात ५०००...
पुढील चार दिवस हवामान कोरडे राहणारपुणे : राज्यावरील ढगाळ हवामानाचे सावट दूर...
विश्वासघाताची किंमत मोजावी लागेल ः पवारनगर : फेकूगिरी, दिशाभूल, फसव्या घोषणा,...
शेतकरी आत्महत्या हे बाजारकेंद्रित...सयाजीराव गायकवाड साहित्यनगरी (बडोदा, गुजरात) :...
व्यवसायाचे तंत्र शेतीच्या नियोजनात ठरले...नाशिक येथील फॅब्रिकेशनचा व्यवसाय सांभाळून नरेंद्र...