agriculture news in marathi, weather, temperature, forecast | Agrowon

पहाटेच्या हवेतील गारवा वाढला
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 2 जानेवारी 2018

पुणे : पहाटे हवेत गारवा वाढत असल्याने किमान तापमानात घट होत आहे. विदर्भापाठोपाठ आता मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात थंडी वाढली आहे. सोमवारी (ता.1) सकाळी आठ वाजेपर्यत मध्य महाराष्ट्रातील निफाड आणि मराठवाड्यातील परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या आवारात थंडीची 7.6 अंश सेल्सिअसची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

पुणे : पहाटे हवेत गारवा वाढत असल्याने किमान तापमानात घट होत आहे. विदर्भापाठोपाठ आता मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात थंडी वाढली आहे. सोमवारी (ता.1) सकाळी आठ वाजेपर्यत मध्य महाराष्ट्रातील निफाड आणि मराठवाड्यातील परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या आवारात थंडीची 7.6 अंश सेल्सिअसची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

सध्या उत्तर भारतातील पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हिमालय, पश्‍चिम बंगाल व सिक्कीमच्या काही भागांत थंडीची लाट आहे. हरियानातील हिस्सार येथे 1.6 अंश सेल्सिअसची देशातील सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. उर्वरित भागातही किमान तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. उत्तरेतील थंडीच्या लाटेचा परिणाम राज्यातील किमान तापमानावर होत असून थंडीचा पारा घसरत आहे.

लक्षद्वीप ते दक्षिण महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्र या दरम्यान कमी दाबाचा पट्टा आहे. त्यामुळे मध्य व मराठवाड्यातील किमान तापमानात काही प्रमाणात चढउतार होत आहे. पुणे परिसरात येत्या शुक्रवार (ता.5) पर्यत आकाश अंशत ढगाळ राहण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे पुणे, नगर, सोलापूर, सातारा भागातील किमान तापमानात चढउतार सुरू राहतील. शनिवारपासून पुन्हा हवामान कोरडे राहील. उर्वरित भागात हवामान कोरडे राहणार आहे. त्यामुळे थंडीचा पारा पुन्हा वाढण्याची शक्‍यता आहे. कोकण, गोवा व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित
भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.

सोमवारी (ता.1) सकाळी आठ वाजेपर्यतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअस)
मुंबई (सांताक्रूझ) 15.5 (-2), अलिबाग 17.2, रत्नागिरी 16.8 (-3), डहाणू 16.4 (-1), पुणे 10.6, जळगाव 10.6 (-1), कोल्हापूर 14.7, महाबळेश्वर 13.0, मालेगाव 12.0 (2), नाशिक 9.4, निफाड 7.6, सांगली 12.3 (-1), सातारा 11.2 (-1), सोलापूर 12.6(-3), औरंगाबाद 12.6 (2), परभणी (कृषी विद्यापीठ आवार) 7.6, नांदेड 12.0, उस्मानाबाद 9.3, अकोला 12.7 (-2), अमरावती 13.4 (-1), बुलडाणा 14.0, चंद्रपूर 10.7 (-3), गोंदिया 8.4 (-5), नागपूर 10.6 (-3), वाशिम 11.2, वर्धा 11.9 (-2), यवतमाळ 13.4 (-2)

इतर अॅग्रो विशेष
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...