agriculture news in marathi, weather, temperature, forecasting | Agrowon

थंडी पुन्हा परतण्याची चिन्हे
टीम अॅग्रोवन
सोमवार, 11 डिसेंबर 2017

पुणे : गेल्या दहा ते बारा दिवसांपासून गायब झालेली थंडी पुन्हा परतण्याची चिन्हे आहेत. सध्या राज्यातील बहुतांशी भागात हवामान कोरडे आहे. रविवारी (ता. 10) नागपूर येथे 10.5 अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

पुणे : गेल्या दहा ते बारा दिवसांपासून गायब झालेली थंडी पुन्हा परतण्याची चिन्हे आहेत. सध्या राज्यातील बहुतांशी भागात हवामान कोरडे आहे. रविवारी (ता. 10) नागपूर येथे 10.5 अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

उत्तर भारतातील जम्मू आणि काश्‍मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाना आणि चंडीगड या राज्यांतील काही भागात चक्राकार वाऱ्याच्या स्थितीमुळे मध्यम ते जोरदार पाऊस पडत. त्याचा विदर्भातील काही भागावर काहिसा परिणाम होणार असून, वातावरणात काही प्रमाणात बदल होण्याची शक्‍यता आहे. तसेच बंगालच्या उपसागरात असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाली असून, ते पश्‍चिम बंगालच्या दिशेने सरकून विरले आहे. त्यामुळे ओडिशा, आसाम, मेघालय, मिझोराम, पश्‍चिम बंगाल या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे.

सध्या वारे दक्षिणेकडून वाहत आहे. त्यातच जमिनीत ओलावा असून, उष्ण वातावरणामुळे राज्यातील अनेक भागांत सकाळी धुक्‍याची चादर तयार होत आहे. त्याचा पिकांवर काहिसा परिणाम होणार असला तरी हे धुके नागरिकांना थंडीच्या सकाळी सुखद दिलासा देऊन जात आहे.

विदर्भातील काही भागांत सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात उल्लेखनीय वाढ झाली आहे. कोकण आणि मराठवाड्याच्या काही भागात लक्षणीय वाढ झाली आहे. विदर्भाच्या उर्वरित भागात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली आहे. उर्वरित भागात किमान तापमान सरासरीएवढे होते. पुणे परिसरातही दोन ते तीन दिवस हवामान अंशतः ढगाळ राहणार असून त्यानंतर कोरडे राहण्याचा अंदाज आहे.

विदर्भातील नागपूर येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन अंशाने घट झाली आहे. त्यापाठोपाठ वर्धा येथे दोन अंशांनी घट झाली आहे. नागपूरनंतर वर्ध्यामध्ये 11.9 अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली आहे. खानदेशातील जळगाव, मालेगाव येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत सहा अंशांनी वाढ झाली आहे.

रविवारी (ता. 10) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअसमध्ये)
मुंबई (सांताक्रूझ) 21.2 (2), अलिबाग 22.4 (3), रत्नागिरी 22.0 (2), डहाणू 21.8 (3), भिरा 20.0 (2), पुणे 16.0 (5), जळगाव 18.2 (6), कोल्हापूर 18.1 (3), महाबळेश्वर 15.4 (2), मालेगाव 17.4 (6), नाशिक 15.4 (5), सांगली 17.0 (3), सातारा 17.0 (3), सोलापूर 15.6, औरंगाबाद 16.0 (5), परभणी 17.1 (3), नांदेड 16.0 (3) अकोला 15.8 (2), अमरावती 14.8, बुलडाणा 17.2 (2), चंद्रपूर 14.6 (1), गोंदिया 13.2, नागपूर 10.5 (-3), वर्धा 11.9 (-2), यवतमाळ 15.0

इतर अॅग्रो विशेष
राज्यात महायुतीची त्सुनामी...मुंबई  ः सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत देशभर...
चंदन लागवडचंदन मध्यम उंच आणि परोपजीवी प्रजाती आहे....
हुमणीच्या प्रौढ भुंगे­ऱ्यांचा सामुदायिक...गेल्या काही वर्षांत राज्यामध्ये हुमणी अळीचा...
संरक्षित शेतीतून आर्वीतील शेतकऱ्यांची...वाढती पाणीटंचाई आणि  बदलत्या हवामानामुळे...
उन्हाचा चटका ‘ताप’दायकपुणे : सूर्य चांगलाच तळपल्याने उन्हाचा चटका...
राजू शेट्टींच्या पराभवाने शेतकरी...कोल्हापूर ः शेतीविषयक विविध प्रश्‍नांबाबत देश...
मोदीच आजच्या महाविजयाचे महानायक : अमित...नवी दिल्ली : देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या...
पुन्हा मोदी लाट, काँग्रेस भुईसपाट नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...
ये नया हिंदुस्थान है' : पंतप्रधानआज देशातील नागरिकांनी आम्हाला कौल दिला. मी...
जलदारिद्र्य निर्देशांकातही आपली पिछाडीचएखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेचे मूल्यमापन करणार...
पांढऱ्या सोन्याची काळी कहाणीजागतिक पातळीवर कापसाखाली असलेल्या क्षेत्राच्या एक...
...आवाज कुणाचा? लोकसभा २०१९चा आज निकालनवी दिल्ली : संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या...
कृषी विद्यापीठांना नकोय शिक्षण परिषदेचे...नागपूर : भारतीय कृषी संशोधन परिषदेने तयार...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : उन्हाचा चटका वाढल्याने राज्यातील...
राज्यात कृत्रिम पावसाची तयारी सुरूमुंबई : राज्यातील यंदाच्या भीषण दुष्काळाची...
जमिनीच्या आरोग्य कार्डाची उपयुक्तताभारतातील प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या जमिनीचे...
संत्रा झाडे वाळण्याची कारणे जाणून करा...विविध संत्रा बागांमध्ये उन्हाळ्यात आणि पावसाळा...
सोलापूर : ओसाड रानं अन्‌ जनावरांची पोटं...सोलापूर ः टॅंकरच्या पाण्यासाठी गावोगावी...
कान्हूरपठार, करंदी परिसरात वादळी वा-...टाकळी ढोकेश्वर, जि. नगर  ः पारनेर...
वर्धा : रोजगारासाठी स्थलांतरामुळे गावं...वर्धा : शेतीपूरक दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून...