agriculture news in marathi, weather, temperature, forecasting | Agrowon

मध्य महाराष्ट्र, कोकणात धुके
टीम अॅग्रोवन
बुधवार, 13 डिसेंबर 2017

पुणे : मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक भागांत मंगळवारी (ता. 12) पहाटेपासून धुके होते. काही भागांत थंडी वाढत आहे. तसेच मध्य महाराष्ट्रात काही भागांत कमी दाबाचा पट्टा असून, ढगाळ हवामान आहे. त्यामुळे किमान तापमानात वाढ झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

पुणे : मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक भागांत मंगळवारी (ता. 12) पहाटेपासून धुके होते. काही भागांत थंडी वाढत आहे. तसेच मध्य महाराष्ट्रात काही भागांत कमी दाबाचा पट्टा असून, ढगाळ हवामान आहे. त्यामुळे किमान तापमानात वाढ झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत जमिनीत ओलावा आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि कोकणातील मुंबईतील परिसरातील अनेक भागांत धुक्‍याची छाया आहे. त्यामुळे जमिनीत ओलावा टिकून राहत असला, तरी काही वेळा त्याचा परिणाम पिकांवर होतो. विदर्भातील काही भागांत किमान तापमानात घट झाली आहे. मंगळवारी (ता. 12) सकाळी आठ वाजेपर्यंत गोंदिया येथे 10.8 अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली.

विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली. उर्वरित भागात किंचित वाढ झाली. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. कोकण, गोव्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. पुणे परिसरातही आकाश अंशत ढगाळ राहण्याची शक्‍यता आहे.

मंगळवारी (ता.12) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअस)
मुंबई (सांताक्रूझ) 18.5 (2), अलिबाग 19.6 (1), रत्नागिरी 18. 9 (-2), डहाणू 19.5 (9), भिरा 20.0 (2), नगर 15.6 (3), पुणे 14.4 (3), जळगाव 16.3 (5), कोल्हापूर 17.5 (2), महाबळेश्वर 14.6 (1), मालेगाव 15.6 (5), नाशिक 13.2 (3), सांगली 17.2 (3), सातारा 14.4 (-1), सोलापूर 13.8(-2), औरंगाबाद 16.5 (6), बीड 16.6 (5),परभणी 15.1 (4), उस्मानाबाद 11.4, अकोला 15.5 (2), अमरावती 14.0(-1), बुलडाणा 18.0 (3), चंद्रपूर 14.2, गोंदिया 10.8 (-1), नागपूर 11.5 (-1), वर्धा 12.5 (-1), यवतमाळ 14.0 (-1)

 

इतर अॅग्रो विशेष
पैशाकडेच जातोय पैसाभारतातील काही उद्योगपतींची संपत्ती एका वर्षात...
वाढवूया मातीचा कससंयुक्त राष्ट्रसंघाच्या २०११ च्या अन्न व कृषी...
जमीन आरोग्यपत्रिकेच्या गुणात्मक कामाकडे...पुणे  : राज्यात शेतकऱ्यांना जमीन...
'शुगरकेन हार्वेस्टर'ला अनुदान देण्यास...पुणे  : राज्यात ऊसतोडणीसाठी वापरल्या...
भरपाईबाबत समित्यांचे निष्कर्ष बियाणे...पुणे : राज्यात गुलाबी बोंड अळीमुळे नुकसान...
कापूस पिकासाठी यवतमाळ जिल्हा पोषक नाहीनागपूर : यवतमाळ जिल्ह्यात उथळ ते मध्यम खोल जमिनी...
साडेचार लाख टन तुरीची महाराष्ट्रात...मुंबई  ः महाराष्ट्र हे देशात महत्त्वाचे तूर...
उस्मानाबाद ९.४ अंशांवरपुणे ः उत्तरेकडून थंड वारे कमी-अधिक प्रमाणात वाहत...
कृषीचा पतपुरवठा यंदा वाढण्याचे संकेतनवी दिल्ली ः देशातील शेतीसमोरील प्रश्न दिवसेंदिवस...
सीआयबीआरसी, कृषी, आरोग्य विभागावर...अमरावती ः विषबाधाप्रकरणी राज्य सरकारने नेमलेल्या...
खारपाणपट्ट्यात पेरू, लिलीसह बहुपीक शेतीखारपाणपट्ट्यात प्रयोगशील शेती करणे जिकिरीचे,...
वाया जाणारा भाजीपाला, शेणापासून...भाजीपाला व जनावरे बाजार यांच्यासाठी सातारा...
कोरडवाहू शेतजमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाची...सोलापूर ः महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत...
बीजी - ३ चे घोडे अडले कुठे?आगामी हंगाम धोक्‍याचा सन २०१७ च्या खरीप हंगामात...
आव्हान पाणी मुरविण्याचेठिबक सिंचन अनुदानासाठी यावर्षी विक्रमी निधी...
भारतातील १ टक्का श्रीमंतांकडे ७३ टक्के...दावोस  ः गेल्या वर्षभरात देशात निर्माण...
किमान तापमानात घट; नगर ९.४ अंशांवरपुणे ः विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात...
नागपुरात तुरीच्या दरात घसरणनागपूर : येथील कळमणा बाजारात आठवड्याच्या...
देशात खालावत आहे जमिनीचे आरोग्यनागपूर : खोल मशागत, नियंत्रित खत व्यवस्थापनाला...
बोंड अळी भरपाईसाठी सुनावणी आजपासूनपुणे : राज्यात शेंदरी बोंड अळीमुळे...