agriculture news in marathi, weather, temperature, forecasting | Agrowon

महाराष्ट्रात हुडहुडी वाढणार
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 14 डिसेंबर 2017

पुणे : मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत कमी दाबाचा पट्टा आहे. त्यामुळे राज्यातील किमान तापमानात चढ-उतार सुरू आहे. एक-दोन दिवसांत कमी दाबाचा पट्टा जाऊन पुन्हा थंडी वाढणार आहे. बुधवारी (ता. १३) सकाळी आठ वाजेपर्यंत गोंदिया येथे १०.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

पुणे : मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत कमी दाबाचा पट्टा आहे. त्यामुळे राज्यातील किमान तापमानात चढ-उतार सुरू आहे. एक-दोन दिवसांत कमी दाबाचा पट्टा जाऊन पुन्हा थंडी वाढणार आहे. बुधवारी (ता. १३) सकाळी आठ वाजेपर्यंत गोंदिया येथे १०.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

कोकण, गोव्यासह, संपूर्ण राज्यात हवामान कोरडे आहे. त्यामुळे कोकण, गोव्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली. मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली. मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. पुणे परिसरातही आकाश मुख्यत निरभ्र होते.

राजस्थान, गुजरात, दिल्ली, जम्मू आणि काश्मीर, हरियाना या भागांत कमी दाबाचे क्षेत्र कमी झाले आहे. सध्या भागात हवामान कोरडे असून, येत्या रविवारपर्यंत या भागात थंडीचा पारा चांगलाच वाढणार असल्याची शक्यता आहे. त्याचा काहिसा परिणाम राज्यातील किमान तापमानावर होणार असून, राज्यातील किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे.

सध्या कोरड्या हवामानामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भागात धुके पडत आहे. कोकणातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन अंशांनी घट झाली आहे. मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि सोलापूर येथील किमान तापमानातही सरासरीच्या तुलनेत एक अंशाने घट झाली आहे. मराठवाड्यात किमान तापमानात किंचित घट झाली. उस्मानाबादमधील किमान तापमान सरासरीएवढे होते. विदर्भातील काही जिल्ह्यांतील किमान तापमानात चढउतार सुरू आहे. गोंदियातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत एक अंशाने घट झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

बुधवारी (ता. १४) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअस) : मुंबई (सांताक्रूझ) १७.३ (-१), अलिबाग १९.०, रत्नागिरी १८.५ (-२), डहाणू १६.८ (९), भिरा १७.० (-१), नगर १५.१ (२), पुणे १३.८ (२), जळगाव १४.४ (३), कोल्हापूर १७.१ (१), महाबळेश्वर १३.६ (१), मालेगाव १४.८ (३), नाशिक ११.६ (१), सांगली १६.६ (२), सातारा १३.० (-१), सोलापूर १४.८ (-१), औरंगाबाद १५.४ (४), बीड १५.६ (३), परभणी १७.० (३), उस्मानाबाद ११.४, अकोला १७.० (४), अमरावती १७.२ (-१), बुलडाणा १७.६ (३), चंद्रपूर १६.४, गोंदिया १०.५ (-१), नागपूर १५.१ (३), वाशीम १५.४, वर्धा १६.९ (३), यवतमाळ १६.४ (२) 

इतर अॅग्रो विशेष
अकोला जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांना देणार...अकोला ः देशात राबवल्या जात असलेल्या प्रधानमंत्री...
दक्षिण महाराष्ट्रातील कारखान्यांत ८०...सांगली/कोल्हापूर ः साखरेला दर नसल्याने निराश...
सीताफळाच्या योग्य जातींची करा लागवडमहाराष्ट्रात सीताफळाच्या झाडांचे काही नैसर्गिक...
उत्पादकांसाठी बेदाणा गोडसांगली ः यंदाच्या बेदाणा हंगामात बेदाण्याच्या...
केळी दरात किंचित सुधारणाजळगाव ः रावेर, यावलमध्ये केळीची आवक वाढलेली...
मका चार वर्षांतील नीचांकी पातळीवरनवी दिल्ली ः बजारात मका आवक वाढल्यांतर मागणी कमी...
कामाच्या अतिरिक्त ताणामुळे पणन संचालक...पुणे ः पणन संचालकपदी पूर्णवेळ नियुक्ती असताना...
​​राज्य सरकार राबविणार मधुमक्षिका मित्र...पुणे : शहरी भागात मधुमक्षिकांचे पोळे दिसले, की ते...
ग्रामस्वच्छता अभियानात प्रभाग, गटातून...नगर ः ग्रामीण भागात स्वच्छतेची व्यापी...
केसर आंबा पाडाला आलाय...औरंगाबाद : आपली चव, गंध आणि रूपाने ग्राहकांना...
बदल्या समुपदेशनानेच...पुणे : राज्याच्या कृषी विभागात समुपदेशनाने बदल्या...
अरबी समुद्रात चक्रीवादळाचे संकेतपुणे : ‘सागर’ चक्रीवादळापाठोपाठ अरबी समुद्रात...
पाणलोट, मृदसंधारण घोटाळ्याचा पर्दाफाशपुणे : कृषी खात्यातील पाणलोट व मृदसंधारण...
ब्राझील, थायलंडचा यंदा इथेनॉलकडे वाढता...कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वत्रच...
बारमाही भाजीपाला शेतीला नर्सरी...ब्राह्मणगाव (जि. नाशिक) येथील केवळ वाघ पूर्वी...
सुधारित तंत्राची मिळाली गुरुकिल्लीअकोला जिल्ह्याचे मुख्य उन्हाळी पीक कांद्याची...
भाराभर चिंध्या राज्यात १२७ वा पशुसंवर्धन दिन नुकताच साजरा...
मथुरेचं दूध का नासलं?राज्यात मे महिन्याचे तापमान यंदा नैसर्गिक आणि...
चिमुरड्याच्या कॅमेऱ्यात कैद आनंदी शेतकरीआपल्याकडील शेतकरी आनंदी असू शकतो का? उत्तर...
‘अ’तंत्र निकेतनपुरेसा अभ्यास आणि तयारीअभावी, यंत्रणेचा विरोध...