agriculture news in marathi, weather, temperature, forecasting | Agrowon

किमान तापमानात चढ-उतार
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 15 डिसेंबर 2017

पुणे : राज्यात कोरडे हवामान असून हळूहळू थंडी वाढण्यास सुरवात झाली आहे. अनेक भागांत किमान तापमानात चढ-उतार होऊ लागले आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत थंडी आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. गुरवारी (ता. 14) सकाळी आठ वाजेपर्यंत मध्य महाराष्ट्रातील नाशिक येथे 11.4 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

पुणे : राज्यात कोरडे हवामान असून हळूहळू थंडी वाढण्यास सुरवात झाली आहे. अनेक भागांत किमान तापमानात चढ-उतार होऊ लागले आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत थंडी आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. गुरवारी (ता. 14) सकाळी आठ वाजेपर्यंत मध्य महाराष्ट्रातील नाशिक येथे 11.4 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

उत्तर भारतातील जम्मू आणि काश्‍मीर, हरियाना या राज्याच्या काही भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. राजस्थान, दिल्ली, गुजरात या भागांत थंडीची लाट आली असून, किमान तापमानाचा पारा चार अंशांपर्यत खाली आला आहे. त्याचा परिणाम राज्यातील हवामानावर होणार आहे. किमान तापमानात घट होण्याची शक्‍यता आहे. राज्यात पुन्हा थंडी वाढण्याची शक्‍यता आहे. पुणे परिसरातही आकाश मुख्यते निरभ्र राहील. सोमवारपासून (ता.18) पुणे परिसरात आकाश अंशत ढगाळ राहील.

कोकण गोव्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. मराठवाडा व विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. विदर्भाच्या उर्वरित भागात किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.

दक्षिणेकडून राज्यात वारे वाहत आहे. त्यातच जमिनीत ओलावा असून, दिवसा प्रखर पडत असलेल्या उन्हामुळे रात्री हवेत गारवा तयार होत आहे. त्यामुळे पहाटे ग्रामीण भागात धुके पडत आहे. तसेच काही ठिकाणी मुंबई तसेच इतर शहराच्या परिसरात प्रदूषणामुळे धुरके तयार होत आहे. त्याचा पिकांवर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्‍यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.

गुरवारी (ता.14) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअस)
मुंबई (सांताक्रूझ) 15.8 (-3), अलिबाग 18.0 (-1), रत्नागिरी 18.3 (-2), डहाणू 16.9 (-1), भिरा 16.0 (-2), नगर 15.0 (3), पुणे 13.6 (1), जळगाव 14.6 (3), कोल्हापूर 15.8, महाबळेश्वर 13.4, मालेगाव 15.0 (4), नाशिक 11.4 (1), सांगली 16.4 (2), सातारा 12.0 (-1), सोलापूर 16.1 (1), औरंगाबाद 16.2 (5), परभणी 18.0 (5), नांदेड 17.0 (5), उस्मानाबाद 12.8, अकोला 16.6 (3), अमरावती 16.6 (2), बुलडाणा 16.8 (2), चंद्रपूर 17.6 (4), गोंदिया 11.7 (-1), नागपूर 15.4 (3), वाशीम 15.4, वर्धा 15.5 (2), यवतमाळ 19.0 (4).

इतर अॅग्रो विशेष
मोदी सरकार पास की नापास? बघा रिपोर्ट...मोदी सरकारचा चार वर्षांचा प्रवास, पुढच्या...
भारत शेतीमध्ये जागतिक महासत्ता :...बारामती ः भारत हा शेतीच्या बाबतीत जगातील महासत्ता...
माॅन्सून अंदमानात; मंगळवारपर्यंत केरळातपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बंगालच्या...
जॉईंट अॅग्रेस्को : ‘कृषी’च्या मंथनाकडे...दापोली, जि. रत्नागिरी : शेतकऱ्यांच्या आत्महत्या...
मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाजपुणे ः पावसाला पोषक हवामान असल्याने कोकण,...
गोष्ट अश्‍वमेधाच्या डिजिटल घोड्यांचीनरेंद्र मोदी देशाच्या राजकारणात उतरले तेच मुळी...
छत्तीसगडच्या शेतकऱ्यांना सीताफळाने...सीताफळ शेतीत देशात अाघाडीवर महाराष्ट्राची भुरळ...
चला आटपाडीला देशी शेळी, माडग्याळी मेंढी...आटपाडी (जि. सांगली) येथील अोढा पात्रात दर शनिवारी...
विशेष संपादकीय : देशाच्या 'फिटनेस'चे...नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता...
मोदी सरकार चार वर्ष : अपेक्षा...गेल्या चार वर्षांत नरेंद्र मोदी सरकारला अनेक चढ-...
विवेकबुद्धी, स्वयंप्रेरणाच बनली धूसरमोदी सरकारच्या काळात हिंदुत्व आणि नरम हिंदुत्व...
माॅन्सून अंदमानात दाखल !!!पुणे : माॅन्सूनसाठी अंदमानाच्या दक्षिण भागात...
फेरवाटपातून वाढतोय जलसंघर्षमहाराष्ट्र देशी जलसंघर्षांच्या संख्येत व तीव्रतेत...
शेतकरी सक्षमतेचा ‘करार’भारतीय शेतकऱ्यांसमोर आजची सर्वांत मोठी अडचण कोणती...
शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी...दापोली, जि. रत्नागिरी : शेतकऱ्यांच्या...
‘त्या’ कृषी पर्यवेक्षकांना ‘मॅट’चा...अकोला ः अमरावती विभागीय कृषी सहसंचालकाकडून सन...
भुईमुगालाही हमीभाव मिळेनाअकोला ः या हंगामात लागवड झालेल्या भुईमुगाची काढणी...
जैन इरिगेशनला विदर्भातील सूक्ष्म सिंचन...जळगाव : जगातील अग्रगण्य सिंचन कंपनी जैन इरिगेशन...
कडधान्याचा पेरा वाढण्याची शक्यतानवी दिल्ली ः भारतीय हवामान खत्याने यंदा मॉन्सून...
माॅन्सून उद्या अंदमानातपुणे : माॅन्सूनसाठी अंदमानाच्या दक्षिण भागात...