agriculture news in marathi, weather, temperature, forecasting | Agrowon

विदर्भ थंडीने गारठला
टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 डिसेंबर 2017

पुणे : उत्तरेकडून वाहत असलेल्या थंड वाऱ्यामुळे विदर्भातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत चार अंशांपर्यंत घट झाली. परिणामी विदर्भातील थंडीला पारा दहा अंशांच्या खाली उतरला आहे. मंगळवारी (ता.19) सकाळी आठ वाजेपर्यंत विदर्भातील गोंदिया येथे 8.0 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

पुणे : उत्तरेकडून वाहत असलेल्या थंड वाऱ्यामुळे विदर्भातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत चार अंशांपर्यंत घट झाली. परिणामी विदर्भातील थंडीला पारा दहा अंशांच्या खाली उतरला आहे. मंगळवारी (ता.19) सकाळी आठ वाजेपर्यंत विदर्भातील गोंदिया येथे 8.0 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

कोकण, गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे आहे. त्यामुळे विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली. मराठवाड्याच्या काही भागात किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. पुणे परिसरात मंगळवारी (ता.19) आकाश अंशत ढगाळ होते. येत्या सोमवारपर्यंत (ता.25) पुणे परिसरात आकाश मुख्यत निरभ्र राहण्याची शक्‍यता आहे.

सध्या उत्तरेकडून येणारे वारे हे राज्याच्या पूर्व भागाकडे अधिक वाहत आहे. त्यामुळे विदर्भात थंडी वाढत आहे. परंतु हळूहळू ही थंडी मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण या भागातही थंडी वाढेल, असा अंदाज आहे. मात्र, राज्यातील किमान तापमानात चढउतार सुरू असून कोकणात रत्नागिरी वगळता मुंबई, अलिबाग, भिरा, डहाणू येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत एक ते दोन अंशाने वाढ झाली आहे.

मध्य महाराष्ट्रातील नगर, नाशिक येथे सर्वात कमी म्हणजेच 10 अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली. तर महाबळेश्वर, सोलापूर येथेही सरासरीच्या तुलनेत एक ते दोनअंशाने घट होऊन किमान तापमान 13.0 अंशांवर होते. पुणे, जळगाव, कोल्हापूर, मालेगाव, सांगली, सातारा येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत एक ते तीन अंशाने वाढले.

मराठवाड्यातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन अंशाने घटले. नांदेड येथे सर्वात कमी दहा अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमान होते. परभणीमध्ये 11.4 अंश सेल्सिअस एवढे तापमान होते. औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत चार अंशांपर्यंत वाढ झाली. विदर्भातील अकोला, गोंदिया, नागपूर, वाशीम, वर्धा येथील किमान तापमान दहा अंश सेल्सिअसच्या खाली आले होते. बुलढाणा, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ येथील किमान तापमान दहा अंशाच्यावर होते.

मंगळवारी (ता.19) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअस)
मुंबई (सांताक्रुझ) 19.8 (2), अलिबाग 19.4 (1), रत्नागिरी 18.1 (-2), डहाणू 19.4 (1), भिरा 18.3 (1), नगर 10.0 (-1), पुणे 14.3 (3), जळगाव 13.4 (1), कोल्हापूर 15.9 (1), महाबळेश्वर 13.0 (-1), मालेगाव 12.0 (1), नाशिक 10.0, सांगली 16.0 (3), सातारा 13.9 (1), सोलापूर 13.4 (-2), औरंगाबाद 11.4, बीड 16.0 (4),परभणी 11.4 (-2), नांदेड 10.0 (-2), उस्मानाबाद 13.0, अकोला 9.9 (-3), अमरावती 11.6 (-3), बुलढाणा 11.5 (-3), चंद्रपूर 11.6 (-1), गोंदिया 8.0 (-4), नागपूर 8.9 (-4), वर्धा 9.5 (-4), वाशीम 10.0, यवतमाळ 10.4 (-4)

इतर अॅग्रो विशेष
कोरडवाहू शेतजमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाची...सोलापूर ः महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत...
बीजी - ३ चे घोडे अडले कुठे?आगामी हंगाम धोक्‍याचा सन २०१७ च्या खरीप हंगामात...
आव्हान पाणी मुरविण्याचेठिबक सिंचन अनुदानासाठी यावर्षी विक्रमी निधी...
भारतातील १ टक्का श्रीमंतांकडे ७३ टक्के...दावोस  ः गेल्या वर्षभरात देशात निर्माण...
किमान तापमानात घट; नगर ९.४ अंशांवरपुणे ः विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात...
नागपुरात तुरीच्या दरात घसरणनागपूर : येथील कळमणा बाजारात आठवड्याच्या...
देशात खालावत आहे जमिनीचे आरोग्यनागपूर : खोल मशागत, नियंत्रित खत व्यवस्थापनाला...
बोंड अळी भरपाईसाठी सुनावणी आजपासूनपुणे : राज्यात शेंदरी बोंड अळीमुळे...
तूर खरेदी अडकली नोंदणीतचलातूर ः तेलंगणा, कर्नाटक राज्याने हमीभावाप्रमाणे...
कष्ट, अभ्यासातून जोपासलेली देवरेंची...नाशिक जिल्ह्यातील नाशिक सटाणा तालुक्याचा परिसर...
लसीकरणाअभावी दाेन काेटी पशुधनाचे...पुणे ः सुमारे ३० काेटींची निविदा मिळविण्यासाठी...
सिद्धेश्‍वर यात्रेतील बाजारात खिलार बैल...सोलापूरचे ग्रामदैवत श्री. सिद्धेश्‍वर...
जिरायती शेती विकासातून थांबेल स्थलांतरमराठवाडा आणि विदर्भ विभागातील जिरायती शेतकरी...
संभ्रम दूर करामागील खरीप हंगामात चांगल्या पाऊसमानाच्या...
मुद्रा योजनेच्या १० लाखांपर्यंतच्या...कोल्हापूर : तरुणांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर...
रब्बीचा ६१.८ दशलक्ष हेक्टरवर पेरानवी दिल्ली ः भारतातील रब्बी क्षेत्रात यंदा गेल्या...
प्रशिक्षणांना दांड्या मारणाऱ्या...अकोला : अधिकारी, कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता...
ठिबक अनुदानासाठी ७६४ कोटींचा निधीपुणे: राज्यात ठिबक संच बसविलेल्या शेतकऱ्यांना...
मराठवाड्यात ४३ टक्‍के जमीन चुनखडऔरंगाबाद : मराठवाड्यातील जमिनीचा पोत दिवसेंदिवस...
दशकातील सर्वांत मोठ्या कापूस आयातीचे...जळगाव ः महाराष्ट्रासह काही प्रमुख कापूस उत्पादक...