agriculture news in marathi, weather, temperature, forecasting | Agrowon

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात थंडीचा जोर
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 21 डिसेंबर 2017

पुणे : कोकण, मध्य महाराष्ट्राचा उत्तरेकडील काही भाग वगळता उर्वरित भागात थंडीने चांगलाच जम बसविण्यास सुरवात केली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात थंडीचा जोर वाढला आहे. बुधवारी (ता. 20) सकाळी आठ वाजेपर्यंत मराठवाड्यातील उस्मानाबाद येथे 8.0 सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

पुणे : कोकण, मध्य महाराष्ट्राचा उत्तरेकडील काही भाग वगळता उर्वरित भागात थंडीने चांगलाच जम बसविण्यास सुरवात केली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात थंडीचा जोर वाढला आहे. बुधवारी (ता. 20) सकाळी आठ वाजेपर्यंत मराठवाड्यातील उस्मानाबाद येथे 8.0 सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

कोकण, गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे आहे, त्यामुळे विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली. मराठवाड्याच्या काही भागात किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. पुणे परिसरात बुधवारी (ता. 20) आकाश अंशतः ढगाळ होते. येत्या सोमवारपर्यंत (ता. 25) पुणे परिसरात आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्‍यता आहे.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून विदर्भात थंडी आहे. विदर्भापाठोपाठ ही थंडी मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण या भागातही वाढत आहे. मात्र, कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवामान ढगाळ आहे, त्यामुळे किमान तापमानात चढ-उतार सुरू आहे. कोकणात सरासरीच्या तुलनेत दोन अंशांपर्यंत घट झाली. मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या तुलनेत चार अंश, मराठवाड्यात दोन अंश सेल्सिअस, तर विदर्भात तीन अंशांपर्यंत घट झाली
आहे.

बुधवारी (ता. 20) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअस)
मुंबई (सांताक्रूझ) 17.6 (1), अलिबाग 18.2, रत्नागिरी 17.3 (-2), डहाणू 19.7 (2), भिरा 16.5 (-1), नगर 11.4, पुणे 11.6 (1), जळगाव 12.6 (1), कोल्हापूर 15.3 (1), महाबळेश्वर 13.6, मालेगाव 14.0 (3), नाशिक 13.6 (3), सांगली 14.2 (1), सातारा 12.2 (-1), सोलापूर 11.1 (-4), औरंगाबाद 13.5 (3), ,परभणी 12.2 (-1), नांदेड 10.0 (-2), उस्मानाबाद 8.0, अकोला 11.0 (-2), अमरावती 12.8 (-2), बुलडाणा 14.0, चंद्रपूर 12.6, गोंदिया 8.6 (-3), नागपूर 9.2 (-3), वर्धा 10.4 (-3, यवतमाळ 11.4 (-3)

इतर अॅग्रो विशेष
'सकाळ'चे दिवाळी अंक अॅमेझॉनवर !पुणे : क्लिकवर चालणाऱया आजच्या जगात दिवाळी अंकही...
संपूर्ण देशातून मॉन्सून परतलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (माॅन्सून) रविवारी (ता...
डॉ. हद्दाड आणि डाॅ. नॅबार्रो यांना २०१८...पुणे : जगभरातील कुपोषित माता आणि बालकांना...
हुमणीग्रस्त ऊसक्षेत्र चार लाख हेक्टरवरपुणे ः राज्यात दुष्काळामुळे त्रस्त झालेल्या...
पाणीटंचाईने संत्राबागांची होरपळअमरावती ः विदर्भाचा कॅलिफोर्निया अशी ओळख असलेल्या...
उन्हाचा चटका वाढलापुणे : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर कमाल...
पाच मिनिटांत एका एकरवर फवारणी !...शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आले पाहिजे, असे जो तो...
‘सह्याद्री’ च्या शिवारात हवामान अाधारित...अत्याधुनिक संगणकीय, उपग्रह व डिजिटल या प्रणाली...
द्राक्षपट्ट्याला दुष्काळाचे ग्रहणसांगली ः गेल्यावर्षीपेक्षा यंदा पाऊस कमी झालाय......
पर्यावरण संवर्धन, ग्राम पर्यटनाला चालनापर्यावरण संवर्धन, अभ्यासाच्या बरोबरीने ‘मलबार...
पीक नियोजन, पशुपालनातून शेती केली...चांदखेड (ता. मावळ, जि. पुणे) येथील रूपाली नितीन...
पीक वृद्धीकारक कंपन्या कारवाईमुळे...पुणे: कृषी विभागाकडून अलीकडेच पीक वृद्धीकारके (...
ऊसतोड कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा...मुंबई  : केंद्र शासनाच्या असंघटित कामगार...
गुलाबी बोंड अळी नुकसानभरपाईस...पुणे : गुलाबी बोंड अळीमुळे नुकसान झालेल्या दहा...
राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाजपुणे : कोकण, मध्य महाराष्ट्रात आठवडाभर सुरू...
दूध खरेदी अनुदानाचा तिढा सुटता सुटेनामुंबई : दूध खरेदी अनुदानाचा गुंता काही केल्या...
सेक्‍सेल सिमेन तंत्राने रेडीचा जन्मभिलवडी, जि. सांगली :  येथील चितळे आणि जिनस...
परभणी, राहुरी कृषी विद्यापीठांना पाच...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदअंतर्गत कृषी...
कोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम...पुणे : पावसाला पोषक हवामान झाल्याने आठवड्याच्या...
‘आरएसएफ’च्या मूळ सूत्रात घोडचूकपुणे: शेतकऱ्यांना हक्काचा ऊसदर मिळवून देणाऱ्या...