agriculture news in marathi, weather, temperature, forecasting | Agrowon

किमान तापमानात चढ-उतार
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 22 डिसेंबर 2017

पुणे : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात आणि कोकणात किमान तापमानात घट झाली आहे. परंतु, कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवामान ढगाळ हवामान आहे. त्यामुळे किमान तापमानात चढ-उतार सुरू आहे. कोकण, मध्य महाराष्ट्राचा उत्तरेकडील काही भाग वगळता उर्वरित भागांत थंडीने चांगलाच जम बसविण्यास सुरवात केली आहे. गुरुवारी (ता. 21) सकाळी आठ वाजेपर्यंत उस्मानाबाद येथे 8.9 सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

पुणे : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात आणि कोकणात किमान तापमानात घट झाली आहे. परंतु, कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवामान ढगाळ हवामान आहे. त्यामुळे किमान तापमानात चढ-उतार सुरू आहे. कोकण, मध्य महाराष्ट्राचा उत्तरेकडील काही भाग वगळता उर्वरित भागांत थंडीने चांगलाच जम बसविण्यास सुरवात केली आहे. गुरुवारी (ता. 21) सकाळी आठ वाजेपर्यंत उस्मानाबाद येथे 8.9 सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

सध्या कोकण, गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. पुणे परिसरात गुरुवारी (ता. 21) आकाश अंशतः ढगाळ होते. आजही पुणे परिसरात आकाश अंशतः ढगाळ राहील. येत्या रविवारपयींत (ता. 24) पुणे परिसरात आकाश मुख्यतः निरभ्र राहणार असून, त्यानंतर हवामान ढगाळ राहील.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात थंडी आहे. किमान तापामानात सरासरीच्या तुलनेत चार अंशांपर्यंत घट झाली आहे. विदर्भानंतर, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही थंडी वाढत आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात थंडीचा चांगला जोर आहे.

गुरुवारी (ता. 21) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअस)
मुंबई (सांताक्रूझ) 20.0 (-1), अलिबाग 18.2, रत्नागिरी 18.8 (-1), डहाणू 17.7 (2), भिरा 15.0 (-2), पुणे 10.5 (1), जळगाव 10.0 (-1), कोल्हापूर 15.4 (1), महाबळेश्वर 13.6, मालेगाव 11.8, नाशिक 9.2.2 (-1), सांगली 12.2 (-1), सातारा 11.8 (-1), सोलापूर 11.6 (-3), औरंगाबाद 11.0, ,परभणी 10.7 (-2), नांदेड 11.0 (-2), उस्मानाबाद 8.9, अकोला 11.3 (-2), अमरावती 12.6 (-2), बुलडाणा 13.6, चंद्रपूर 12.6, गोंदिया 10.2 (-4), नागपूर 12.0 (-1), वर्धा 10.6 (-3, यवतमाळ 13.0 (-3)

इतर अॅग्रो विशेष
आश्‍वासनानंतर कडू यांचे विमा आंदोलन...पुणे : फळ पीकविमा योजनेतील गलथानपणामुळे...
वैशिष्ट्यपूर्ण, मूल्यवर्धित उत्पादनांत...औरंगाबाद येथील सौ. मनीषा संतोष चव्हाण यांनी...
मुंबईमध्ये शेतकरी ते ग्राहक सेंद्रिय...नाशिक : सिन्नर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती...
अकोली जहाॅंगीर येथे एचटीबीटी...अकोला ः देशात प्रतिबंधित असलेले एचटीबीटी कापूस...
कर्नाटक आगमनानंतर, मॉन्सूनच्या...पुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...
सांगली जिल्ह्यात बेदाणा उत्पादनात वाढ,...सांगली ः बेदाणा निर्मितीसाठी प्रतिकूल वातावरण...
तिसऱ्या दिवशीही समुद्राला उधाणसिंधुदुर्ग : वायुवादळामुळे समुद्राला आलेले...
खरीप हंगामासाठी भेंडीची नवी जातचिपळूण ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
कोकणात बरसणार पूर्वमोसमीच्या सरीपुणे : ‘वायू’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकणात...
दुष्काळ सांगतो ‘जपून वापरा पाणी’हवामानाच्या नुकत्याच व्यक्‍त झालेल्या अंदाजानुसार...
‘असर’दार शिक्षणासाठी...कृषी पदवीधर आता माध्यमिक शिक्षकांच्या नोकरीसाठी...
मॉन्सूनची दक्षिण कर्नाटकपर्यंत चालपुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...
गुजरातवरील ‘वायू' संकट तूर्त टळलेअहमदाबाद/ नवी दिल्ली : गुजरात किनाऱ्याच्या दिशेने...
मोगरा शेतीतून दरवळला यशाचा सुगंध...ॲग्रोवनमध्ये मोगरा शेतीची यशकथा वाचून कवठेमहांकाळ...
‘राजवाडी पॅटर्न’द्वारे शंभर एकर जमीन...पावसाळ्यात भरपूर पाऊस, उन्हाळ्यात पाण्याचे...
छत्रपती शाहू महाराज यांनी...कागल, जि. कोल्हापूर ः महाराष्ट्रात राजर्षी शाहू...
राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज पुणे ः अरबी समुद्रात धुमाकूळ घालणाऱ्या वायू...
'पशुसंवर्धन'मध्ये अखेर नव्याने बदल्यानागपूर ः विश्‍वासात न घेताच बदल्या केल्याचा ठपका...