थंडीमुळे पेटल्या शेकोट्या

थंडीमुळे पेटल्या शेकोट्या
थंडीमुळे पेटल्या शेकोट्या

पुणे : थंडीच्या लाटेमुळे राज्यातील किमान तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात ऊब मिळविण्यासाठी शेकोट्या पेटू लागले आहेत. शुक्रवारी (ता. २९) सकाळी आठ वाजेपर्यंत परभणी कृषी विद्यापीठ आवारात ५.९ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे परभणी येथील कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाच्या सूत्रांनी सांगितले.   उत्तर भारतात अनेक ठिकाणी थंडीची लाट आली आहे. त्याचा काहीसा परिणाम राज्यातील किमान तापमानावर झाला आहे. सध्या मराठवाडा आणि विदर्भात किमान तापमानात घट झाली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रातील किमान तापमानात चढ-उतार सुरू आहे. काही दिवस ही थंडी कायम राहण्याची शक्‍यता असून ती गहू, हरभरा या पिकांना पोषक ठरणार आहे.  सध्या कोकणातील मुंबई, रत्नागिरी, डहाणू, भिरा येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन ते चार अशांपर्यंत घट झाली आहे. रत्नागिरी येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत चार अंशांनी घट झाली असून, १५.४ अंश सेल्सिअस एवढे किमान तापमान नोंदविले गेले. मध्य महाराष्ट्रात पुणे, जळगाव, कोल्हापूर, नाशिक, सातारा, सोलापूर येथील किमान तापमानात तीन अंशांपर्यंत घट झाली. नाशिक, जळगाव येथे सर्वांत कमी ८.६ अंश सेल्सिअसची नोंद झाली. पुण्यातील किमान तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत एक अंशाने घसरला असून, ८.७ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले. महाबळेश्वर, मालेगाव येथील किमान तापमान सरासरीएवढे होते. मराठवाड्यातील परभणी येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत पाच अंश सेल्सिअसने घटले असून, ८.४ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमान नोंदविले गेले. नांदेड येथील किमान तापमानात दहा अंशांपर्यंत होते. उस्मानाबाद, औंरगाबाद येथील किमान तापमान सरासरीएवढे होते.  विदर्भातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत पाच अंशांपर्यंत घटले. अकोला, नागपूर, गोंदिया येथील किमान तापमान दहा अंशांच्या खाली आले. अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर, यवतमाळ येथील किमान तापमान दहा अंशांच्या वर होते. वर्धातील किमान तापमान सरासरीएवढे होते.  शुक्रवारी (ता. २९) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअस)  : मुंबई (सांताक्रूझ) १५.५ (-२), अलिबाग १७.४, रत्नागिरी १५.४ (-४), डहाणू १६.५ (-१), भिरा १६.० (-१), पुणे ८.७ (-१), जळगाव ८.६ (-३),  कोल्हापूर १४.३ (-१), महाबळेश्वर १३.०, मालेगाव १०.५, नाशिक ८.६ (-१), सांगली १२.६ (-१), सातारा १०.५ (-३), सोलापूर ११.९(-३), औरंगाबाद १०.४, परभणी (कृषी विद्यापीठ आवार) ५.९, परभणी शहर ८.४ (-५), नांदेड १०.० (-२), उस्मानाबाद ८.७, अकोला ९.५ (-४), अमरावती १२.६(-२), बुलडाणा १२.०(-२), चंद्रपूर १०.८ (-३), गोंदिया ७.५ (-५), नागपूर ८.४ (-४), वर्धा १०.० (-३), यवतमाळ १२.० (-२) 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com