agriculture news in marathi, weather, temperature, forecasting | Agrowon

किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ
टीम अॅग्रोवन
सोमवार, 15 जानेवारी 2018

पुणे : मालदिवचा परिसर आणि महाराष्ट्राच्या उत्तर भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. तसेच हिंदी महासागर व बंगालचा उपसागर या भागातही कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याचा परिणाम राज्याच्या काही भागावर झाला असून, पहाटे हवेतील आर्द्रता कमी झाली आहे. त्यामुळे पहाटे असलेल्या थंडीची तीव्रताही कमी झाली असून, गोव्यासह, संपूर्ण राज्यात काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

पुणे : मालदिवचा परिसर आणि महाराष्ट्राच्या उत्तर भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. तसेच हिंदी महासागर व बंगालचा उपसागर या भागातही कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याचा परिणाम राज्याच्या काही भागावर झाला असून, पहाटे हवेतील आर्द्रता कमी झाली आहे. त्यामुळे पहाटे असलेल्या थंडीची तीव्रताही कमी झाली असून, गोव्यासह, संपूर्ण राज्यात काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

दक्षिणेकडे असलेला सूर्य उत्तरेकडे सरकू लागला आहे. त्यामुळे किमान तापमानात हळूहळू वाढ होऊ लागली आहे. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य महाराष्ट्राच्या पुणे, नगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांच्या काही भागात ढगाळ हवामान होते. रविवारी (ता. 14) सकाळी आठ वाजेपर्यंत गोदिया येथे 9.7 अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली. येत्या शुक्रवार (ता. 18) पर्यंत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता आहे. पुणे परिसरातही येत्या शनिवार (ता. 20) पर्यंत आकाश मुख्यतः निरभ्र राहील.

कोकणातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत पाच अंशांपर्यंत वाढ झाली. भिरा येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन अंशांनी वाढ होऊन किमान तापमान 19.0 अंश सेल्सिअसवर नोंदविले गेले. मध्य महाराष्ट्रातही किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत सात अंशांनी वाढ झाली आहे. नाशिकमध्ये किमान तापमान सरासरीच्या तुलनेत चार अंशांनी वाढले असून, किमान तापमानाचा पारा 14.3 अंश सेल्सिअसवर होता. मराठवाड्यातील किमान तापमानातही सरासरीच्या तुलनेत चार अंशांनी वाढ झाली आहे. नांदेडमध्ये 13.5 अंश सेल्सिअस सर्वांत कमी किमान तापमान नोंदविले गेले. विदर्भातील बहुतांशी भागातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन ते चार अंश सेल्सिअसने वाढ झाली. गोंदियापाठोपाठ नागपूर व चंद्रपूर येथे सर्वांत कमी किमान तापमान नोंदविले गेले.

रविवारी (ता. 14) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअस)
मुंबई (सांताक्रूझ) 21.8 (5), अलिबाग 21.4 (4), रत्नागिरी 21.8 (3), भिरा 19.0 (3), डहाणू 21.3 (4), पुणे 15.6 (5), जळगाव 15.2 (3), कोल्हापूर 20.1 (5), महाबळेश्वर 16.8 (4), मालेगाव 18.2 (7), नाशिक 14.3 (4), सांगली 17.9 (4), सातारा 16.6 (4), सोलापूर 18.9 (3), औरंगाबाद 15.4 (4), परभणी शहर 14.5, नांदेड 13.5, अकोला 17.5 (3), अमरावती 16.8(2), बुलडाणा 18.2 (4), चंद्रपूर 13.2 (-2), गोंदिया 9.7 (-4), नागपूर 13.0, वर्धा 15.5 (2), यवतमाळ 18.0 (3)

इतर अॅग्रो विशेष
दुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...
वादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...
कोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...
पुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...
राज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे  : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...
आयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...
नवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...
पर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...
ऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...
दुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...
पडला सत्याचा दुष्काळ, बहू झाला घोळराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३...
चारा नियोजनातील ‘दुष्काळ’राज्यात आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे....
मोहोळमध्ये ‘हुमणी‘ने १७ हजार एकरांचे...मोहोळ, जि. सोलापूर : तालुक्‍यातील सात महसुली...
पॉलिथिन पिशव्यांचा वापर थांबविण्याचे...पुणे   : राज्यातील कृषी तसेच वन विभागातील...
ढगाळ हवामानामुळे थंडी गायब; आजही...पुणे : अरबी समुद्रात असलेल्या तीव्र कमी दाब...
तमिळनाडूच्या धर्तीवर मराठा समाजाला...मुंबई : मूळ आरक्षणाला धक्का न लावता तमिळनाडूच्या...
ब्लॉक प्रिंटिंग व्यवसायातून आर्थिक...पूर्व विदर्भातील भंडारा, वर्धा या जिल्ह्यांत...
दुष्काळग्रस्तांना सरसकट हेक्टरी ५० हजार...मुंबई : राज्यात यंदा १९७२ पेक्षाही भयंकर...
दूध अनुदान योजनेस ३१ जानेवारीपर्यंत...पुणे : राज्यात उत्पादित होणाऱ्या (पिशवी बंद...
आता कोठे धावे मन । तुझे चरण देखलिया...पंढरपूर, सोलापूर (प्रतिनिधी) :  आता कोठे...