agriculture news in marathi, weather, temperature, forecasting | Agrowon

उत्तर महाराष्ट्रात ढगाळ हवामान
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 16 जानेवारी 2018

पुणे : मालदीव ते उत्तर महाराष्ट्र या दरम्यान असलेले कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्राकडे सरकत आहे. तसेच हिंदी महासागर व बंगालचा उपसागर या भागातही कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या उत्तर भागात ढगाळ हवामान असून किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत सात अंशापर्यत वाढ झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

पुणे : मालदीव ते उत्तर महाराष्ट्र या दरम्यान असलेले कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्राकडे सरकत आहे. तसेच हिंदी महासागर व बंगालचा उपसागर या भागातही कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या उत्तर भागात ढगाळ हवामान असून किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत सात अंशापर्यत वाढ झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

राज्यात कोरडे हवामान आहे, तर उत्तर महाराष्ट्रात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे थंडीची तिव्रता चांगलीच कमी झाली आहे. गोव्यासह, संपूर्ण राज्यात काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. सोमवारी (ता.15) सकाळी आठ वाजेपर्यत विदर्भातील गोंदिया येथे 10. 5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य महाराष्ट्राच्या पुणे, नगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्याच्या काही भागात ढगाळ हवामान होते. येत्या शुक्रवार (ता.18) पर्यत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता आहे. पुणे परिसरातही येत्या शनिवार (ता.20) पर्यत आकाश मुख्यत निरभ्र राहील.

कोकणातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत चार अंशापर्यत वाढ झाली आहे. भिरामध्ये 19.5 अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत सात अंश सेल्सिअसपर्यत वाढ झाली. नगरमध्ये 15.0 अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमानाची नोद झाली. मराठवाड्यातील किमान तापमानात सहा अंश सेल्सिअसपर्यत वाढ झाली. उस्मानाबादमध्ये 13.9 अंश सेल्सिअस एवढे किमान तापमान नोंदविले गेले. विदर्भात किमान तापमान सरासरीच्या तुलनेत पाच अंश सेल्सिअसपर्यत वाढले आहे. गोंदिया पाठोपाठ चंद्रपूरमध्ये सर्वात कमी किमान तापमान नोंदविले गेले.

सोमवारी (ता.15) सकाळी आठ वाजेपर्यतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअस)
मुंबई (सांताक्रूझ) 21.0 (4), अलिबाग 22.4 (4), रत्नागिरी 21.0 (2), भिरा 19. 5 (4), डहाणू 21.3 (5), पुणे 16.2 (5), नगर 15.0 (3), जळगाव 14.4 (3), कोल्हापूर 19.5 (1), महाबळेश्वर 17.0 (4), मालेगाव 18.2 (7), नाशिक 15.5 (5), सांगली 17.9 (4), सातारा 16.6 (4), सोलापूर 20.1 (4), औरंगाबाद 17.4 (6), परभणी शहर 18.4 (4), नांदेड 14.5 (1), उस्मानाबाद 13.9, अकोला 17.6 (3), अमरावती 17.6 (3), बुलढाणा 17.8 (3), चंद्रपूर 15.0, गोंदिया 10.5 (-3), नागपूर 16.4 (3), वर्धा 18.2 (5), यवतमाळ 19.4 (4)

इतर अॅग्रो विशेष
आरोग्यदायी ड्रॅगन फ्रूटशरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आणि...
वनस्पतीच्या ताण स्थितीतील संदेश यंत्रणा...वनस्पतीतील ताणाच्या स्थितीमध्ये कार्यरत होणाऱ्या...
आर्थिक, सामाजिक, कृषिसंपन्न राजुरीचा...आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत व...
नाला खोलीकरणात गेलेे शेत; न्यायासाठी...अकोला ः उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी यंत्रणा...
पावणेतीन हजार कोटींची ‘वसुंधरा’त...पुणे : कृषिविस्तार व सल्ला देण्याचे काम सोडून...
कांदा संचालनालयाला राष्ट्रीय संस्थेचा...पुणे : राजगुरुनगर भागात असलेल्या कांदा, लसूण...
शेतकऱ्यांना मिळणार तालुकानिहाय हवामान...दिल्ली : देशातील सुमारे साडेनऊ कोटी शेतकऱ्यांना...
राज्यात उष्णतेची लाट येणारपुणे : सूर्य आग ओकायला लागल्याने विदर्भात उन्हाचा...
हमीभाव वाढीचा बागुलबुवा आणि वास्तवलोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांच्या...
‘कॅप्सूल’ सुधारणार मातीचे आरोग्यमहाराष्ट्र राज्यासाठी या वर्षी रासायनिक खतांची...
नागपूर : रब्बीची पैसेवारी काढली खरीप...नागपूर : खरीप आणि रब्बी हंगामात वेगवेगळी पिके...
अॅग्रोवन समृद्ध शेती योजनेचे...नांदेड: `अॅग्रोवन’च्या माध्यमातून...
मराठवाड्यातील २९२ लघुप्रकल्प कोरडेऔरंगाबाद : मराठवाड्यातील ७४९ लघुप्रकल्पांपैकी २९२...
दक्षिण आशियात यंदा सर्वसामान्य मॉन्सून...पुणे  : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या...
कृषिउद्योग महामंडळाकडून ‘बायोकॅप्सूल’चा...पुणे : सेंद्रिय शेतीकडे वळालेल्या शेतकऱ्यांच्या...
शासन दरबारी रब्बी हंगामात नागपूर...नागपूर  : खरिपानंतर पाण्याअभावी रब्बी...
बीटी बियाणे १५ मेपूर्वी विक्रीस मनाईपुणे : राज्यातील बियाणे उत्पादक कंपन्यांनी १५...
जमिनीचे जैविक पृथक्करणआजकाल शेतकऱ्यांना मातीचा पृथक्करण अहवाल करून...
सांगलीतून १२ टन द्राक्षे निर्यातसांगली ः यंदा प्रतिकूल परिस्थतीतही जिल्ह्यातील...
काळजी घ्या : उन्हाच्या झळा वाढल्यापुणे : उन्हाच्या झळा वाढल्याने विदर्भ,...