agriculture news in marathi, weather update for maharashtra state | Agrowon

हवामान कोरडे, थंडी परतली
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 24 नोव्हेंबर 2017

पुणे : राज्यावरील ढगांची रेलचेल कमी होताच, थंडीने पुन्हा आपले अधिराज्य गाजविण्यास सुरवात केली अाहे. गुरुवार (ता. २३) पर्यंतच्या गेल्या २४ तासांत राज्यात सर्वांत कमी १२ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद यवतमाळ येथे झाली. पुढील चार दिवस साेमवार (ता. २७) पर्यंत गाेव्यासह संपूर्ण राज्यातील हवामान काेरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पुणे : राज्यावरील ढगांची रेलचेल कमी होताच, थंडीने पुन्हा आपले अधिराज्य गाजविण्यास सुरवात केली अाहे. गुरुवार (ता. २३) पर्यंतच्या गेल्या २४ तासांत राज्यात सर्वांत कमी १२ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद यवतमाळ येथे झाली. पुढील चार दिवस साेमवार (ता. २७) पर्यंत गाेव्यासह संपूर्ण राज्यातील हवामान काेरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

अंदनाम निकाेबार समुद्रालगत तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र पश्‍चिम बंगालच्या अग्नेय बाजूबराेबर पूर्वमध्य समुद्रा लगत पसरले आहे. या क्षेत्राचा प्रभाव कमी झाला असून, राज्यातील आर्द्रतेचे प्रमाण घटले आहे. परिणामी, गेल्या काही दिवसांपासून कमी झालेला थंडीचा कडाका पुन्हा वाढण्यास सुरवात झाली आहे. गुरुवार (ता.२३) पर्यंतच्या गेल्या २४ तासांत मध्य महाराष्‍ट्रात काही ठिकाणी आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस झाल्याची नाेंद हवामान विभागाकडे झाली आहे. तर पुढील २४ तासांत राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात थंडीच्या लाटेचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ, तर काेकण गाेव्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागातील तापमान सरासरीच्या जवळपास हाेते. 

राज्याच्या विविध भागांत नाेंदलेले किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढीलप्रमाणे : मुंबई २२.४, अलिबाग २१.४, रत्नागिरी २४, पणजी २३.६, डहाणू २०.३, भिरा १९.५, पुणे १६.६, नगर १६.४, जळगाव १५, काेल्हापूर २२, महाबळेश्‍वर १५.६, मालेगाव १६.२, नाशिक १३, सांगली १६.४, सातारा १९.१, साेलापूर १९.९, उस्मानाबाद १५, आैरंगाबाद १७.२, परभणी १८.८, नांदेड २१.५, अकाेला २०.५, अमरावती १८.६, बुलडाणा १७.८, ब्रह्मपुरी १७.३, चंद्रपूर २२.२, गाेंदिया १२.५, नागपूर १७.८, वाशीम १८, यवतमाळ १२.

इतर अॅग्रो विशेष
आरोग्यदायी ड्रॅगन फ्रूटशरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आणि...
वनस्पतीच्या ताण स्थितीतील संदेश यंत्रणा...वनस्पतीतील ताणाच्या स्थितीमध्ये कार्यरत होणाऱ्या...
आर्थिक, सामाजिक, कृषिसंपन्न राजुरीचा...आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत व...
नाला खोलीकरणात गेलेे शेत; न्यायासाठी...अकोला ः उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी यंत्रणा...
पावणेतीन हजार कोटींची ‘वसुंधरा’त...पुणे : कृषिविस्तार व सल्ला देण्याचे काम सोडून...
कांदा संचालनालयाला राष्ट्रीय संस्थेचा...पुणे : राजगुरुनगर भागात असलेल्या कांदा, लसूण...
शेतकऱ्यांना मिळणार तालुकानिहाय हवामान...दिल्ली : देशातील सुमारे साडेनऊ कोटी शेतकऱ्यांना...
राज्यात उष्णतेची लाट येणारपुणे : सूर्य आग ओकायला लागल्याने विदर्भात उन्हाचा...
हमीभाव वाढीचा बागुलबुवा आणि वास्तवलोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांच्या...
‘कॅप्सूल’ सुधारणार मातीचे आरोग्यमहाराष्ट्र राज्यासाठी या वर्षी रासायनिक खतांची...
नागपूर : रब्बीची पैसेवारी काढली खरीप...नागपूर : खरीप आणि रब्बी हंगामात वेगवेगळी पिके...
अॅग्रोवन समृद्ध शेती योजनेचे...नांदेड: `अॅग्रोवन’च्या माध्यमातून...
मराठवाड्यातील २९२ लघुप्रकल्प कोरडेऔरंगाबाद : मराठवाड्यातील ७४९ लघुप्रकल्पांपैकी २९२...
दक्षिण आशियात यंदा सर्वसामान्य मॉन्सून...पुणे  : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या...
कृषिउद्योग महामंडळाकडून ‘बायोकॅप्सूल’चा...पुणे : सेंद्रिय शेतीकडे वळालेल्या शेतकऱ्यांच्या...
शासन दरबारी रब्बी हंगामात नागपूर...नागपूर  : खरिपानंतर पाण्याअभावी रब्बी...
बीटी बियाणे १५ मेपूर्वी विक्रीस मनाईपुणे : राज्यातील बियाणे उत्पादक कंपन्यांनी १५...
जमिनीचे जैविक पृथक्करणआजकाल शेतकऱ्यांना मातीचा पृथक्करण अहवाल करून...
सांगलीतून १२ टन द्राक्षे निर्यातसांगली ः यंदा प्रतिकूल परिस्थतीतही जिल्ह्यातील...
काळजी घ्या : उन्हाच्या झळा वाढल्यापुणे : उन्हाच्या झळा वाढल्याने विदर्भ,...