उन्हाचा चटका कायम राहणार

उन्हाचा चटका कायम राहणार
उन्हाचा चटका कायम राहणार

पुणे : राज्यात उन्हाचा ताप वाढल्याने विदर्भ, मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट आली आहे. मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये वर्धा येथे देशातील उच्चांकी ४५.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात उन्हाचा चटका कायम राहणार असून, शुक्रवारपासून (ता. २५) कोकणात हलक्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.    विदर्भातील अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ आणि मध्य महाराष्ट्रातील मालेगाव, जळगाव येथे उष्णतेची लाट आली आहे. विदर्भात पारा ४५ अंशांच्या पुढे सरकला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील जळगाव, मालेगाव येथे सरासरी तापमानात ५ अंशांची वाढ झाल्याने लाटेची स्थिती असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. रविवारपर्यंत (ता. २७) अनेक ठिकाणी तापमान ४२ ते ४५ अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.  मध्य प्रदेशातील चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीपासून विदर्भ, मराठवाडा, कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा (द्रोणीय स्थिती) सक्रिय आहे. यामुळे मंगळवारी दुपारनंतर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हलके ढग गोळा झाले होते. शुक्रवारपासून कोकणात हलका पाऊस पडण्याची शक्यता असून, उर्वरित महाराष्ट्रात शनिवारपर्यंत मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.  मंगळवारी (ता. २२) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३८.७, नगर ४३.८, जळगाव ४४.२, कोल्हापूर ३४.९, महाबळेश्वर ३०.९, मालेगाव ४४.८, नाशिक ३७.८, सांगली ३६.४, सातारा ३८.५, सोलापूर ४१.८, मुंबई ३४.७, अलिबाग ३६.७, रत्नागिरी ३४.०, डहाणू ३५.४, आैरंगाबाद ४२.१, परभणी ४४.८, नांदेड ४४.०, अकोला ४५.६, अमरावती ४५.२, बुलडाणा ४१.७, ब्रह्मपुरी ४४.६, चंद्रपूर ४५.०, गोंदिया ४१.८, नागपूर ४५.२, वर्धा ४५.८, यवतमाळ ४५.५.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com