agriculture news in marathi, week Gap in Monsoon rainfall | Agrowon

पावसात आठवडाभर खंड
टीम अॅग्रोवन
बुधवार, 13 जून 2018

पुणे : मॉन्सून दाखल झाल्यानंतर कोकण किनारपट्टीवर पावसाने दमदार हजेरी लावली. राज्याच्या इतर भागात जोरदार पावसाची प्रतीक्षा असताना मॉन्सूनचा प्रवाह मंदावल्याने पावसाने उघडीप दिली आहे. आठवडाभर पावसात खंड पडण्याची शक्यता असून, शनिवारपर्यंत (ता.१६) तळकोकणात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार, तर मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. गुरुवारपासून (ता.१४) मराठवाड्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

पुणे : मॉन्सून दाखल झाल्यानंतर कोकण किनारपट्टीवर पावसाने दमदार हजेरी लावली. राज्याच्या इतर भागात जोरदार पावसाची प्रतीक्षा असताना मॉन्सूनचा प्रवाह मंदावल्याने पावसाने उघडीप दिली आहे. आठवडाभर पावसात खंड पडण्याची शक्यता असून, शनिवारपर्यंत (ता.१६) तळकोकणात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार, तर मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. गुरुवारपासून (ता.१४) मराठवाड्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणात पावसाचा जोर मंदावला होता, तर विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. दोडामार्ग, वेंगुर्ला, राजापूरमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या बहुतांशी भागात पावसाने उघडीप दिली होती. तर पूर्व विदर्भातील मुलचेरा, चामोर्शीसह काही ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली.

मुलचेरा येथे उच्चांकी १३० मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.  अरबी समुद्रावरील ढगांचे आच्छादन कमी झाले असून, राज्यात अंशत: ढगाळ हवामानामुळे ऊन सावल्यांचा खेळ सुरू आहे. कर्नाटकपासून केरळपर्यंत किनारपट्टीला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने तळकोकणात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस शक्य आहे. आज (बुधवारी) किनाऱ्यालगत तशी ३५ ते ४५ किलोमीटर वेगाने वारे वाहून समुद्र खवळणार असल्याने मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे, तर उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे.  

मंगळवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलीमीटरमध्ये - स्राेत हवामान विभाग) : 

  • कोकण : दोडमार्ग, वेंगुर्ला, राजापूर, कुडाळ प्रत्येकी ३०, सावंतवाडी, मुलदे, देवगड प्रत्येकी २०. कणकवली, गुहागर, वैभववाडी प्रत्येकी १०. 
  • मध्य महाराष्ट्र : महाबळेश्‍वर, राधानगरी प्रत्येकी २०, चंदगड, लोणावळा प्रत्येकी १०. 
  • मराठवाडा : चाकूर ८०, माहूर ५०, किनवट १०. 
  • विदर्भ : मुलचेरा १३०, चामोर्शी ११०, देसाईगंज ९०, रामटेक, गोंडपिंपरी प्रत्येकी ८०, अहेरी ७०, सडक अर्जुनी, मूल, साकोली प्रत्येकी ५०, अर्जुनी मोरगाव, तिरोरा, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, कुरखेडा, पोंभुर्णा, दर्यापूर प्रत्येकी ४०, पारशिवणी, अरमोरी, धानोरी, गडचिरोली, लाखनी, लाखंदूर प्रत्यकी ३०, उमरेर, भंडारा, नागभिर, सिंदेवाही, साकोली, चंद्रपूर, पवनी, तुमसर, मोहाडी प्रत्येकी २०.

इतर अॅग्रो विशेष
वेतन आयोग ठीक; पण शेतकरी आयोगाचे काय?१९४७ ते १९९० आणि १९९० ते २०१८ असे दोन भाग केले,...
वीजवापरातील ‘अंधार’वी ज दरवाढ तसेच शेती पंपासाठीची बिलं दुरुस्त करून...
परोपजीवी मित्रकीटकांची ओळखअळी-कोष-परोपजीवी (Larval-Pupal Parasitoid) या...
सांगलीत वाढली दुष्काळाची दाहकतासांगली : जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढत आहे....
साखर कारखान्यांचे बॉयलर लवकर थंडावणारपुणे  : दुष्काळी स्थितीमुळे साखर...
नंदुरबार बाजार समितीत ओल्या लाल मिरचीची...जळगाव  ः खानदेशात एकीकडे थंडीने केळीला मोठा...
ॲग्रोवन स्मार्ट ॲवॉर्डसाठी शेतकऱ्यांचा...पुणे : संकटांपुढे हार न मानता प्रतिकूल...
टंचाईग्रस्त विसापूर झाले पाणीदार सातारा जिल्ह्यातील माण व खटाव कायम तीव्र...
विदर्भात गारपिटीचा इशारा; राज्यात...पुणे : पावसाला पोषक हवामान होत असल्याने आजपासून (...
‘एफआरपी’ची थकबाकी ४० हजार कोटींपर्यंत...पुणे : साखर उद्योगात तयार झालेल्या संकटामुळे...
गूळ उद्योगाला आर्थिक स्थैर्य देणे...मुंबई : ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जपतानाच...
दुधाळ जनावरे वाटप योजनेत देशी गाईंचा...पुणे : देशी गोवंशाच्या संवर्धनासाठी संकरित दुधाळ...
बांबूशेतीमध्ये शेतकऱ्यांचे अर्थकारण...सोलापूर : ‘‘बांबू हे गवतवर्गीय पीक आहे....
‘ई-नाम’द्वारे देशातील बाजार समित्या...मुंबई : देशातील सर्व बाजार समित्या ‘ई-नाम’...
वेतन आयोगाने वाढते गरीब-श्रीमंतांतील दरीमाजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी ४ ...
दूध दरवाढीसाठीही दाखवा तत्परताआंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटीचे (पावडर) दर...
मक्यातील लाग रंग येण्यामागील गूढ उलगडलेमक्यामध्ये काहीवेळा दिसणाऱ्या लाल रंगाच्या...
एफआरपी तुकड्यात घेणार नाही : खासदार...सांगली : राज्यातील साखर कारखाने सुरू होऊन ८० दिवस...
राज्यात १७८६ टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे  : सलग दोन वर्षे पावसाने ओढ दिल्यानंतर...
केळी पट्ट्याला १५० कोटींचा फटकाजळगाव ः डिसेंबर व जानेवारी महिन्यातील थंडीचा...