नाशिकला टोमॅटो ४५५ ते १६३५ रुपये क्विंटल
ज्ञानेश उगले
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

टोमॅटोची आवक वाढलेली आहे. या स्थितीत पाकिस्तानकडे जाणाऱ्या सीमा बंद असल्याने देशातील टोमॅटोचा निपटारा होत नाही आहे. याबाबतीत केंद्र शासनाने हस्तक्षेप करणे आवश्‍यक आहे. सद्यःस्थितीत टोमॅटो क्रेटला सरासरी २२५ रुपये दर मिळतो आहे. पाकिस्तानची सीमा टोमॅटोसाठी खुली झाली तर या दरात अजून वाढ होईल.

- संजय पाटील, सचिव, पिंपळगाव बसवंत बाजार समिती. 

नाशिक : नाशिक, नगर जिल्ह्यातून वाढलेली आवक, बांगलादेशातून होणारी स्थिर मागणी या स्थितीत गतसप्ताहात टोमॅटोचे दर ४५५ ते १६३५ रुपये, तर सरासरी १०५५ रुपये क्विंटल यादरम्यान स्थिर राहिले. 
 
नाशिकच्या पिंपळगाव बसवंत बाजार समितीत दिवसाला ३५ हजार क्विंटल टोमॅटोची आवक झाली. नाशिक व नगर जिल्ह्यातील इतरही बाजार समित्यात आवक वाढतीच होती. दरम्यान, येत्या सप्ताहात बांगलादेशात जाणारा माल मोहरमच्या सुटीमुळे बंद राहणार आहे. या काळात देशांतर्गत बाजारपेठेतून होणारी मागणी, तसेच दरही स्थिर राहतील, असे जाणकारांनी सांगितले.
 
मागील पंधरवड्यात राज्यातील टोमॅटो उत्पादक जिल्ह्यातून बांगलादेशात पाठविल्या जाणाऱ्या टोमॅटोत दुपटीने वाढ झाली आहे. परिणामी मागणीच्या तुलनेत आवक वाढली. या स्थितीत टोमॅटोला प्रति २० किलोला ५० ते ३५० रुपये, तर सरासरी १८० रुपये दर मिळाला. गतसप्ताहातही दराचे हेच चित्र बाजारात होते.
 
कर्नाटक व महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात खरीप व लेट खरीप टोमॅटोची लागवड होते. दरवर्षी कर्नाटक राज्यातील हंगाम आटोपल्यानंतर महाराष्ट्रातील हंगाम सुरू होतो. यंदा नेहमीप्रमाणे महाराष्ट्रातील हंगाम ऑगस्ट महिन्यापासून सुरू झाला. दरम्यान, सप्टेंबर अर्धा होऊनही कर्नाटक राज्यातील हंगाम सुरू आहे. मध्य प्रदेशातील शिवपुरी बाजारातही टोमॅटोची आवक वाढली आहे. याचदरम्यान महाराष्ट्रातील नाशिक व नगर या टोमॅटोच्या आगारात टोमॅटोची आवक वाढलेली आहे.
 
नाशिकच्या पिंपळगाव बसवंत बाजार समितीत ऑगस्ट महिन्यात सरासरी ६० हजार क्रेटची आवक होती. त्यादरम्यान १५ ऑगस्टनंतर चार दिवस प्रति २० किलोचे दर १०० ते १२०० रुपये, तर सरासरी ५५० रुपये होते. ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यानंतर आवकेत वाढ होत गेली. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून बाजारात सरासरी २० किलो वजनाच्या सरासरी दीड लाख क्रेटची आवक झाली. या स्थितीत बांगलादेशमधील बाजारपेठेतून होणारी आवक स्थिर आहे. दरम्यान, दर प्रति २० किलोला ५० ते ३५० रुपये, तर सरासरी १८० पर्यंत स्थिर झाले आहे.
 
मागील सप्ताहात या आवकेत काहीशी घट झाली आहे. मोहरमच्या सुटीमुळे माल बांगलादेशात जाऊ शकणार नसल्याने व्यापाऱ्यांनी खरेदीसाठी हात आखडता घेतला आहे. बाजाराच्या स्थितीचा अंदाज घेत शेतकऱ्यांनीही माल बाजारात कमी आणला होता. येत्या सप्ताहातही शेतकऱ्यांना हेच नियोजन करावे लागणार आहे. 
शुक्रवारी (ता.२२) मोहरम होता. यामुळे शुक्रवार (ता. २२) ते शनिवार (ता. ३०) या दरम्यान बांगलादेशकडे जाणारा माल दरवर्षी बंद होतो. त्याचाही परिणाम बाजारावर झाला आहे.
 
बांगलादेशासाठी माल पाठविणाऱ्या बहुतांश मोठ्या व्यापाऱ्यांनी टोमॅटो खरेदीसाठी हात आखडता घेतला आहे. पाकिस्तान हा भारतीय टोमॅटोचा आयातदार देश आहे. मागील वर्षापासून सीमा बंद असल्याने टोमॅटो मालाचा निपटारा होऊ शकत नाही. या स्थितीत टोमॅटोचे मार्केट सप्टेंबरअखेरपर्यंत स्थिर राहील. ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून नवीन माल बाजारात येईल. त्या काळात मागणी व दरात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्‍यता असल्याचे जाणकारांनी सांगितले. 

इतर ताज्या घडामोडी
संत गजानन महाराज संस्थान करतेय...शेगाव, जि. बुलडाणा : शिस्त, सेवा अाणि समाज...
परभणीतील शेतकऱ्यांना कर्जमाफी... परभणी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
राज्यातील बहुतांशी भागांत उकाडा वाढलापुणे : परतीचा पाऊस राज्यातून गेल्याने बहुतांशी...
कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक ः सदाभाऊ खोत कोल्हापूर : शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नयेत...
कर्जमाफी शेतकऱ्यांना ताकद देणारी ः... बुलडाणा : राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज...
अपयश लपविण्यासाठी भाजपकडून खोटी...मुंबई: दुसऱ्या टप्प्यातील ३७०० ग्रामपंचायतींच्या...
औरंगाबादेत २९ ऑक्‍टोबरला 'मराठा महासभा' औरंगाबाद : मराठा समाजातर्फे राज्यभर 57 मोर्चे...
नागपुरात सोयाबीन प्रतिक्‍विंटल २७५०...नागपूर ः बाजारात सोयाबीनच्या दरात होणाऱ्या किरकोळ...
केवळ अमळनेरलाच कडधान्य खरेदी केंद्र सुरू जळगाव  ः जिल्ह्यात मंगळवारपर्यंत (ता. १७)...
परभणीत प्रतिक्विंटल टोमॅटो १२०० ते १८००...परभणी ः येथील कृषी उत्पन्न बाजार...
आयुर्वेदिक रेसिपींच्या आस्वादासाठी...पुणे ः आयुर्वेदात उल्लेख असलेल्या...
परभणी जिल्ह्यात कृषी विभागातील ३१ टक्के...परभणी ः परभणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी...
वाटाणा लागवड कधी करावी?वाटाणा लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगल्या...
नागपूर ३६.४ अंशांवरपुणे : राज्यातील काही भागांत कमाल तापमानात वाढ...
कोल्हापुरात भाजीपाल्याचे दर वधारलेकोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
जळगावात उडदाची आवक घटलीजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवड्यात...
नाशिकला टोमॅटोची आवक निम्म्याने घटलीनाशिक : नाशिक जिल्ह्यात ऑक्‍टोबरच्या पहिल्या...
उत्पादकता घटल्याने फूल मार्केटमध्ये...नागपूर : परतीच्या पावसाचा फटका बसल्याने या वर्षी...
मंचर बाजार समितीत कटतीद्वारे लूटपुणे : पालेभाज्यांसाठी आणि विशेषतः काेथिंबीरीसाठी...
नांदेड विभागात ३३ कारखान्यांच्या...परभणी : नांदेड विभागातील ५ जिल्ह्यांतील ३३ साखर...