agriculture news in marathi, weekly polultry analysis | Agrowon

ब्रॉयलर्सच्या बाजारभावात चढ-उतार, सुधारणा अपेक्षित
दिपक चव्हाण
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018
सध्याच्या पातळीपेक्षा अधिक खाली बाजार जाणार नाही. शेजारी राज्यांत चांगली परिस्थिती आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील बाजारातही सुधारणा होण्यास वाव आहे.
- डॉ. अजय देशपांडे, पोल्ट्री उद्योजक, पुणे.
ब्रॉयलर्सच्या बाजारात सध्या अस्थिरता दिसत आहे. तथापि, ६० रुपये प्रतिकिलोच्या खाली बाजार जाताच किरकोळ खप वाढतोय. महाराष्ट्राच्या शेजारी राज्यांत बाजार उंचावले आहेत. यामुळे येत्या दिवसांत राज्यातील बाजारभावांत सुधारणा होण्यास वाव आहे.
 
गेल्या आठवड्यात बेंचमार्क नाशिक बाजारात ५५ प्रतिकिलो दराने लिफ्टिंग झाले. मागील आठवड्यातील ६५ रुपये पातळीवरून बाजार पुन्हा दहा रुपयांनी उतरला आहे. पुणे विभागात अंड्यांचे बाजारभाव देखील गेल्या आठवड्यातील पातळीवरुन सुमारे दहा टक्क्यांनी नरमले आहेत.
 
पुणेस्थित योजना पोल्ट्री संचालक राजू भोसले म्हणाले, की गेल्या महिनाभरापासून रविवारचा चिकनचा खप रोडावत चालल्याचे निरीक्षण आहे. सरासरी खपाच्या तुलनेत १५ टक्के कमी विक्री होत आहे. महिनाभरापूर्वी रविवारी या सर्वाधिक खपाच्या दिवशी दुकानासमोरील रांगा हटत नव्हत्या. मात्र, चालू महिन्यातील सर्व रविवारी खरेदीत नेहमीसारख्या रांगा दिसल्या नाहीत. अजून उन्हाळ्याचा प्रभाव नसला तरी परीक्षांचा हंगाम सुरू झाल्यामुळे एकूण संस्थात्मक खपात घट येऊ शकते." योजना पोल्ट्रीद्वारेत थेट चिकन विक्री केली जाते.
 
पोल्ट्री उद्योजक पांडुरंग सांडभोर म्हणाले, की पुण्यासह महाराष्ट्रात चिकन विक्री करणाऱ्या दुकानांची संख्या वाढली आहे. त्यामुळे विक्री विभागली गेलीय. या प्रक्रियेत दुकानावरची विक्री कमी दिसत असली तरी ठोक विक्रीत नेहमीप्रमाणे माल जातोय. मधल्या काळात काही नकारात्मक बातम्यांमुळे विक्री कमी झाली होती. मात्र, आता खप पूर्ववत झाला आहे. 
 
ते म्हणाले, की मागील आठवड्यातील बाजारातील वाढ-घट ही मागणी पुरवठ्याच्या खेळामुळे झाली आहे. यातील सकारात्मक बाब अशी की, किरकोळ विक्रीतील स्पर्धेमुळे मोठ्या शहरातील बोर्ड रेट हलताना दिसत आहेत. ज्या ज्या वेळी लिफ्टिंग रेट ६० रुपये प्रतिकिलोच्या खाली जातो, त्या त्या वेळी किरकोळीचे दर कमी होतात. त्या माध्यमातून चिकनचा खप १५ ते २० टक्के वाढतो. येत्या दिवसांत बाजारभावात पुन्हा सुधारणा होईल.
 
फलटण विभागात देशी (डीपी) कोंबडीचा लिफ्टिंग दर ११० रुपये प्रतिकिलो आहे. ग्रामीण भागात जत्रांचा हंगाम सुरू झाला आहे. यामुळे देशी पक्ष्यांचा खप आणि दर टिकून राहतील किंवा त्यात सुधारणाही होऊ शकेल, असे श्री. सांडभोर यांनी सांगितले.
 
अमरावती येथील आगत हॅजरिजचे संचालक सुनील झोंबाडे म्हणाले, की विदर्भातील ग्रामीण व निमशहरी भागातील किरकोळ विक्री नेहमीप्रमाणे सुरळीत आहे. नाशिक विभागातील दर कमी झाल्याने त्याचा प्रभाव विदर्भातील बाजारावरही झाला आहे. सध्याच्या मंदीमुळे नवे प्लेसमेंट थोडे घटले आहे. याशिवाय अमरावती विभागात कमी प्रमाणात पाऊस झाला असून, त्या अनुषंगाने विदर्भात भूजलाची उपलब्धता कमी राहणार असल्यानेही प्लेसमेंटवाढीबाबत शेतकरी उत्साही नाहीत.

 

प्रकार भाव परिमाण बाजारपेठ
ब्रॉयलर ५५ प्रतिकिलो नाशिक
चिक्स ३५ प्रतिनग पुणे
हॅचिंग एग्ज ३३.५ प्रतिनग मुंबई
अंडी ३७५ प्रतिशेकडा पुणे
मका ११५० प्रतिक्विंटल देवळा
सोयामील ३१७५१ प्रतिटन इंदूर

 

 

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
शेतमालाला भाव न देणारे उत्पन्न दुप्पट...भंडारा : शेतमालाला भाव नसल्याने अधिक...
भाजप हा उमेदवार आयात करणारा पक्ष : रावतेनागपूर : भाजप हा उमेदवार आयात करणारा पक्ष...
कृषी सल्ला : भात, भुईमुग, आंबा,...भात ः सध्या रोपवाटिकेसाठी शेतकऱ्यांनी तयारी सुरू...
द्राक्ष बागेत रोगांच्या प्रादुर्भावाची... सर्व द्राक्ष विभागांमध्ये...
कृषी तंत्रज्ञान पदविका अभ्‍यासक्रम...मुंबई : राहुरी येथील महात्मा फुले कृषी...
सातारा जिल्ह्यात आले लागवडीस गतीसातारा  ः उष्णतेत वाढीमुळे रखडलेल्या आले...
शेतकऱ्यांना मिळणार पाच रुपयांत पोटभर...लातूर  : शंभर-दीडशे किलोमीटर अंतरावरून आपला...
रोहित्राच्या बाॅक्समधील फ्यूज तारांच्या...परभणी ः जिल्ह्यातील कृषी पंपाना वीजपुरवठा...
नष्ट होत असलेल्या देशी वाणांचे संवर्धन...पुणे ः हरितक्रांतीच्या नादात अधिक उत्पादनाच्या...
यवतमाळ जिल्ह्यात फळबागांनी टाकल्या मानायवतमाळ  : कडाक्‍याच्या उन्हामुळे...
कागदपत्रांची पूर्तता करूनही लिलाव बंद...मालेगाव, जि. नाशिक  : मालेगाव कृषी उत्पन्‍न...
शेतकऱ्यांना ‘करार शेती’च्या माध्यमातून...नवी दिल्ली : शेतमालाचा बाजार आणि किंमतीतील...
सोलापूर बाजार समितीत ३९ कोटींचा...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत...
साताऱ्यात गवार २०० ते ३०० रुपये दहाकिलोसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
देशात सर्वांत महाग पेट्रोल धर्माबादला,...नांदेड : नांदेड जिल्ह्याच्या तेलंगणा व...
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...