agriculture news in marathi, weekly polultry analysis, pune, maharashtra | Agrowon

वाढत्या पुरवठ्यामुळे ब्रॉयलर्सचा बाजार दबावातच
दिपक चव्हाण
मंगळवार, 21 नोव्हेंबर 2017
डिसेंबरअखेरपर्यंत बाजार फारसा किफायती राहणार नाही. पण, जानेवारी ते मार्च या ९० दिवसांतील सरासरी दर चांगला राहील व चालू तिमाहीतील तोटा भरून निघण्यास मदत होईल.
- डॉ. अजय देशपांडे, पोल्ट्री उद्योजक, पुणे.

सध्या ब्रॉयलर्स पक्ष्यांना थंडीमुळे जोरदार उठाव असला तरी मागणीतील वाढीपेक्षा पुरवठ्यातील वाढ विविध कारणांमुळे अधिक राहत आहे. त्यामुळे बाजारभाव दबावात आहेत. दुसरीकडे अंड्यांचे दर नव्या उच्चांकावर पोचले आहेत.

शनिवारी (ता. १८) बेंचमार्क नाशिक विभागात अडीच किलो वजनाच्या ब्रॉयलर्स पक्ष्यांना ५५ रुपये तर तीन किलो ब्रॉयलर पक्ष्यांना ५१ रुपयांपर्यंत दर मिळाला. पुणे विभागात अंड्यांचे फार्म लिफ्टिंग दर आजवरच्या उच्चांकी अशा ५६० रुपये प्रतिशेकडा या नव्या उच्चांकावर पोचले आहेत.
 
ब्रॉयलर्स बाजारासंदर्भात पुण्यातील पोल्ट्री उद्योजक डॉ. अजय देशपांडे म्हणाले, की सध्या प्लेसमेंटच्या रुपाने दहा टक्के तर वजनांच्या रुपाने वीस टक्के अशी तीस टक्के उत्पादनवाढ बाजारात दिसत आहे. दरवर्षी ब्रॉयलर्सची मागणी आठ ते दहा टक्क्यांनी वाढत असते. सध्या ऐन हंगामात मागणीपेक्षा उत्पादनवाढ जास्त झाल्यामुळे बाजारभाव दबावात आहे. मार्गशीर्ष महिन्यामुळे घरगुती मागणीत घट होईल. तथापि या काळात पुरवठा संतुलित ठेवण्याचे नियोजन केले आहे. 
 
डॉ. देशपांडे म्हणाले, की नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात हिवाळ्यातील अनुकूलतेमुळे ब्रॉयलर पक्ष्यांची वजने अपेक्षेपेक्षा चांगली येतात. त्या माध्यमातून बाजारात पुरवठा वाढतो. तथापि, अतिथंडीमुळे ब्रडिंग काळात लहान पिलांची मरतूक मोठ्या प्रमाणावर होत असते. खास करून उत्तर भारतात उत्पादन कमी होत असते. त्यामुळे हिवाळा हा ब्रॉयलर पोल्ट्रीसाठी सर्वस्वी अनुकूल असतो, असे म्हणणे सयुक्तिक ठरणार नाही. लहान पक्ष्यांच्या दृष्टीने हा काळ प्रतिकूल असतो. त्यामुळे फेब्रुवारी-मार्च या काळात उत्पादन नियंत्रित होत असते.
 
 डिसेंबरअखेरपर्यंत बाजार फारसा किफायती राहणार नाही. पण, जानेवारी ते मार्च या ९० दिवसांतील सरासरी दर चांगला राहील व चालू वर्षाअखेरीतील तिमाहीतील तोटा भरून निघण्यास मदत होईल. नव्या वर्षातील पहिल्या तिमाहीत संस्थात्मक उत्पादन वाढण्याला फार मोठी जागा नाही. या एका दिवसांच्या पिलांच्या पुरवठ्यात मोठी वाढ दिसत नाही. इच्छा असूनही प्लेसमेंट वाढवता येणार नसल्यामुळे उत्पादन संतुलित राहील, असे डॉ. देशपांडे यांनी सांगितले.
 
हिवाळ्यातील मागणीमुळे या वर्षी अंड्यांच्या भावाने नवा उच्चांक गाठला आहे. बाजाराने प्रथमच प्रतिशेकडा पाचशेचा टप्पा पार करून ५६० इतक्या विक्रमी भावाची नोंद केली आहे. या वेळी कच्चा माल स्वस्त मिळत असल्याने प्रथमच मार्जिनमध्येही उच्चांकी वाढ झाली आहे. बाजारभावासंदर्भात अमरावती येथील
 
ज्येष्ठ लेअर उद्योजक रवींद्र मेटकर म्हणाले, की अंड्यांना उच्चांकी भाव मिळत असला तरी सध्याच्या रेटमध्ये मालास उठाव नाही. तीन-चार दिवसांचा माल पडून आहे. ट्रेडर्सकडून सध्याच्या भावात मोठी मागणी नसून, किरकोळ विक्रीत घट होत असल्याचे दिसते."
 
प्रकार भाव परिमाण बाजारपेठ
ब्रॉयलर ५५ प्रतिकिलो नाशिक
अंडी ५६० प्रतिशेकडा पुणे
चिक्स ४० प्रतिनग पुणे
हॅचिंग एग्ज ३३.५ प्रतिनग मुंबई
मका १२५० प्रतिक्विंटल सांगली
सोयामिल २१,००० प्रतिटन इंदूर
 
टॅग्स

इतर अॅग्रो विशेष
शेतकरी मंडळामुळे मिळाला ९० लाखांचा...वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : बॅंकेच्या चुकीमुळे...
कोंबडा झाकला तरी...मा  गील सात वर्षांत कृषी आणि सलग्न क्षेत्रातील...
शेतकऱ्यांची दैनावस्था दूर करणारा...गेल्या अनेक वर्षांत शेती आणि शेतकऱ्यांची जी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने अनेक ठिकाणी...
शिल्लक साखरेचा दबाव पुढील हंगामावर?कोल्हापूर : केंद्राने सुरू केलेल्या कोटा...
‘सॉर्टेड सिमेन’चा प्रयोग यशस्वीनगर : गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका...
जांभरुण परांडे गावात जन्माला आली...अमरावती : जांभरुण परांडे (जि. वाशीम) येथे...
शेतकऱ्यांना व्यापार संधी उपलब्ध होणारपुणे : राज्यात फळे भाजीपाल्याचे वाढते...
राज्यात आजपासून हरभरा खरेदी परभणी : नाफेड आणि विदर्भ सहकारी विपणन महासंघाच्या...
बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांत चारा...औरंगाबाद : मराठवाड्यातील बीड व...
वर्षावनातील विविधतेसाठी किडी,...संशोधकांना उष्ण कटिबंधीय वर्षावनातील विविधतेने...
पशुधन सहायकांच्या पदोन्नतीप्रकरणात...नागपूर : निकष डावलून राज्यातील पशुधन सहायकांना...
तमिळनाडूतील १११ शेतकऱ्यांचे मोदींना...तिरुचिरापल्ली, तमिळनाडू : विविध मागण्यांकडे...
शेतीला मिळाली बीजोत्पादनाची साथबोरी (ता. जिंतूर, जि. परभणी) गावशिवारात चंद्रशेखर...
भर दुष्काळात राज्यातील शेळ्या-मेंढ्या...नगर ः दुष्काळी भागातील जनावरे जगवण्यासाठी छावण्या...
पपईच्या बनावट बियाणेप्रकरणी चौघांना अटककोल्हापूर : नामवंत कंपनीच्या पपई बियाण्यांच्या...
उन्हाचा चटका वाढणार; नांदेडला तुरळक...पुणे : विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाने...
वऱ्हाडात फळबागांवर चालू लागल्या कुऱ्हाडीअकोला : दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्यांचे जगणे...
'जलवर्धिनी' करतेय लोकशिक्षणातून जल...जलवर्धिनी प्रतिष्ठानतर्फे पाण्याचे संधारण आणि...
आज शिवजयंती : शिवनेरीवर पारंपारिक...पुणे : फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार आज (ता....