दक्षिण आफ्रिकेतील स्टेल्लेनबाऊच विद्यापीठातील जीवशास्त्रज्ञ कॉर्नेली मिन्नार यांनी कीटकां
अॅग्रोमनी
संतुलित पुरवठ्यामुळे महाराष्ट्रात श्रावण महिन्यातही ब्रॉयलर्सचे बाजारभाव तेजीत आहेत. चालू आठवड्यात शेजारील राज्यांतील खपात सुधारणा अपेक्षित असून, महाराष्ट्रातील रेट्स सध्याच्या पातळीवर स्थिर राहण्याचे अनुमान तज्ज्ञांनी दिले आहेत.
संतुलित पुरवठ्यामुळे महाराष्ट्रात श्रावण महिन्यातही ब्रॉयलर्सचे बाजारभाव तेजीत आहेत. चालू आठवड्यात शेजारील राज्यांतील खपात सुधारणा अपेक्षित असून, महाराष्ट्रातील रेट्स सध्याच्या पातळीवर स्थिर राहण्याचे अनुमान तज्ज्ञांनी दिले आहेत.
नाशिक विभागात शनिवारी (ता. १८) ७० रु. प्रतिकिलोने ब्रॉयलर्स पक्ष्यांचे लिफ्टिंग झाले. नाशिकस्थित व्हिनस पोल्ट्रीचे संचालक डॉ. अनिल फडके यांनी मागणी पुरवठ्यातील तफावतीकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, ‘गेल्या आठवड्यापूर्वी आम्ही ६० रु. प्रतिकिलोच्यावर बाजारभाव राहील, असे अनुमान दिले होते. प्रत्यक्षात बाजारभाव ७० रु.च्या वर गेला. याचे कारण पुरवठ्यात खूपच मोठी घट झालीय. मोठ्या पक्ष्यांचा कॅरिओव्हर स्टॉक कमी प्रमाणात असून, सध्याच्या रेट्स चालू आठवड्यातही टिकून राहतील. मागील काही वर्षांतील श्रावण महिन्याचा अनुभव लक्षात घेता प्रमुख इंटिग्रेटर्सनी उत्स्फूर्तपणे उत्पादन कमी राखले आहे. ओपन फार्मर्सकडेही खूपच कमी माल आहे. श्रावण महिन्यात ब्रॉयलर पोल्ट्री उद्योगाने पुरवठ्याचे चांगले संतुलन राखले ही स्वागतार्ह बाब आहे. सध्या चिकनचा रिटेल खप ४५ टक्क्यांपर्यंत घटला आहे. चालू आठवड्यात बकरी ईदमुळे खपवाढीला चालना मिळेल,’ असेही डॉक्टर फडके यांनी नमूद केले.
कोमरला समूहाचे संचालक कृष्णचरण म्हणाले, ‘आठवडाभरात ब्रॉयलर मार्केट १२ रु. प्रतिकिलोने वधारलेय. उत्पादनविषयक संतुलित नियोजनाचे हे यश आहे. पक्ष्यांची वजने सव्वा दोन किलोपर्यंत कमी झाली आहेत. दक्षिण भारतातील बाजारभाव ६५ ते ६७ दरम्यान स्थिरावले आहेत. हैदराबाद विभागात आठवड्याच्या शेवटी रेट्स वरच्या दिशेने ट्रेड झाले. केरळात महापूरामुळे तमिळनाडूतील पक्ष्यांची आवक थांबली आहे. त्याचा प्रभाव दक्षिणेतील मार्केट्वर दिसत आहे.’
खडकेश्वर हॅचरीजचे संचालक संजय नळगीरकर म्हणाले, ‘उन्हाळ्यातील तेजीची झलक ऐन श्रावणात पाहण्यास मिळाली आहे. खरे तर मागणीच्या प्रमाणात प्लेसमेंट झाली होती. मात्र, पक्ष्यांची वजने नियंत्रणात असल्याने किफायती रेट्स मिळत आहेत. जर सर्व पोल्ट्री इंटिग्रेटर्सनी पक्ष्यांची वजने सव्वा दोन किलोच्या आत ठेवली तर बाजार चांगलाच मिळतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झालेय. दक्षिण व उत्तर भारताच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक रेट्स आहेत. येथून पुढेही पक्षी होल्ड न करता विकत रहावेत. मागणीच्या तुलनेत हॅचिंग एग्ज आणि चिक्सचा पुरवठा कमी असून, चालू आठवड्यात त्यांचे रेट्स वाढू शकतात. पुढील आठवड्यात केरळातील पुरस्थिती नियंत्रणात येणे अपेक्षित असून, तसे झाल्यास दक्षिणेतील ब्रॉयलर रेट्स वेगाने वाढतील. बहुतांश पोल्ट्री फार्म पावसामुळे प्रभावित झाले आहेत.’
‘चालू आठवड्यात महाराष्ट्रातील ब्रॉयलर्स मार्केट स्थिरावेल. उत्तर भारतातील श्रावण महिन्याच्या शेवटचा आठवडा असून, त्यामुळे खपात सुधारणा होईल. गुजरातमधील बाजाराला त्यामुळे आधार मिळेल,’ असे ज्युपिटर अॅग्रोचे संचालक डॉ. सीताराम शिंदे यांनी सांगितले.
प्रकार | भाव | परिमाण | बाजारपेठ |
ब्रॉयलर | ७० | प्रतिकिलो | नाशिक |
चिक्स | २१ | प्रतिनग | पुणे |
हॅचिंग एग्ज | १८ | प्रतिनग | मुंबई |
अंडी | ३०५ | प्रतिशेकडा | पुणे |
संपूर्ण पोल्ट्री उद्योगाने श्रावणात ग्राहकांचा कल लक्षात घेऊन संतुलित पुरवठा केल्यामुळे प्रथमच श्रावणात उत्पादन खर्चापेक्षा अधिक रेट्स मिळत आहेत.
- कृष्णचरण, कोमरला समहू, सांगली.
- 1 of 18
- ››