वजनरूपी पुरवठ्यात वाढ; बाजारात नरमाई

श्रावणातील पहिल्या पंधरवड्यात ब्रॉयलर्सला किफायती दर मिळाले. दुसऱ्या पंधरवड्यात दर नरमले आहेत. वजनरूपी पुरवठ्यात सातत्याने वाढ होत आहे. पुरवठ्यातील वाढ आणि सणासुदीच्या काळामुळे बाजारभाव दबावात राहण्याची चिन्हे आहेत.
साप्तहिक पोल्ट्री विश्लेषण
साप्तहिक पोल्ट्री विश्लेषण

नाशिक विभागात शनिवारी (ता. १) ६२ रु. प्रतिकिलो दराने लिफ्टिंग झाले. मागील आठवड्याच्या तुलनेत दहा टक्क्यांनी बाजारभाव नरमले आहेत. नाशिकस्थित स्वप्निल ॲग्रोचे संचालक वैभव पवार म्हणाले, की रविवारी श्रीकृष्ण जन्माष्टमीमुळे चिकनची विक्री घटली. परिणामी शनिवारी लिफ्टिंग कमी झाले. पुढील काळात पुरवठा वाढण्याचे चित्र दिसत आहे. सध्याची प्लेसमेंट ही दसरा सणाच्या आसपास निघेल. त्यामुळे चिक्सला चांगली मागणी असून, त्यांचे दरही उंचावले आहेत. पुणेस्थित योजना पोल्ट्रीचे संचालक राजू भोसले म्हणाले, की यापुढील काळात ब्रॉयलर्सच्या बाजारभावात साशंकता वाटतेय. कारण उत्पादन चांगले येईल, असे दिसते. हॅचिंग एग्ज आणि पिलांचा कुठेही तुटवडा दिसत नाही. किंबहुना मागणीपेक्षा काहीसा पुरवठा अधिक आहे. त्यामुळे बाजारभावाविषयक चित्र सकारात्मक दिसत नाही. पुढील महिन्यात ऑक्टोबर हीटमुळे नैसर्गिकरीत्या उत्पादन कमी झाले, तर पुरवठा संतुलित होऊ शकतो किंवा मंदीमुळे नैसर्गिकरीत्या उत्पादन कमी केले तरच बाजारभाव संतुलित होतील. श्रावण संपल्यानंतर खप वाढीला मदत होणार असली तरी त्यासाठीचा अवधी कमी दिवसांचा आहे. ता. ९ रोजी श्रावण महिन्याचा कालावधी संपत आहे. मात्र, १३ सप्टेंबरपासून गणेशाेत्सव सुरू होत आहे. श्रावणाप्रमाणेच गणेशाेत्सवात घरगुती खप मोठ्या प्रमाणावर घटतो. परिणामी बाजारभावार दबाव दिसतो. गेल्या वर्षी गणेशाेत्सव संपल्यानंतर तत्काळ बाजारभावात सुधारणा झाली होती. या वर्षी त्याची पुनरावृत्ती व्हायला हवी असेल, तर पुरवठा आणि वजने नियंत्रणात असणे गरजेचे आहे. ता. २३ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर या कालावधीत पुन्हा खप वाढीला चालना अपेक्षित आहे. १० ऑक्टोबरपासून घटस्थापना आणि नवरात्र सुरू झाल्यानंतर खपात पुन्हा मोठी घट होईल. खास करून गुजरात राज्यात नवरात्र काळात श्रावणाप्रमाणेच खपात मोठी घट होत असते. दरवर्षी काही अपवाद वगळता नवरात्रात बाजारभाव मंदीत असतात. त्यामुळे या कालावधीसाठी ओपन फार्मर्स प्लेसमेंट कमी ठेवतात. श्रावण ते नवरात्र या काळातील सरासरी बाजारभाव हे उत्पादन खर्चापेक्षा कमी असतात. त्यामुळे या काळात पुरवठा संतुलित ठेवण्याचे आव्हान पोल्ट्री उद्योगसमोर असते. अनेकदा या कालावधीत सप्लाय ग्लट नोव्हेंबरअखेरपर्यंत टिकतो. गेल्या काही वर्षांत डिसेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून बाजारभावात सुधारणेचा कल दिसला आहे.    

प्रकार भाव परिमाण बाजारपेठ
ब्रॉयलर ६२ प्रतिकिलो नाशिक
चिक्स २७ प्रतिनग पुणे
हॅचिंग एग्ज २१ प्रतिनग मुंबई
अंडी ३१७ प्रतिशेकडा पुणे

रविवार (ता. १) रोजी पुणे विभागात ३१७ रु. प्रतिशेकडा दराने टेबल एग्जचे लिफ्टिंग झाले. गेल्या आठवड्याच्या तुलनेत बाजारात सुधारणा आहे. श्रावणाच्या शेवटच्या आठवड्यापासून खपात सुधारणा दिसते. बाजारभावातही त्याचे रुपांतर दिसत आहे. ऑगस्ट महिन्यात ३३८ रु. प्रतिशेकडा सरासरी  लिफ्टिंग दर होता. सध्याच्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत लिफ्टिंग दर फारसा किफायती नव्हता. राज्यात काही विभागात पेपर रेटपेक्षा खूपच कमी दराने व्यापाऱ्यांनी बोली लावली. काही ठिकाणी पावणेतीनशे रु.पर्यंत बाजारभाव घसरले होते. राज्यातील वाढते उत्पादन आणि बाहेरील राज्यांतील स्वस्त मालाची आवक हे पुढील काळात बाजारभावाच्या दृष्टीने आव्हानात्मक ठरणार आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com