दक्षिणेत बाजार सावरला; महाराष्ट्रातही सुधारणा अपेक्षित

मधल्या काळात व्हॉट्सअॅपद्वारे चिकनबाबत अपप्रचार पसरवले गेल्याने खप कमी झाला होता. मात्र, त्यातील फोलपणा ग्राहकांच्या लक्षात आला असून, आता विक्री पूर्ववत होताना दिसत आहे. - डॉ. अजय देशपांडे, पोल्ट्री उद्योजक, पुणे.
पोल्ट्री
पोल्ट्री

विविध कारणांमुळे मंदीत असलेला ब्रॉयलर्सच्या बाजाराने गेल्या आठवड्यात तिमाहीतील नीचांकी पातळी गाठली. मात्र, दक्षिण भारतासह महाराष्ट्रामध्ये कमी झालेला खप आता पूर्ववत होत असून, बाजारभावातही सुधारणा दिसेल, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. शनिवारी (ता. १० ) रोजी बेंचमार्क नाशिक विभागातील दर ५५ रु. प्रतिकिलोपर्यंत खाली गेले. गेल्या पंधरवड्यापासून बाजारभाव सातत्याने दबावात राहत आहेत. या संदर्भात, पुण्यातील पोल्ट्री उद्योजक डॉ. अजय देशपांडे म्हणाले, की आठवड्याच्या पहिल्या दिवशी ( ता. ११) एकादशी आणि मंगळवारी (ता. १३) महाशिवरात्री आहे. यामुळे विक्रीमध्ये थोडी नरमाई दिसेल. मात्र, दक्षिण भारतातील बाजारभाव सुधारत आहे. तेथे मागणीच्या प्रमाणात उत्पादन नियोजनाचा प्रभाव चालू आठवड्यापासून दिसेल. बुधवारपासून खप आणि बाजारभाव दोन्हींत सुधारणा अपेक्षित आहे. वातावरण अजून तापत नसून, पक्ष्यांची वजने वेगाने येत आहेत. तशातच प्रतिकूल हवामानामुळे पक्ष्यांची विक्री वाढतेय. त्यामुळे बाजारभाव दबावात होते. मधल्या काळात व्हॉट्सअपद्वारे चिकनबाबत अपप्रचार पसरवले गेल्याने खप कमी झाला होता. मात्र, त्यातील फोलपणा ग्राहकांच्या लक्षात आला असून, आता विक्री पूर्ववत होताना दिसत आहे. येत्या महिन्यांत कर्नाटकातील निवडणुकांमुळे चिकनच्या खपाला चालना मिळणार आहे. पुढे होळी असल्यामुळे बाजाराचे सेटिंमेंट खपवाढीच्या दृष्टीने पूरक ठरतील. महाराष्ट्रात चिक्सचे दर खाली आले असले, तरी प्रथिन स्रोतांचे दर वाढल्याने ओपन फार्मर्स द्विधा मनस्थितीत आहेत. यामुळे चालू दिवसांत प्लेसमेंटचा वेग कमी राहील, असे डॉ. देशपांडे म्हणाले. कोमरला समूहाचे संचालक कृष्णचरण म्हणाले, विविध कारणांमुळे बाजारभाव दबावात होते आणि विक्री वाढली होती. लहान माल मोठ्या प्रमाणावर विकला गेला आहे. मात्र गेल्या आठवड्याअखेर बाजारात सुधारणा दिसत आहे. हैदराबाद बाजारात ६५ पर्यंत सुधारणा झाली आहे. बंगळूर बाजारही याच मार्गावर आहे. यामुळे महाराष्ट्रातील बाजारातही वाढ अपेक्षित आहे. सध्या सोयामील व अन्य प्रथिन स्रोत महाग झाले असून, त्याने खाद्यावरील आणि पर्यायाने एकूण उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. या दरम्यान एका दिवसाच्या पिलांचे भाव उच्चांकी ४७ रु. प्रतिनग वरून ३७ रु.पर्यंत खाली आले आहेत. सध्याच्या पातळीवर पिलांचे बाजारभाव स्थिरावतील. त्यामुळे शेतकऱ्याला थोडा दिलासा मिळेल. तथापि, चिक्सचे अजून खाली जाण्यासाठी ऑगस्टपर्यंत वाढ पाहावी लागेल.  गुजरात राज्यातील मार्केटबाबत आणंदस्थित पोल्ट्री उद्योजक अनुभाई पटेल म्हणाले, ‘शनिवारी ता. १० रोजी ६१ रु. प्रतिकिलोने लिफ्टिंग झाले. वजन आणि संख्यारूपी पुरवठा फार नाही. मात्र, खप कमी झाला आहे. पक्ष्यांची वजने सव्वादोन किलोच्या आत नियंत्रणात आहेत. सध्याचे वातावरण प्रतिकूल असल्याने विक्रीचा अधिक दिसत आहे. चालू आठवड्यात प्लेसमेंटचे प्रमाण घटणार आहे. कारण, आजपासून पुढे ४० दिवसांनी तयार होणार माल हा चैत्र नवरात्रीत बाजारात येईल. हा कालावधीत गुजरातेत उपवास पाळले जातात. १५ मार्चनंतरचा परीक्षांचा कालावधी आणि चिक्सचे महाग दर आणि सध्याची ब्रॉयलरची मंदी यामुळे देखील प्लेसमेंटमध्ये घट दिसत आहे. या दरम्यान, सध्याच्या कमी वजनाच्या मालाच्या विक्रीमुळे होळी आधी बाजारात सुधारणा दिसण्याची शक्यता आहे.’  

प्रकार    भाव   परिमाण   बाजारपेठ
ब्रॉयलर   ५५   प्रतिकिलो      नाशिक
हैदराबाद ३८०    प्रतिशेकडा          पुणे
चिक्स     ३७    प्रतिनग  पुणे
अंडी  ३५५       प्रतिशेकडा  पुणे
हॅचिंग एग्ज     ३४.५   प्रतिनग   मुंबई
मका     १०६०     प्रतिक्विंटल     लासलगाव
सोयामील   ३१००० प्रतिटन        इंदूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com