आठवडाभर सर्वदूर चांगल्या पावसाची शक्‍यता

अाठवड्याचे हवामान
अाठवड्याचे हवामान

मुंबईसह उत्तर महाराष्ट्रावर, विदर्भावर व मराठवाड्यावर हवेचा दाब ९९६ ते १००० हेप्टापास्कल इतका कमी राहण्यामुळे या भागात या आठवड्याच्या सुरवातीस पावसाचे प्रमाण निश्‍चित वाढेल आणि काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्‍यता राहील. मराठवाडा व मध्य महाराष्ट्रावरही हवेचा दाब ९९८ हेप्टापास्कल इतका कमी राहण्यामुळे या भागातही पावसाचे प्रमाण अधिक राहील. तर दक्षिण महाराष्ट्रावर १००२ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहण्यामुळे तेथे ही पाऊस सुरूच राहील. कोकणात पावसाचे प्रमाण अधिक असेल. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहण्यामुळे आठवडाभर हवामान ढगाळ राहील. आर्द्रतेचे प्रमाणही अधिक राहील.

पूर्व किनारपट्टीवर ओरिसाजवळ हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र राहण्यामुळे पूर्व महाराष्ट्राच्या भागात म्हणजेच पूर्व विदर्भ व मराठवाड्याच्या पूर्व भागात पावसाच्या प्रमाणात वाढ होईल. समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्यच राहील. त्यामुळे पावसाचा जोर फार वाढणार नाही.

उत्तर भारतातील काश्मीर, दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश भागावर ९९६ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. तसेच राजस्थान व गुजरातवरही तितकाच हवेचा दाब राहण्यामुळे वारे उत्तर दिशेने मोठ्या प्रमाणावर ढग लोटतील आणि याही भागात पावसात वाढ होणे शक्‍य आहे. १५ जुलै रोजी राजस्थानवर ९९२ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील, त्यामुळे माॅन्सून संपूर्ण भारतात पोचेल आणि पावसाचा जोर वाढतच जाईल. १६ जुलै व १७ जुलै रोजी पावसाचे प्रमाण थोड्या प्रमाणात वाढेल. त्याचवेळी मध्य भारतावर उत्तर विदर्भ व मध्य प्रदेशावर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल आणि जोरदार वृष्टी चालू राहील. १८ जुलै रोजी बंगालच्या उपसागराच्या पूर्व किनाऱ्यावर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल. १९ जुलै रोजी स्थिती कायम राहील. १३ जुलै रोजी गडचिरोली, चंद्रपूर, जिल्ह्यात पावसाचे प्रमाण वाढेल. संपूर्ण कोकणात आठवडाभर जोरदार पावसाची शक्‍यता राहील. कोकण

सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही दिवशी ९० मिलिमीटर, रत्नागिरी जिल्ह्यात ८५ मिलिमीटर, रायगड जिल्ह्यात ८० मिलिमीटर तर ठाणे जिल्ह्यात ६४ मिलिमीटरपर्यंत पावसाची शक्‍यता असून आठवडाभर अशाच प्रमाणात पावसाची शक्‍यता राहील. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १४ ते १६ किलोमीटर राहील तर ठाणे जिल्ह्यात ताशी ८ किलोमीटर पावसाची शक्‍यता राहील. रायगड व ठाणे जिल्ह्यात किमान तापमान २९ अंश सेल्सिअस राहील तर रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग व ठाणे जिल्ह्यात किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील तर रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९४ ते ९८ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ८७ ते ९० टक्के राहील. उत्तर महाराष्ट्र

नंदूरबार जिल्ह्यात काही दिवशी ३० मिलिमीटर नाशिक जिल्ह्यात २५ मिलिमीटर जळगाव जिल्ह्यात १७ किलोमीटर व धुळे जिल्ह्यात १५ मिलिमीटर राहील. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. नाशिक व नंदूरबार जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १५ ते १६ किलोमीटर राहील. जळगाव व धुळे जिल्ह्यात वाऱ्याचा वेग ताशी १० ते ११ किलोमीटर राहील. धुळे व जळगाव जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील तर नाशिक व नंदूरबार जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८३ ते ९० टक्के राहील तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५० ते ७२ टक्के राहील. मराठवाडा

हिंगोली जिल्ह्यात काही दिवशी १५ मिलिमीटर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड व परभणी जिल्ह्यात काही दिवशी १० मिलिमीटर तर बीड, जालना व औरंगाबाद जिल्ह्यात ६ ते ७ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. उस्मानाबाद, लातूर, बीड व नांदेड जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील तर परभणी, हिंगोली, जालना व औरंगाबाद जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष अार्द्रता ८० ते ८७ टक्के राहील. तर दुपारची सापेक्ष अार्द्रता नांदेड व बीड जिल्ह्यात ४७ ते ४८ टक्के, हिंगोली जिल्ह्यात ५१ टक्के, औरंगाबाद व लातूर जिल्ह्यात ५२ टक्के, परभणी जिल्ह्यात ५३ टक्के आणि उस्मानाबाद व जालना जिल्ह्यात ५६ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे दुपारी अार्द्रतेचे प्रमाण कमी राहील. उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग २१ किलोमीटर राहील, बीड जिल्ह्यात ताशी १८ किलोमीटर, नांदेड व हिंगोली जिल्ह्यात ताशी १६ किलोमीटर राहील. परभणी, जालना व औरंगाबाद जिल्ह्यात ताशी १३ ते १४ किलोमीटर इतका हवेचा वेग राहील. हा वाऱ्याचा वेग अधिक असून पावसाचे प्रमाण त्यामुळेच कमी राहील. पश्‍चिम महाराष्ट्र 

अमरावती जिल्ह्यात काही दिवशी १५ मिलिमीटर पावसाची शक्‍यता असून अकोला व वाशीम जिल्ह्यात ८ मिलिमीटर पावसाची शक्‍यता राहील. तर बुलडाणा जिल्ह्यात ५ मिलिमीटर पावसाची शक्‍यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेली असली तरी पावसाचे प्रमाण याहून कितीतरी अधिक या आठवड्यात राहील. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. बुलडाणा व वाशीम जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १३ किलोमीटर राहील तर अकोला व अमरावती जिल्ह्यात ताशी ७ ते ८ किलोमीटर राहील. वाशीम जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. बुलडाणा व अकोला जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष अार्द्रता ९० ते ९७ टक्के राहील. तर दुपारची सापेक्ष अार्द्रता ६० ते ७२ टक्के राहील. मध्य विदर्भ  

यवतमाळ जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील तर वर्धा व नागपूर जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. नागपूर जिल्ह्यात काही दिवशी ३० मिलिमीटर पावसाची शक्‍यता असून यवतमाळ व वर्धा जिल्ह्यात १० ते १५ मिलिमीटर पावसाची शक्‍यता काही दिवशी राहील. मात्र याहून अधिक पाऊस होणे शक्‍य आहे. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ९ ते १३ किलोमीटर राहील. सकाळची सापेक्ष अार्द्रता ९२ ते ९४ टक्के राहील तर दुपारची सापेक्ष अार्द्रता ६५ ते ८१ टक्के राहील. या आठवड्यात पावसाचे प्रमाणात वाढ होईल. पूर्व विदर्भ

पूर्व विदर्भात पावसाचे प्रमाण चांगले राहील. गडचिरोली, भंडारा व गोंदिया या पूर्वेकडील जिल्ह्यात प्रतिदिनी २५ मिलिमीटर तर चंद्रपूर जिल्ह्यात काही दिवशी १२ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वाऱ्याची दिशा वायव्येकडून तर उर्वरित जिल्ह्यात नैऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ९ किलोमीटर राहील. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष अार्द्रता ९५ ते ९७ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७३ ते ७५ टक्के राहील. दक्षिण पश्‍चिम महाराष्ट्र

कोल्हापूर जिल्ह्यात काही दिवशी ९६ मिलिमीटर, सातारा व पुणे जिल्ह्यात ५१ ते ५४ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. सांगली, सोलापूर व नगर जिल्ह्यात ६ ते १० मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. सोलापूर व सांगली जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग २० ते २६ किलोमीटर राहील. कोल्हापूर व नगर जिल्ह्यात ताशी १८ किलोमीटर राहील. सातारा व पुणे जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १६ किलोमीटर राहील. सांगली व नगर जिल्ह्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. सोलापूर जिल्ह्यात ते ३१ अंश सेल्सिअस तर पुणे व कोल्हापूर जिल्ह्यात २८ ते २९ अंश सेल्सिअस आणि सातारा जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २२ ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष अार्द्रता ८४ ते ९६ टक्के व दुपारची सापेक्ष अार्द्रता सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात ९० टक्के व उर्वरित जिल्ह्यात ५७ ते ७४ टक्के राहील.   कृषी सल्ला 

  • या आठवड्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्‍यता असून, शेतात पाणी साचणे शक्‍य आहे. शेतातील साचलेल्या पाण्याचा निचरा उताराकडील बांधाच्या एका कोपऱ्याची उंची कमी करून त्वरित करावा.
  • भात खाचरात ५ सें.मी. उंचीपर्यंत पाणी साठवावे.
  • तृणधान्य पिकांना नत्राचा दुसरा हप्ता द्यावा.
  • परिपक्व भाजीपाला व फळांची काढणी करून माल बाजारात विक्रीसाठी पाठवावा.
  • पेरणी करण्यास योग्य ओल असल्यास सोयाबीन+तूर, घेवडा, धने या पिकांची पेरणी करावी.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com