agriculture news in marathi, weekly weather advisary | Agrowon

कोरडे, उष्ण हवामान राहून तापमानाची तीव्रता वाढेल
डॉ. रामचंद्र साबळे
शनिवार, 24 मार्च 2018

महाराष्ट्रासह दक्षिण, मध्य, उत्तर व ईशान्य भारतावर हवेचा दाब समान म्हणजेच १०१० हेप्टापास्कल इतका राहील. वायव्येकडील भागावर व काश्मीरच्या पायथ्याला हवेचा दाब १०१२ हेप्टापास्कल इतका अधिक राहील. त्यामुळे सध्या महाराष्ट्राच्या काही भागांत वारे प्रामुख्याने वायव्येकडून तर काही भागात नैर्ऋत्येकडून वाहतील. अरबी समुद्र, हिंदी महासागर व बंगालच्या उपसागरावरही समान हवेचा दाब म्हणजे १०१० हेप्टापास्कल इतका राहण्यामुळे हवामान बदल या आठवड्यात जाणवणार नाहीत.

महाराष्ट्रासह दक्षिण, मध्य, उत्तर व ईशान्य भारतावर हवेचा दाब समान म्हणजेच १०१० हेप्टापास्कल इतका राहील. वायव्येकडील भागावर व काश्मीरच्या पायथ्याला हवेचा दाब १०१२ हेप्टापास्कल इतका अधिक राहील. त्यामुळे सध्या महाराष्ट्राच्या काही भागांत वारे प्रामुख्याने वायव्येकडून तर काही भागात नैर्ऋत्येकडून वाहतील. अरबी समुद्र, हिंदी महासागर व बंगालच्या उपसागरावरही समान हवेचा दाब म्हणजे १०१० हेप्टापास्कल इतका राहण्यामुळे हवामान बदल या आठवड्यात जाणवणार नाहीत. २५ मार्च रोजी वायव्येकडील भारताच्या भागावर १०१४ हेप्टापास्कल, तर ईशान्य भारतावरही तितकाच हवेचा दाब राहण्यामुळे उत्तरेकडून दक्षिणेकडे वारे वाहतील. मध्य भारतात मात्र हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल.

महाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. २६ मार्च रोजी स्थिती बदलत असून, महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर १०१२, तर उर्वरित भारतावर १०१० हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहण्यामुळे वारे नैर्ऋत्येकडून वाहण्यास सुरुवात होईल. २३ मार्च रोजी सूर्य मध्यावर म्हणजेच विषववृत्तावर येईल आणि त्यानंतर उत्तरायणमुळे तो उत्तर गोलार्धात प्रवेश करील आणि उष्णता वेगाने वाढण्यास सुरवात होईल. २७ मार्च रोजी राजस्थान व गुजरात सीमेवर केवळ १००८ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब होईल तर उर्वरित भारतावर समान म्हणजे १०१० हेप्टापास्कल इतका अधिक असेल. २८ मार्च रोजी मध्य भारतात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल व वारे दक्षिणेकडून उत्तरेस वाहतील. २९ मार्च रोजी स्थिती कायम राहील. २५ व २६ मार्च रोजी मुंबईच्या जवळपासच्या भागात ढग जमतील, तर २७ मार्च रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यावर ढगांची दाटी असेल. हिंदी महासागर, अरबी समुद्र व बंगालच्या उपसागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्यच राहील. त्यामुळे कोणतेही हवामान बदल होणार नाहीत.

कोकण 
ठाणे जिल्ह्यात कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस राहील. तर रायगड जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. ठाणे जिल्ह्यात किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील, तर रत्नागिरी जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यांत किमान तापमान २१ ते २२ अंश सेल्सिअस राहील. रत्नागिरी, रायगड व ठाणे जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यांत ६९ ते ७० टक्के राहील, तर सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यांत ७६ ते ८१ टक्के राहील. ठाणे जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता २४ टक्के राहील, तर रायगड जिल्ह्यात ६८ टक्के राहील, तर सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ५३ ते ५७ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ठाणे जिल्ह्यात ३ किलोमीटर, तर सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांत ५ किलोमीटर व रत्नागिरी जिल्ह्यांत ताशी ८ किलोमीटर राहील. ठाणे जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून, तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत ती अग्नेयेकडून राहील.

उत्तर महाराष्ट्र 
नाशिक जिल्ह्यात कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस राहील, तर धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस राहील. नाशिक जिल्ह्यात किमान तापमान २१ अंश सेल्सिअस राहील; तर धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. नाशिक जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ५९ टक्के राहील, तर उर्वरित धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत ६५ टक्के राहील. नाशिक जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता २१ टक्के राहील. तर धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत ३८ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ७ किलोमीटर राहील, तर वाऱ्याची दिशा नाशिक जिल्ह्यात वायव्येकडून, धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत नैर्ऋत्येकडून तर जळगाव जिल्ह्यात अग्नेयेकडून राहील.

मराठवाडा 
जालना जिल्ह्यात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस राहील, तर लातूर व बीड जिल्ह्यात ३६ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद, हिंगोली व औरंगाबाद जिल्ह्यांत ते ३७ अंश सेल्सिअस राहील. तर नांदेड व परभणी जिल्ह्यात ते ३८ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांत किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. तर नांदेड, बीड व परभणी जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस राहील. हिंगोली, जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत किमान तापमान २१ अंश सेल्सिअस राहील.
आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता परभणी जिल्ह्यात ४५ टक्के, तर उस्मानाबाद व बीड जिल्ह्यांत ५४ टक्के राहील व औरंगाबाद जिल्ह्यांत केवळ ३९ टक्के राहील. उर्वरित सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ६० ते ६९ टक्के राहील. तर दुपारची सापेक्ष आर्द्रता उस्मानाबाद व औरंगाबाद जिल्ह्यांत २५ ते ३० टक्के राहील आणि लातूर व परभणी जिल्ह्यात ३३ ते ३५ टक्के राहील. उर्वरित जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ४० ते ४४ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग हिंगोली जिल्ह्यात ताशी ३ किलोमीटर, बीड व औरंगाबाद जिल्ह्यांत ताशी ५ किलोमीटर नांदेड व जालना जिल्ह्यांत ८ ते ९ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने अग्नेयेकडून राहील.

पश्‍चिम विदर्भ 
बुलडाणा जिल्ह्यात कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस राहील. तर वाशीम व अमरावती जिल्ह्यांत कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस राहील, तर अकोला जिल्ह्यात कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस राहील. वाशीम जिल्ह्यात किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहील, तर उर्वरित जिल्ह्यात ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. बुलडाणा व अकोला जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ३५ टक्के राहील, तर वाशीम व अमरावती जिल्ह्यात ४० टक्के राहील. अमरावती जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता केवळ १५ टक्के राहील, तर उर्वरित जिल्ह्यात त्याहून कमी म्हणजे १२ टक्के राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ८ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.

मध्य विदर्भ 
नागपूर जिल्ह्यात कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस राहील, तर यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत ते ४० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता नागपूर जिल्ह्यात ६० टक्के राहील, तर यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत ४० टक्के इतकी राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता वर्धा जिल्ह्यात १५ टक्के, तर यवतमाळ व नागपूर जिल्ह्यांत केवळ १२ टक्के इतकी कमी राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.

पूर्व विदर्भ
गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस राहील. तर चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यांत कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस राहील. गोंदिया जिल्ह्यात किमान तापमान २० अंश सेल्सिअस राहील. भंडारा जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस राहील आणि चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. गडचिरोली जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ६० टक्के राहील; तर भंडारा जिल्ह्यात ४० टक्के आणि चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यांत ३० ते ३५ टक्के इतकी राहील. चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता १५ टक्के व गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांत केवळ १२ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ किलोमीटर राहील. भंडारा जिल्ह्यात वाऱ्याची दिशा पूर्वेकडून राहील, तर उर्वरित जिल्ह्यात वायव्येकडून राहील.

दक्षिण उत्तर महाराष्ट्र 
सोलापूर जिल्ह्यात कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस राहील. सांगली व पुणे जिल्ह्यात ३६ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर, सातारा व नगर जिल्ह्यात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस राहील. नगर व पुणे जिल्ह्यांत किमान तापमान २१ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस आणि सोलापूर जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस किमान तापमान राहील. कोल्हापूर जिल्ह्यात आकाश निरभ्र राहील, तर उर्वरित जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सांगली जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ८१ टक्के राहील, तर सोलापूर जिल्ह्यात ५९ टक्के राहील आणि नगर जिल्ह्यात ५४ टक्के राहील. मात्र कोल्हापूर, सातारा व पुणे जिल्ह्यांत ६१ ते ६६ टक्के राहील. कोल्हापूर, सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता २१ टक्के राहील. सांगली व सातारा जिल्ह्यांत किमान तापमान २२ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ७ किलोमीटर राहील. सांगली व सातारा जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा अग्नेयेकडून राहील तर उर्वरित जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील.

कृषी सल्ला 

  • कमाल व किमान तापमान वेगाने वाढत असल्याने या पुढे उन्हाळी हंगामातील पिकांचे पाणी व्यवस्थापन काटेकोरपणे करावे. तशीच काळजी भाजीपाला व फळ पिकांची घ्यावी.
  • जनावरांना हिरवा चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावा म्हणून आफ्रिकन टॉल मका, ओट या पैकी निवडक चारा पिकांची पेरणी करून पिकांची गरज लक्षात घेऊन पाणीपुरवठा योग्य प्रकारे करावा.
  • उन्हाळी हंगामात कमी कालावधीची पिके घ्यावीत.

(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ अाणि सदस्य संशोधन परिषद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अाणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली) 

इतर ताज्या घडामोडी
बोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी...परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या...
नागपूरला होणार रेशीम कोष मार्केटनागपूर   ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम...
खानदेशातील रब्बी पाण्याअभावी संकटातजळगाव  : अत्यल्प पावसामुळे खानदेशात...
साखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला...मुंबई  ः साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘...
नगरमधील शेतकऱ्यांना मिळणार शेळीपालन,...नगर   : पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना...
जळगावात सीताफळाला प्रतिक्विंटल २५०० ते...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
संग्रामपूर खरेदी केंद्रावर अाॅनलाइन...बुलडाणा   : अाधारभूत किमतीने शेतीमाल...
एफआरपी थकवलेल्या ११ कारखान्यांवर कारवाई...मुंबई  : राज्यातील ११ साखर कारखान्यांनी...
गोंदिया जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल धान...गोंदिया  ः शासनाच्या वतीने नाफेडच्या...
मदत, पुनर्वसन समितीच्या अहवालानंतर...अकोला  ः कमी तसेच अनियमित पावसामुळे निर्माण...
सातारा जिल्ह्यात रब्बीसाठी आतापर्यंत...सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी...
‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य...सोलापूर : सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या...
मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रणशास्त्रीय नाव ः स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा  ...
बेणापूर ग्रामपंचायतीने केली गायरानावर...खानापूर तालुक्यातील बेणापूर ग्रामपंचायतीने आपल्या...
भुरीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवासर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुढील आठ...
नगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...
साताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा   ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...
गुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई   : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...
खपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...
सुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी  ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...