agriculture news in marathi, weekly weather advisary | Agrowon

आठवड्यात पावसाची शक्‍यता
डॉ. रामचंद्र साबळे
शनिवार, 14 एप्रिल 2018

मध्य महाराष्ट्रावर १००८ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. अरबी समुद्राच्या पश्‍चिम किनारपट्टीलगत तसेच केरळवर हवेच्या कमी दाबाची क्षेत्रे निर्माण होतील. उत्तर प्रदेश व हिमाचल प्रदेश भागावर १००६ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. तशीच स्थिती १५ व १६ एप्रिल रोजीही राहील. १७ एप्रिल रोजी केरळ व दक्षिण कर्नाटकावर १०१० हेप्टापास्कल इतका हवेचा दाब वाढेल.

मध्य महाराष्ट्रावर १००८ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. अरबी समुद्राच्या पश्‍चिम किनारपट्टीलगत तसेच केरळवर हवेच्या कमी दाबाची क्षेत्रे निर्माण होतील. उत्तर प्रदेश व हिमाचल प्रदेश भागावर १००६ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. तशीच स्थिती १५ व १६ एप्रिल रोजीही राहील. १७ एप्रिल रोजी केरळ व दक्षिण कर्नाटकावर १०१० हेप्टापास्कल इतका हवेचा दाब वाढेल.

संपूर्ण अरबी समुद्र, बंगालचा उपसागर व हिंदी महासागराच्या भागावर हवेच्या दाबात वाढ होतील आणि वारे मोठ्या प्रमाणावर भारताच्या दिशेने बाष्प वाहून आणतील. १८ एप्रिल रोजी मध्य महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात वाढ होईल आणि तो १०१० हेप्टापास्कलपर्यंत वाढेल आणि त्यानंतर १९ एप्रिल रोजी पुन्हा महाराष्ट्रावरील हवेचे दाब कमी होऊन १००८ हेप्टापास्कल इतके कमी होतील. त्याचवेळी राजस्थानवर १००४ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब होईल आणि राजस्थानवर उष्ण वारे वाहतील. त्यामुळे संपूर्ण उत्तर भारतातील हवेचे दाब कमी होतील आणि कमी दाबाचे क्षेत्र उत्तर भारतातील राजस्थान, जम्मू व काश्‍मीर, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, सिक्कीम या भागावर तयार होईल. संपूर्ण अरबी समुद्र व बंगालच्या उपसागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान ३० अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बाष्प निर्माण होऊन ढग निर्मिती होऊन पूर्व मोसमी पावसासाठी वातावरण तयार होईल.

१४ एप्रिल ते १७ एप्रिल रोजी महाराष्ट्रातील भागात पाऊस होईल. १४ एप्रिल रोजी विदर्भात पावसाची शक्‍यता असून १५ एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची शक्‍यता आहे. १६ एप्रिल रोजी कोकण व कोकणास लागून असलेल्या मध्य महाराष्ट्रात पाऊस होईल. १७ एप्रिल रोजी ती स्थिती कायम राहील. १८ एप्रिल रोजी दक्षिण महाराष्ट्रात पावसाची शक्‍यता कायम राहील. १९ एप्रिलनंतर पावसाळी वातावरण कमी होईल.

कोकण
ठाणे जिल्ह्यात कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल तर रायगड जिल्ह्यात ते ३४ अंश सेल्सिअस इतके कमी राहील आणि सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात ते ३६ ते ३७ अंश सेल्सिअस राहील. रायगड व ठाणे जिल्ह्यात किमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील तर रत्नागिरी जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ठाणे जिल्ह्यात ६२ टक्के, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८५ टक्के आणि रायगड व रत्नागिरी जिल्ह्यात ७४ ते ७९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ठाणे जिल्ह्यात ७४ ते ७९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ठाणे जिल्ह्यात केवळ १५ टक्के राहील. तर उर्वरित रायगड जिल्ह्यात २७ टक्के आणि रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३० ते ३४ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ठाणे व रायगड जिल्ह्यात २ ते ५ किलोमीटर राहील, तर रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात ताशी ६ किलोमीटर राहील. रत्नागिरी जिल्ह्यात वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील तर सिंधुदुर्ग, रायगड व ठाणे जिल्ह्यात नैऋत्येकडून राहील.

उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस राहील, तर नाशिक व धुळे जिल्ह्यात ४१ अंश सेल्सिअस आणि नंदूरबार जिल्ह्यात ४० अंश सेल्सिअस राहील. जळगाव व धुळे जिल्ह्यातच किमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील तर नाशिक व नंदूरबार जिल्ह्यात २१ ते २२ अंश सेल्सिअस राहील. नाशिक जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. धुळे व नंदूरबार जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ३४ ते ३९ टक्के राहील, तर नाशिक जिल्ह्यात ४९ टक्के आणि जळगाव जिल्ह्यात ५६ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ११ ते २३ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते १२ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील.

मराठवाडा
नांदेड जिल्ह्यात कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद व जालना जिल्ह्यातच कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस राहील. लातूर जिल्ह्यात ३८ अंश सेल्सिअस राहील आणि बीड जिल्ह्यात ३६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान परभणी, हिंगोली, जालना व औरंगाबाद जिल्ह्यात ३७ अंश सेल्सिअस राहील. नांदेड जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस आणि उस्मानाबाद व बीड जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस राहील. तसेच लातूर जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता जालना जिल्ह्यात ५३ टक्के राहील. तर बीड जिल्ह्यात ४९ टक्के राहील. लातूर जिल्ह्यात ४३ टक्के तर उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली व औरंगाबाद जिल्ह्यात २९ ते ३४ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता नांदेड जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता २८ टक्के राहील तर परभणी जिल्ह्यात १३ टक्के राहील आणि उर्वरित जिल्ह्यात १५ ते २२ टक्के राहील. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने नैऋत्येकडून राहील.

पश्‍चिम विदर्भ
अकोला व अमरावती जिल्ह्यात कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस राहील; तर बुलडाणा व वाशीम जिल्ह्यात ४१ अंश सेल्सिअस राहील. अकोला जिल्ह्यात किमान तापमान २८ अंश सेल्सिअस राहील तर वाशीम व अमरावती जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस आणि बुलडाणा जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४२ टक्के राहील तर उर्वरित जिल्ह्यात ३३ ते ३५ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता २७ टक्के अकोला जिल्ह्यात राहील तर अकोला व अमरावती जिल्ह्यात १९ टक्के व बुलडाणा जिल्ह्यात २२ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ८ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने वायव्येकडून राहील.

मध्य विदर्भ
नागपूर जिल्ह्यात कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस राहील तर यवतमाळ व वर्धा जिल्ह्यात ४१ अंश सेल्सिअस राहील. वर्धा जिल्ह्यात किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहील तर नागपूर व यवतमाळ जिल्ह्यात किमान तापमान २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. नागपूर जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ४३ टक्के राहील; तर यवतमाळ व वर्धा जिल्ह्यात ३९ टक्के राहील. नागपूर जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता २६ टक्के राहील तर वर्धा व यवतमाळ जिल्ह्यात २२ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ६ किलोमीटर राहील. वाऱ्याची प्रमुख दिशा नैऋत्येकडून राहील.

पुवर् विदर्भ
गोंदिया जिल्ह्यात कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस राहील तर चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा जिल्ह्यात कमाल तापमान सर्वच जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता गडचिरोली जिल्ह्यात ६९ टक्के राहील तर चंद्रपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ५३ ते ५९ टक्के राहील. भंडारा जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता २१ टरक्के राहील. भंडारा जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता २६ ते २७ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ७ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील.

दक्षिण पश्‍चिम महाराष्ट्र
कोल्हापूर जिल्ह्यात कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस राहील; तर सांगली जिल्ह्यात ३८ अंश सेल्सिअस आणि सातारा जिल्ह्यात ३९ अंश सेल्सिअस राहील. सोलापूर व पुणे जिल्ह्यात कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस राहील तर नगर जिल्ह्यात कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस राहील. सांगली जिल्ह्यात किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील. तर कोल्हापूर व सातारा जिल्ह्यात किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर व पुणे जिल्ह्यात कमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहील. तर नगर जिल्ह्यात किमान तापमान १९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता पुणे व सोलापूर जिल्ह्यात ४१ ते ४२ टक्के राहील. नगर जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ३० टक्के राहील. सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ५९ ते ७८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष १२ ते २० टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ८ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने नैऋत्येकडून राहील.

कृषी सल्ला 

  • उष्णतेची तीव्रता आणि कमाल व किमान तापमानातील वाढ लक्षात घेऊन ठिबक सिंचनाचा कालावधी वाढवावा.
  • पिकांची पाण्याची गरज व पिकाची वाढीची अवस्था या बाबीनुसार पाटाने पाणी द्यावयाचे झाल्यास पाण्याच्या दोन पाळ्यातील अंतर कमी करावे.
  • तापमान वाढताच बाष्पीभवनाचा वेग वाढतो तसेच हवेतील आर्द्रतेचे प्रमाण कमी होते आणि पिकाची पाण्याची गरज वाढते. त्यामुळे पिकाचा प्रकार, वाढीची अवस्था आणि उपलब्ध पाणी यांचा विचार करून पाणी व्यवस्थापन करावे.

(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ अाणि सदस्य संशोधन परिषद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अाणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली.)

 

इतर बातम्या
बोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी...परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या...
बुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादनबुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक...
नागपूरला होणार रेशीम कोष मार्केटनागपूर   ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम...
परभणी जिल्ह्यात ‘जलयुक्त’ १११ गावांत...परभणी : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात...
येवला तालुक्‍यात रब्बीचे भवितव्य...येवला : खरिपालाच पाणी नव्हते. आजतर प्यायलाही...
खानदेशातील रब्बी पाण्याअभावी संकटातजळगाव  : अत्यल्प पावसामुळे खानदेशात...
खानदेशातील पाच साखर कारखाने सुरूजळगाव : खानदेशात पाच साखर कारखान्यांमध्ये गाळप...
साखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला...मुंबई  ः साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘...
नगरमधील शेतकऱ्यांना मिळणार शेळीपालन,...नगर   : पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना...
भारतीय दूध सुरक्षितनवी दिल्ली ः भारतातील दुधाच्या दर्जाबाबात सतत...
संग्रामपूर खरेदी केंद्रावर अाॅनलाइन...बुलडाणा   : अाधारभूत किमतीने शेतीमाल...
एफआरपी थकवलेल्या ११ कारखान्यांवर कारवाई...मुंबई  : राज्यातील ११ साखर कारखान्यांनी...
गोंदिया जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल धान...गोंदिया  ः शासनाच्या वतीने नाफेडच्या...
मदत, पुनर्वसन समितीच्या अहवालानंतर...अकोला  ः कमी तसेच अनियमित पावसामुळे निर्माण...
सातारा जिल्ह्यात रब्बीसाठी आतापर्यंत...सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी...
चारा छावण्यांऐवजी थेट अनुदानाचा विचार ः...मुंबई ः दुष्काळी भागात चारा छावण्यांमध्ये होणारा...
धार्मिक स्थळांनी द्यावा दुष्काळासाठी...नागपूर ः राज्यातील सर्वधर्मीय धार्मिक स्थळांनी...
मागणीनंतर दोन दिवसांत टँकरचा प्रस्ताव...सोलापूर : मागणी आल्यास ४८ तासांत टॅंकरबाबतचा...
‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य...सोलापूर : सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या...
राज्यात हुडहुडी वाढली... पुणे : किमान तापमानाचा पारा घसरल्याने राज्यात...