पावसाची शक्यता, काही भागांत उष्णतेची लाट

डॉ. रामचंद्र साबळे
डॉ. रामचंद्र साबळे

भारतावरील हवेच्या दाबात बदल होत असून काश्मीर खोऱ्यापासून राजस्थानपर्यंत १००४ हेप्टापास्कल, मध्य भारतावर १००२ हेप्टापास्कल तसेच गुजरातवरही तितकाच कमी हवेचा दाब राहण्यामुळे तेथे तापमान अधिक राहणे शक्‍य आहे. या आठवड्याच्या सुरवातीला महाराष्ट्रावर १००६ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहणे शक्‍य आहे. त्यामुळेच तापमानाची तीव्रता अधिक राहण्याची याही आठवड्यात शक्‍यता आहे. ६ मे रोजी हिंदी महासागरावर व बंगालच्या उपसागरावर अधिक हवेचा दाब म्हणजे १०१० हेप्टापास्कल इतका राहील. त्यामुळे वारे दक्षिणेकडून उत्तरेकडे अग्नेय दिशेने वाहतील तसेच नैऋत्य दिशेनेही वारे वाहतील. ते मोठ्या प्रमाणात बाष्प वाहून आणतील. त्यातून ढग निर्मिती होईल आणि आकाश अंशतः ढगाळ राहील. ७ मे रोजी केरळ व कर्नाटकावर १०१० हेप्टापास्कल इतक्या प्रमाणात हवेच्या दाबात वाढ होईल. तर राजस्थान काश्‍मीर उत्तर प्रदेशवर १००२ हेप्टापास्कल इतका कमी दाब राहण्यामुळे उत्तर भारताच्या दिशेने वारे वाहतील आणि त्याचवेळी त्या भागात तापमानाची तीव्रता अधिक राहील.

८ मे रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात तापमान थोडे घटेल आणि मोठ्या प्रमाणावर ढग जमतील. ९ मे रोजी पुन्हा तापमान वाढेल अाणि महाराष्ट्रावर १००६ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब कमी होईल. त्यामुळे आकाश अंशतः ढगाळ राहील. कोकण, मध्यम महाराष्ट्र व मराठवाड्यात या आठवड्यात पावसाची शक्‍यता असून मुंबईसह ठाणे पश्‍चिम महाराष्ट्राच्या भागात १२ मे रोजी पावसाची शक्‍यता राहील. त्यापूर्वी ५ व ६ मे रोजी मराठवाड्यात तसेच ८ ते १० मे रोजी दक्षिण कोकणात व मुंबईसही पाऊस होण्याची दाट शक्‍यता आहे त्यामुळे तापमान घसरेल. कोकण ठाणे जिल्ह्यात कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस राहील. रायगड जिल्ह्यात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कमाल तापमान २७ अंश सेल्सिअस राहील तर रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यात ते २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात आकाश ढगाळ राहण्याचे प्रमाण अधिक राहील व पावसाची शक्‍यता निर्माण होईल. कोकणात सकाळची सापेक्ष आर्द्रता ८७ ते ९५ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ठाणे व रत्नागिरी जिल्ह्यात ५६ ते ५७ टक्के राहील तर रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६२ ते ६९ टक्के राहील. सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग २ ते ३ किलोमीटर राहील तर ठाणे जिल्ह्यात ताशी ७ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा अग्नेयेकडून. उत्तर महाराष्ट्र धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस राहील तर नाशिक जिल्ह्यात ते ३७ अंश सेल्सिअस राहील. नाशिक व धुळे जिल्ह्यात किमान तापमान २० ते २२ अंश सेल्सिअस राहील तर नंदूरबार व जळगाव जिल्ह्यात ते २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. जळगाव जिल्ह्यात सकाळची सापेक्ष अार्द्रता ५५ टक्के राहील तर नाशिक, धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ६१ ते ७२ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता २२ ते २५ टक्के राहील. नंदूरबार व जळगाव जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १७ किलोमीटर राहील तर धुळे जिल्ह्यात ताशी २० किलोमीटर व नाशिक जिल्ह्यात ताशी ९ किलोमीटर राहील. नाशिक व धुळे जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून तर नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत वायव्येकडून राहील. मराठवाडा : नांदेड जिल्ह्यात कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. लातूर व बीड जिल्ह्यात कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअस राहील. हिंगोली व जालना जिल्ह्यात कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस राहील तर उस्मानाबाद व औरंगाबाद जिल्ह्यात ४१ अंश सेल्सिअस राहील. परभणी जिल्ह्यात किमान तापमान २७ अंश सेल्सिअस राहील. तर हिंगोली व जालना जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद व बीड जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस आणि औरंगाबाद व लातूर जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस तसेच नांदेड जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता उस्मानाबाद जिल्ह्यात ४६ टक्के तर नांदेड जिल्ह्यात ५५ टक्के राहील व उर्वरित सर्वच जिल्ह्यात ३१ ते ३९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता १० ते २० टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. जालना जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग २१ किलोमीटर राहील, तर औरंगाबाद जिल्ह्यात ताशी १७ किलोमीटर राहील. उर्वरित सर्वच जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ८ ते ११ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. ५ व ६ ला पावसाची शक्‍यता आहे. पश्‍चिम विदर्भ : अकोला व अमरावती जिल्ह्यांत कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअस राहील तर वाशीम जिल्ह्यात ४४ अंश सेल्सिअस आणि बुलडाणा जिल्ह्यात ४३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ३८ टक्के तर अकोला जिल्ह्यात ४० ते ४२ टक्के वाशीम व अमरावती जिल्ह्यात व ४५ टक्के बुलडाणा जिल्ह्यात राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता १९ ते २३ टक्के कमी राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. बुलडाणा जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १६ किलोमीटर राहील. तर उर्वरित सर्वच जिल्ह्यात १२ ते १३ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. मध्य विदर्भ : कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २९ ते ३० अंश सेल्सिअस राहील. त्यामुळे उष्णतेची लाट येईल आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ४८ ते ५० टक्के तर यवतमाळ जिल्ह्यात ३९ टक्के राहील. तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २२ ते २५ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ९ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. पूर्व विदर्भ : पूर्व विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान ४५ सेल्सिअसच्या वरती असेल. तर चंद्रपूर जिल्ह्यात ते ४८ अंश सेल्सिअसपर्यंत वाढणे शक्‍य आहे. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहील. त्यामुळेच पूर्व विदर्भात उष्णतेची लाट येईल. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता गडचिरोली जिल्ह्यात ५० ते ५३ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता गडचिरोली जिल्ह्यात ३० टक्के तर उर्वरित चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यांत २१ टक्के आणि भंडारा जिल्ह्यात १० टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. दक्षिण पश्‍चिम महाराष्ट्र : सोलापूर जिल्ह्यात कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस राहील. तर सांगली जिल्ह्यात ते ४१ अंश सेल्सिअस राहील. नगर जिल्ह्यात ४३ अंश सेल्सिअस राहील. उर्वरित कोल्हापूर, सातारा व पुणे जिल्ह्यात ३८ ते ३९ अंश सेल्सिअस राहील. सातारा व सोलापूर जिल्ह्यात किमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर व नगर जिल्ह्यात २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील व सांगली व पुणे जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर जिल्ह्यात ८५ टक्के राहील. सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ७१ ते ७६ टक्के राहील. नगर व सोलापूर जिल्ह्यांत ५३ ते ५६ टक्के इतकी राहील. कोल्हापूर, सातारा व पुणे जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ४५ ते ४९ टक्के राहील. सांगली व नगर जिल्ह्यात २० ते २२ टक्के आणि सोलापूर जिल्ह्यात ११ टक्के इतकी कमी राहील. सांगली, सोलापूर व नगर जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १४ ते १५ किलोमीटर राहील. तर उर्वरित जिल्ह्यात ६ ते ९ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा नगर जिल्ह्यात वायव्येकडून तर उर्वरीत सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. कृषी सल्ला :

  • तापमानाची तीव्रता आणि उष्णतेच्या लाटेची शक्‍यता लक्षात घेऊन शेतातील कामे पहाटे, सकाळी व सायंकाळी करावीत.
  • फळे व भाज्यांची काढणी करून बाजारात विक्री करावी.
  • नवीन फळबागांना ठिबक सिंचनाने पाणी द्यावे.
  • जनावरांना दिवसातून ५ वेळा पाणी द्यावे.
  • ठिबक सिंचन संचाचा कालावधी वाढवावा.
  • पावसाची शक्‍यता लक्षात घेऊन शेतमाल सुरक्षितस्थळी साठवावा.
  • (ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ अाणि सदस्य संशोधन परिषद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com