तापमानात घट, ढगाळ हवामानासह पावसाची शक्‍यता

अाठवड्याचे हवामान
अाठवड्याचे हवामान

महाराष्ट्राचा पूर्वभाग, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब, हरियाना, हिमाचल प्रदेश, सिक्कीम व काश्मीर भागावर हवेचे दाब कमी झालेले असून, हवेचा दाब केवळ १००२ हेप्टापास्कल इतका कमी राहील. त्यामुळे मध्य भारतापासून हिमालयाच्या पायथ्यापर्यंत आणि राजस्थानपासून बिहारपर्यंत हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. ही हवामानस्थिती आगामी माॅन्सूनपूर्व वेळेपूर्वी दाखल होण्याचे चिन्ह असून, तो उत्तरेकडेही वेगाने सरकू शकेल त्यामुळेच उत्तराखंडमध्ये माॅन्सूनपूर्वी पोचण्याची चिन्हे अाहेत. याशिवाय दक्षिण भारतातही हवेचे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून दक्षिण कोकण, कर्नाटकचा पश्‍चिम भाग व केरळवर १००६ तर त्याच प्रदेशाच्या पूर्वभागावर केवळ १००४ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहणार असल्याने माॅन्सून पावसाचे आगमन वेळेपूर्वी होण्यास हवेचे दाब अत्यंत अनुकूल बनले आहेत.

हिंदी महासागरात मात्र १००८ आणि १० अंश दक्षिण रेखांशावर १०१० हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब असल्याने माॅन्सून वारे हिंदी महासागरावरून भारताच्या दिशेने वेगाने वाहतील. वाऱ्याचा वेग वाढेल. सध्याच्या अंदाजानुसार उत्तर महाराष्ट्रात वाऱ्याचा वेग ताशी १५ ते २० किलोमीटरपर्यंत वाढेल तर मराठवाड्यातील बीड, हिंगोली व जालना जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग २० ते २३ किलोमीटर राहील. सांगली व सोलापूर जिल्ह्यातही वाऱ्याचा ताशी वेग १८ ते २० किलोमीटर राहील. २० मे ते २३ मे या काळात ही स्थिती कायम राहील. याशिवाय केरळवर हवेचे दाब कमी होतील आणि कमी हवेच्या दाबाचे क्षेत्र निर्माण होईल.

२४ मे रोजी पूर्वभारतात हवेचे दाब १००० हेप्टापास्कल इतके कमी होतील व केरळवरील कमी हवेच्या दाबाचे क्षेत्र कायम राहील. उस्मानाबाद, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांत पावसाची शक्‍यता आहे. आकाश अंशतः ढगाळ राहील. तापमान याही आठवड्यात अधिक राहील. बंगालच्या उपसागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान ३१ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. अशीच स्थिती हिंदी महासागराच्या मध्य भागात असल्याने ती आगामी माॅन्सूनला अनुकूल आहे. कोकण ठाणे जिल्ह्यात कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस राहील; तर रायगड जिल्ह्यात ३७ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात किमान तापमान २७ अंश सेल्सिअस राहील, तर उर्वरित रत्नागिरी, रायगड व ठाणे जिल्ह्यांत किमान तापमान २८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. रायगड व ठाणे जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ९२ ते ९३ टक्के राहील, तर सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ८६ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ठाणे जिल्ह्यात ३१ टक्के राहील तर उर्वरित सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत ५० ते ५७ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ६ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. उत्तर महाराष्ट्र जळगाव जिल्ह्यात कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअस राहील, तर धुळे व जळगाव जिल्ह्यांत कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअस राहील व नाशिक जिल्ह्यांत ४२ अंश सेल्सिअस राहील तर उर्वरित धुळे, नंदूरबार व नाशिक जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस राहील. नाशिक व जळगाव जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. जळगाव जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ३८ टक्के राहील. धुळे जिल्ह्यात ४८ टक्के आणि नाशिक व नंदूरबार जिल्ह्यांत ६१ ते ६९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता १० ते १५ टक्के इतकी कमी राहील, त्यामुळे हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग नाशिक जिल्ह्यात १२ किलोमीटर नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत ताशी १५ किलोमीटर व धुळे जिल्ह्यात ताशी २० किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. मराठवाडा उस्मानाबाद, बीड व लातूर जिल्ह्यांत कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस राहील, तर जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत ४३ अंश सेल्सिअस, तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत ४४ अंश सेल्सिअस राहील. मराठवाड्यातील तापमान घटण्यास सुरवात होईल. हिंगोली जिल्ह्यात किमान तापमान ३० अंश सेल्सिअस राहील, तर परभणी जिल्ह्यात किमान तापमान २९ अंश सेल्सिअस राहील. नांदेड, बीड व जालना जिल्ह्यांत किमान तापमान २८ अंश सेल्सिअस राहील. लातूर व औरंगाबाद जिल्ह्यांत किमान तापमान २७ अंश सेल्सिअस राहील, तर उस्मानाबाद जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. ढगांचे प्रमाण उस्मानाबाद जिल्ह्यात अधिक राहील, तसेच ४ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ४८ टक्के राहील, तर औरंगाबाद जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ४८ टक्के राहील, तर औरंगाबाद बीज व लातूर जिल्ह्यांत ३५ ते ३७ टक्के राहील. उर्वरित नांदेड, परभणी, हिंगोली, जालना जिल्ह्यात २३ ते २७ टक्के राहील. दुपारच्या सापेक्ष आर्द्रतेत घट होऊन ती ११ ते १४ टक्के राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग उस्मानाबाद जिल्ह्यात १५ किलोमीटर, औरंगाबाद जिल्ह्यात ताशी १७ किलोमीटर, बीड, परभणी व जालना जिल्ह्यांत ताशी २० ते २३ किलोमीटर राहील. हिंगोली, नांदेड व लातूर जिल्ह्यांत ताशी ८ ते १३ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. पश्‍चिम विदर्भ बुलडाणा जिल्ह्यात कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअस, अकोला व वाशीम जिल्ह्यांत ४४ अंश सेल्सिअस आणि अमरावती जिल्ह्यात ४५ अंश सेल्सिअस राहील. पश्‍चिमेकडून पूर्वेकडे तापमान वाढत जाईल. अमरावती व अकोला जिल्ह्यांत किमान तापमान ३० ते ३१ अंश सेल्सिअस इतके अधिक असेल. तर बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत किमान तापमान २९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. वाशीम जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ५४ टक्के तर उर्वरित बुलडाणा, अकोला व अमरावती जिल्ह्यात ४२ ते ४५ टक्के राहील. वाशीम जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ३३ टक्के राहील व अमरावती जिल्ह्यात १९ टक्के राहील. तर बुलडाणा व अकोला जिल्ह्यांत २३ ते २९ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग १३ ते १८ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. मध्य विदर्भ मध्य विदर्भात कमाल तापमान ४४ ते ४५ अंश सेल्सिअस राहील, तर किमान तापमान ३० ते ३१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता वर्धा जिल्ह्यात ६० टक्के तर यवतमाळ व नागपूर जिल्ह्यांत ४९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता १९ ते २५ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग यवतमाळ जिल्ह्यात १७ किलोमीटर आणि वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ९ ते ११ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा वर्धा जिल्ह्यात वायव्येकडून तर नागपूर व यवतमाळ जिल्ह्यात नैर्ऋत्येकडून राहील. पूर्व विदर्भ पूर्व विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअस राहील तर चंद्रपूर, गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांत कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान ३० ते ३१ अंश सेल्सिअस राहील. गोंदिया जिल्ह्यात ते २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता भंडारा जिल्ह्यात ४१ टक्के राहील, तर उर्वरित जिल्ह्यांत ६१ ते ६५ टक्के राहील. भंडारा जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता २९ टक्के राहील तर उर्वरित जिल्ह्यांत १९ ते २१ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ९ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. दक्षिण पश्‍चिम महाराष्ट्र कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत कमाल तापमान ३५ ते ३७ अंश सेल्सिअस राहील तर सांगली, सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत कमाल तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअस राहील. पुणे जिल्ह्यात किमान तापमान २८ अंश सेल्सिअस राहील व सांगली जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस राहील; तर उर्वरित जिल्ह्यात ते २६ ते २८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ९३ टक्के राहील. सोलापूर जिल्ह्यात ५३ टक्के राहील तर उर्वरित जिल्ह्यांत ६२ ते ८२ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांत ३७ ते ४१ टक्के राहील. सांगली, सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता १४ ते २३ टक्के इतकी कमी राहील, त्यामुळे हवामान कोरडे राहील. सांगली जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १८ किलोमीटर राहील. सोलापूर जिल्ह्यात ताशी २० किलोमीटर व उर्वरित जिल्ह्यांत १० ते १२ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील.   कृषी सल्ला

  • आडसाली उसाची लागवडीची वेळ १५ जुलै ते १५ ऑगस्ट असल्याने जमिनीची उभी व आडवी नांगरट करावी. हेक्‍टरी २० टन शेणखत घालून कुळवाच्या पाळीने ते मातीत मिसळावे व जमीन ताप द्यावी.
  • खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी जमिनीची पूर्वमशागत करावी. एक नांगराची पाळी द्यावी. जमिनीतील काडीकचरा, दगड, गोटे वेचून घ्यावेत.
  • बियाण्याची व खतांची माहिती घेऊन बियाणे व खते गरजेनुसार खरेदी करून ठेवावेत.
  • (ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ अाणि सदस्य, संशोधन परिषद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com