agriculture news in marathi, weekly weather advisary | Agrowon

माॅन्सून सक्रिय, सर्वत्र चांगल्या पावसाचा अंदाज
डॉ. रामचंद्र साबळे
शनिवार, 23 जून 2018

महाराष्ट्रावरील हवेचे दाब कमी झालेले असून १००४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहण्यामुळे माॅन्सून सक्रिय होत आहे. उत्तर भारतात गुजरात व राजस्थान सीमेवर ९९८ हेप्टापास्कल इतका तर उत्तराखंडवरही तितकाच हवेचा दाब राहण्यामुळे तसेच मध्य भारतावर १००० हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहण्यामुळे मॉन्सून वेगाने उत्तर भारताच्या दिशेने जाईल. महाराष्ट्रावरून हे वारे पुढे जात असल्याने जूनअखेरपर्यंत अधूनमधून महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण चांगले राहील. २४ जून रोजीही हवामान सद्यःस्थितीचे कायम राहील अाणि संपूर्ण भारतावरील हवेचे दाब कमी राहतील.

महाराष्ट्रावरील हवेचे दाब कमी झालेले असून १००४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहण्यामुळे माॅन्सून सक्रिय होत आहे. उत्तर भारतात गुजरात व राजस्थान सीमेवर ९९८ हेप्टापास्कल इतका तर उत्तराखंडवरही तितकाच हवेचा दाब राहण्यामुळे तसेच मध्य भारतावर १००० हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहण्यामुळे मॉन्सून वेगाने उत्तर भारताच्या दिशेने जाईल. महाराष्ट्रावरून हे वारे पुढे जात असल्याने जूनअखेरपर्यंत अधूनमधून महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण चांगले राहील. २४ जून रोजीही हवामान सद्यःस्थितीचे कायम राहील अाणि संपूर्ण भारतावरील हवेचे दाब कमी राहतील. त्याच दिवशी काश्मीरवरील हवेचे दाब कमी होत असून तेथेही ९९८ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहण्यामुळे माॅन्सून वेगाने उत्तर दिशेने आगेकूच करेल.

सिक्कीमवरील हवेचे दाब ९९६ हेप्टापास्कल इतका कमी होण्यामुळे काही भागात अतिवृष्टी होणेही शक्‍य आहे. २६ जून रोजी राजस्थानवरील हवेचे दाब ९९४ हेप्टापास्कल इतके कमी होत आहेत. त्याचवेळी पूर्व विदर्भावर केवळ १००० हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहण्यामुळे विदर्भाच्या भागातही जोरदार पावसाची शक्‍यता राहील. संपूर्ण उत्तर भारतात ९९६ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहण्यामुळे माॅन्सून उत्तर भारतातही लवकरच पोचेल. २७ जून रोजी गुजरात ते राजस्थान या भागावर तसेच दिल्ली, उत्तर प्रदेश या भागावरील हवेचे दाब ९९६ ते ९९८ हेप्टापास्कल इतका कमी राहण्यामुळे माॅन्सून वारे वेगाने उत्तर भारताच्या दिशेने जाईल आणि विशिष्ट वेळेपूर्वी पोचेल. २८ जून रोजी ही स्थिती कायम राहील. २९ जून रोजीही पावसाची स्थिती कायम राहील किंबहुना पावसाच्या प्रमाणात वाढ होत जाईल. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यातही पावसाचे प्रमाण वाढेल. मध्य महाराष्ट्रात व कोकणातही पावसाचे प्रमाण अधिक राहील. हिंदी महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमानही वाढत आहे. त्यामुळे या पुढे पावसाचे प्रमाण चांगले राहील.

कोकण
ठाणे व सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही दिवशी ३७ ते ४० मिलिमीटर पावसाची शक्‍यता असून रायगड व रत्नागिरी जिल्ह्यात ५७ ते ६३ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. ठाणे व सिंधुदुर्ग जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील तर रायगड जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस आणि रत्नागिरी जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस राहील. रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. ठाणे जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ८३ टक्के राहील. तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ९२ ते ९३ टक्के राहील. ठाणे जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ६४ टक्के राहील. तर रायगड जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ८७ टक्के राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ९१ ते ९८ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ६ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा ठाणे व सिंधुदुर्ग जिल्ह्यात नैऋत्येकडून राहील तर रत्नागिरी जिल्ह्यात दक्षिणेकडून व रायगड जिल्ह्यात अग्नेयेकडून.

उत्तर महाराष्ट्र
धुळे जिल्ह्यात काही दिवशी २३ मिलिमीटर पावसाची शक्‍यता असून नाशिक, नंदूरबार, जळगाव जिल्ह्यात काही दिवशी २७ ते २९ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. धुळे व जळगाव जिल्ह्यात वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. नाशिक व नंदूरबार जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. वाऱ्याचा वेग नंदूरबार जिल्ह्यात ताशी २४ किलोमीटर तर धुळे जिल्ह्यात ताशी १७ किलोमीटर जळगाव जिल्ह्यात ताशी १९ किलोमीटर तर नाशिक जिल्ह्यात ताशी १४ किलोमीटर राहील. धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस तर नाशिक जिल्ह्यात ताशी ३३ अंश सेल्सिअस आणि जळगाव जिल्ह्यात ३६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस व जळगाव जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस आणि धुळे व नंदूरबार जिल्ह्यात २६ ते २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. जळगाव जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ७७ टक्के नंदूरबार जिल्ह्यात ९० टक्के, तर नाशिक व धुळे जिल्ह्यात ८० ते ८२ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता जळगाव व नाशिक जिल्ह्यात ३९ ते ५८ टक्के राहील तर धुळे व नंदूरबार जिल्ह्यात ६४ ते ७४ टक्के राहील.

मराठवाडा
परभणी व हिंगोली जिल्ह्यात काही दिवशी ४० ते ४२ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. तर नांदेड जिल्ह्यात काही दिवशी ३७ मिलिमीटरपर्यंत पावसाची शक्‍यता आहे. बीड व औरंगाबाद जिल्ह्यात २२ ते २९ मिलिमीटरपर्यंत पावसाची शक्‍यता असून लातूर व जालना जिल्ह्यात १६ ते १८ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. परभणी, जालना व औरंगाबाद जिल्ह्यात वाऱ्याची दिशा वायव्येकडून तर उर्वरित जिल्ह्यात नैऋत्येकडून राहील. लातूर व नांदेड जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग २१ किलोमीटर राहील. बीड व जालना जिल्ह्यात ताशी १९ किलोमीटर राहील. तर परभणी, हिंगोली व औरंगाबाद जिल्ह्यात ताशी १२ ते १५ किलोमीटर राहील. उस्मानाबाद जिल्ह्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. लातूर, हिंगोली व औरंगाबाद जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. जालना जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. नांदेड, बीड, परभणी जिल्ह्यात ते ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यात २० ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६७ ते ८२ टक्के तर दुपारची ४६ ते ६४ टक्के राहील.

पश्‍चिम विदर्भ
अकोला व बुलडाणा जिल्ह्यात काही दिवशी १६ ते २० मिलिमीटर तर वाशीम व अमरावती जिल्ह्यात ३० ते ४० मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा वायव्येडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ९ ते १३ किलोमीटर राहील. बुलडाणा व वाशीम जिल्ह्यात कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस तर वाशीम व अमरावती जिल्ह्यात ते ३८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान बुलडाणा जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस राहील तर अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० ते ९५ टक्के तर दुपारची ५८ ते ६८ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ९ ते १३ किलोमीटर राहील.

मध्य विदर्भ
नागपूर जिल्ह्यात काही दिवशी ४० मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. वर्धा व यवतमाळ जिल्ह्यात १५ ते २१ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने नैऋत्येकडून राहील. नागपूर जिल्ह्यात कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस राहील तर यवतमाळ व वर्धा जिल्ह्यात ३५ ते ३६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८९ ते ९४ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४५ ते ७५ टक्के राहील.

पूर्व विदर्भ
चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात या आठवड्यात काही दिवशी ४० मिलिमीटरपर्यंत पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ७ किलोमीटर राहील. चंद्रपूर जिल्ह्यात कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस राहील तर उर्वरित जिल्ह्यात ते ४१ ते ४२ अंश सेल्सिअस राहील. गडचिरोली जिल्ह्यात किमान तापमान २७ अंश सेल्सिअस राहील तर चंद्रपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यात २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८५ ते ९५ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ८५ ते ९५ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता चंद्रपूर जिल्ह्यात ६५ टक्के व उर्वरित जिल्ह्यात ३९ ते ४२ टक्के राहील.

दक्षिण पश्‍चिम महाराष्ट्र
कोल्हापूर, सोलापूर व नगर जिल्ह्यात काही दिवशी २३ ते २४ मिलिमीटर पावसाची शक्‍यता असून पुणे जिल्ह्यात ३७ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. सांगली व सातारा जिल्ह्यात ७ ते १५ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. सांगली जिल्ह्यात वाऱ्याचा वेग ताशी २१ किलोमीटर राहील तर सोलापूर व नगर जिल्ह्यात ताशी १७ किलोमीटर राहील. कोल्हापूर व पुणे जिल्ह्यात ताशी १० किलोमीटर तर सांगली जिल्ह्यात ७ किलोमीटर राहील. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील. सातारा जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस आणि सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यात ३२ ते ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सोलापूर जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस राहील. तर पुणे जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस आणि उर्वरित जिल्ह्यात २१ ते २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६८ ते ९३ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६० ते ७८ टक्के राहील.

कृषी सल्ला

  • वाफसा अवस्थेपेक्षा थोडा अधिक पाऊस होताच मूग, मटकी, चवळी, हुलगा, तूर, सोयाबीन, सूर्यफूल, भुईमूग या पिकांच्या पेरण्याबरोबर ज्वारी, बाजरी, कपाशी, मका या पिकांच्याही पेरण्या कराव्यात.
  • पेरणीपूर्वी बियास जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी.
  • आंतरपीक पद्धतीचा अवलंब जरूर करावा.
  • पेरणीनंतर सारे व पाट पाडावेत. पावसाचे पाणी वाफ्यातच मुरेल आणि पिकास अधिक काळ जमिनीतील पाण्याचा उपयोग होईल.

(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ अाणि सदस्य संशोधन परिषद, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

 

इतर ताज्या घडामोडी
अब आया उंट पहाड के निछे; राजू शेट्टींचा...सोलापूर : शेतकऱ्यांच्या दूध दराच्या प्रश्‍...
सरकार रिलायन्स, पतंजलीच्या दुधाची वाट...नागपूर : एकीकडे समाधानकारक पाऊस पडत असताना...
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस-...नागपूर : कधी देणार कधी देणार...कापूस, धानाला...
पीक सल्ला१६ जुलै ते ३१ जुलैपर्यंत पेरणी लांबल्यास संकरीत...
खानदेशात दूध आंदोलनास अल्प प्रतिसादजळगाव ः खानदेशात कुठेही दूध आंदोलनाला उग्र स्वरुप...
संत गजानन महाराज पालखीचे सोलापुरात...सोलापूर : पावसाच्या संततधार सरी झेलत ‘गण गण गणात...
रस्त्यावर दूध ओतून शासनाचा निषेधसांगली ः दूध दरवाढीच्या स्वाभिमानी शेतकरी...
दूध दरप्रश्नी तारसा फाटा येथे आंदोलननागपूर  ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
पुणे जिल्ह्यात दूध दरप्रश्नी आंदोलनपुणे  ः  दूध दरप्रश्‍नी स्वाभिमानी...
दूध दरप्रश्‍नी वऱ्हाडात आंदोलनअकोला   ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
मराठवाड्यात विविध ठिकाणी दूध संकलन बंदऔरंगाबाद : दूध दरावरून पुकारल्या आंदोलनाच्या...
नगर जिल्ह्यात दूध संकलन बंदनगर  : दूध दरप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी...
केनियात आढळल्या पिवळ्या वटवाघळांच्या...केनियामध्ये पिवळ्या रंगाच्या वटवाघळांच्या जनुकीय...
सातारा जिल्ह्यात दूध दर आंदोलनास मोठा...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाला...
झाडांच्या संवर्धनामध्ये हवामान बदलासोबत...तापमानवाढीमुळे अधिक उंचीकडे किंवा उत्तरेकडे...
नागपूर, गडचिरोलीत संततधारनागपूर  : हवामान विभागाने विदर्भात सोमवारी (...
मराठवाड्यातील २४५ मंडळांत पावसाची रिपरिपऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी जवळपास...
पुणे जिल्ह्यात दमदार पाऊसपुणे   : जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली...
अकोले तालुक्यात पावसाचा जोर कायमनगर   ः अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील २६...नांदेडः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २६...