agriculture news in marathi, weeky weather advisary report | Agrowon

शेवटच्या अाठवड्यात चांगल्या पावसाचा अंदाज
डॉ. रामचंद्र साबळे
शनिवार, 16 जून 2018

महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर १००२ हेप्टापास्कल तर दक्षिण सीमेवर १००८ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. दिल्ली, राजस्थान, पंजाब, हरियाना भागांवर ९९८ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील, त्यामुळे मॉन्सून वारे दक्षिणेकडून वाहतील. पश्‍चिम भारताच्या उत्तरेकडील भागाकडेही मॉन्सूनची वेगाने वाटचाल अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडील भागावर १००० हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. तसेच उत्तर प्रदेश, उत्तराखंड या भागांवर ९९८ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहण्यामुळे मॉन्सूनची प्रगती ईशान्य भारतातही होईल, तशीच प्रगती उत्तर प्रदेशाच्या दिशेनेही होईल, अशी सद्यःस्थिती आहे.

महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर १००२ हेप्टापास्कल तर दक्षिण सीमेवर १००८ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. दिल्ली, राजस्थान, पंजाब, हरियाना भागांवर ९९८ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील, त्यामुळे मॉन्सून वारे दक्षिणेकडून वाहतील. पश्‍चिम भारताच्या उत्तरेकडील भागाकडेही मॉन्सूनची वेगाने वाटचाल अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडील भागावर १००० हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. तसेच उत्तर प्रदेश, उत्तराखंड या भागांवर ९९८ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहण्यामुळे मॉन्सूनची प्रगती ईशान्य भारतातही होईल, तशीच प्रगती उत्तर प्रदेशाच्या दिशेनेही होईल, अशी सद्यःस्थिती आहे. हिंदी महासागराच्या विषुववृत्तीय भागावर १०१२ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहण्यामुळे २२ जूननंतर मॉन्सून पावसाचा जोर वाढेल. हिंदी महासागराच्या विषुववृत्तीय भागापासून उत्तरेस १० अंश अक्षांशापर्यंत व ७० ते ९० रेखांशामध्ये पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान ३१ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. त्यामुळे मॉन्सून पावसासाठी मोठ्या प्रमाणावर बाष्पनिर्मिती होईल त्यातूनच ढगनिर्मितीस उत्तेजन मिळेल. सध्याही हिंदी महासागरात व बंगालच्या उपसागरात मोठ्या प्रमाणावर ढग जमलेले असून, हवेचे दाब अनुकूल असल्याने सध्याच्या काळात कोकणात पाऊस सुरू असून, १९ जून रोजी पुणे जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागात अल्पशा पावसाची शक्‍यता आहे. २२ जून रोजी उत्तर महाराष्ट्र आणि उत्तरेकडील विदर्भातील भागात पावसाला वातावरण अनुकूल बनेल व पाऊस होईल. तसेच २३ जून रोजी मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्‍यता निर्माण होऊन पाऊस होईल. २५ व २६ जून या दिवशीही पावसाची शक्‍यता असून, तेथून पुढे महाराष्ट्रात चांगल्या पावसाची शक्‍यता आहे. तोपर्यंत कोकणातील सर्वच जिल्ह्यांत ४० मिलिमीटर ते ६० मिलिमीटर प्रतिदिनी पावसाची शक्‍यता आहे. या आठवड्यात वाऱ्याचा ताशी वेग वाढेल आणि तो काही जिल्ह्यांत ताशी २० किलोमीटर राहील.

कोकण

कोकणात काही दिवशी रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत ५९ ते ६४ मिलिमीटर पावसाची शक्‍यता असून, ठाणे, पालघर व रत्नागिरी जिल्ह्यांत काही दिवशी ४३ ते ५१ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. कोकणात दररोज पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ११ किलोमीटर राहील. रायगड व ठाणे जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील, तर रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत कमाल तापमान ३० ते ३१ अंश सेल्सिअस राहील. रायगड व ठाणे जिल्ह्यांत किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील तर रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० ते ९९ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता रायगड व ठाणे जिल्ह्यांत ६५ ते ६७ टक्के आणि सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ७३ ते ७५ टक्के राहील. सध्या सुरू असलेला पाऊस रोपवाटिकांना उपयुक्त असून, भातखाचरांमध्ये चिखलणीच्या कामासाठीही उपयुक्त आहे.

उत्तर महाराष्ट्र 

नाशिक जिल्ह्यात काही दिवशी ५ मिलिमीटर तर नंदूरबार जिल्ह्यात काही दिवशी ३ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे, तर धुळे व जळगाव जिल्ह्यांत पावसात उघडीप राहील.२२ जूनपासून पुढे पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग नाशिक व धुळे जिल्ह्यांत २० किलोमीटर राहील, तर धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत ताशी २१ ते २३ किलोमीटर राहील. नाशिक व नंदूरबार जिल्ह्यांत कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस राहील तर धुळे व जळगाव जिल्ह्यांत कमाल तापमान ३७ ते ३८ अंश सेल्सिअस राहील. जळगाव जिल्ह्यात किमान तापमान २६ अंश सेल्सिअस राहील, तर नाशिक, धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता नंदूरबार व नाशिक जिल्ह्यांत ७५ ते ८० टक्के तर जळगाव व धुळे जिल्ह्यांत ६४ ते ६८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता जळगाव जिल्ह्यात २९ टक्के, नाशिक जिल्ह्यात ४३ टक्के तर धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत ३३ ते ३६ टक्के राहील.

मराठवाडा

नांदेड जिल्ह्यात काही दिवशी ४ मिलिमीटरपर्यंत पावसाची शक्‍यता असून, उर्वरित सर्वच जिल्ह्यांत पावसात उघडीप राहणे शक्‍य आहे. मात्र दिनांक २२ जून नंतर वातावरण बदलेल आणि २६ जूनपासून पुन्हा पावसाला सुरवात होईल. औरंगाबाद व उस्मानाबाद जिल्ह्यांत कमाल तापमान ३६ ते ३७ अंश सेल्सिअस राहील. लातूर, बीड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस राहील. नांदेड जिल्ह्यात कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील, तर औरंगाबाद जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद, लातूर, बीड आणि परभणी जिल्ह्यांत ते २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता उस्मानाबाद व औरंगाबाद जिल्ह्यांत ७० ते ७१ टक्के राहील, तर लातूर व जालना जिल्ह्यांत ६७ टक्के राहील. उर्वरित जिल्ह्यांत ६१ ते ६४ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता २७ ते ३२ टक्के इतकी कमी राहील, त्यामुळे हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा वेग वाढेल. नांदेड व उस्मानाबाद जिल्ह्यांत तो १७ ते १९ टक्के राहील. उर्वरित जिल्ह्यांत तो २२ ते २३ टक्के राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील.

पश्‍चिम विदर्भ

अकोला जिल्ह्यात कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस राहील. उर्वरित जिल्ह्यांत कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान वाशीम जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस राहील, तर उर्वरित जिल्ह्यांत किमान तापमान २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. बुलडाणा जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ७५ टक्के राहील. उर्वरित जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ६५ ते ६९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ३६ ते ४५ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग १२ ते १६ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील.

मध्य विदर्भ

नागपूर जिल्ह्यात अल्पशा पावसाची शक्‍यता असून, काही दिवशी ६ मिलिमीटर पावसाची शक्‍यता राहील. नागपूर जिल्ह्यात कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस राहील तर यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअस राहील. यवतमाळ जिल्ह्यात किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६३ ते ६८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ३२ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग नागपूर जिल्ह्यात १३ किलोमीटर राहील तर वर्धा व यवतमाळ जिल्ह्यांत १६ ते १७ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील.

पूर्व विदर्भ

गोंदिया जिल्ह्यात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस राहील, तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत ते ३६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६२ ते ६९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ३५ ते ४० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ११ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील.

दक्षिण - पश्‍चिम महाराष्ट्र

सोलापूर व पुणे जिल्ह्यांत काही दिवशी ४ मिलिमीटरपर्यंतच पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. नगर जिल्ह्यात कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस राहील, तर सोलापूर जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअस राहील. सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ ते ३२ अंश सेल्सिअस राहील. सांगली व पुणे जिल्ह्यांत ३५ ते ३६ अंश सेल्सिअस राहील. सातारा जिल्ह्यात किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत ते २३ अंश व सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सोलापूर जिल्ह्यात ७२ टक्के, सोलापूर, नगर व सांगली जिल्ह्यांत ७२ ते ७७ टक्के, कोल्हापूर व पुणे जिल्ह्यांत ८२ ते ८९ टक्के आणि सातारा जिल्ह्यात ९१ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात ६४ ते ६५ टक्के राहील. पुणे व सांगली जिल्ह्यांत ४२ ते ४८ टक्के राहील तर नगर व सोलापूर जिल्ह्यांत ३६ ते ३८ टक्के राहील. कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १२ किलोमीटर राहील. सोलापूर व पुणे जिल्ह्यांत ताशी १७ किलोमीटर व नगर व सांगली जिल्ह्यांत २२ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील.
 
कृषी सल्ला 

  • जेथे ६५ मिलिमीटरपेक्षा अधिक जमिनीत ओलावा असेल, तेथे वाफसा येताच पेरणी करणे हिताचे आहे.
  • मूग, मटकी, चवळी, हुलगा, तूर, सोयाबीन या पिकांच्या पेरण्या भारी जमिनीत ६५ मिलिमीटर ओलावा असल्यास कराव्यात.
  • आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा.

(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य संशोधन परिषद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

इतर ताज्या घडामोडी
एचटी सीड ‘एसआयटी’ची पोलिसांच्या...नागपूर  ः राज्य शासनाने स्थापन केलेल्या एच....
इतिहासकालीन जलसंधारण अन् त्यामागचे...दरवर्षी पिढ्यानपिढ्या पावसाचे पाणी वेगवेगळे उपाय...
अभ्यासक्रमात हवा भूसूक्ष्मजीवशास्त्राचा...महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठे असून, तिथे १२...
ठिबकचे अनुदान वाटपासाठी अधिकाऱ्यांची...पुणे ः शासनाकडून ठिंबक सिंचनासाठी तरतूद केलेली...
होळीमुळे द्राक्ष काढणी मंदावलीनाशिक : द्राक्षपट्ट्यात द्राक्ष काढणीसाठी आदिवासी...
एकरकमी एफआरपीबाबत साखर कारखान्यांचे मौनसातारा ः जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांचा ऊस...
‘बळिराजा'चे सोळा उमेदवार जाहीरकोल्हापूर : देशात शिक्षण, आरोग्य, रोजगार तसेच...
साताऱ्यात हिरवी मिरची ४०० ते ५०० रुपये...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
धुळ्यात भाजपमध्ये अंतर्गत धुसफुसजळगाव ः लोकसभा निवडणुकीत भाजपचे जळगाव व...
नाशिकमध्ये युतीचे उमेदवार ठरेनानाशिक: लोकसभेच्या निवडणुकीसाठी नाशिक व दिंडोरी...
पुणे जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांचा...पुणे ः पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा ऊस गाळप...
उष्णतेचे कारण देऊन पपईच्या दरात अडवणूकनंदुरबार : जिल्ह्यातील पपई उत्पादकांना अपेक्षित...
नांदेड जिल्ह्यात साडेअकराशे हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात गुरुवार (ता. १४) पर्यंत...
नगर जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणी मोहिमेची...नगर : जनावरांच्या छावण्या सुरू केल्या. मात्र,...
वऱ्हाडात हळद काढणीला सुरवातअकोला : वऱ्हाडात दुष्काळी परिस्थिती, तसेच पाणी...
परभणीतील पशुवैद्यक विद्यार्थ्यांचे भीक...परभणी ः पशुसंवर्धन विभागांतर्गंत पशुधन सहायकांना...
नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळनाशिक : नाशिक शहर व जिल्ह्यात बिबट्याच्या...
सोलापूर कृषी विज्ञान केंद्राला...सोलापूर : भारतीय कृषी व संशोधन परिषदेअंतर्गत...
नगर जिल्ह्यात सव्वा कोटी टन उसाचे गाळपनगर ः जिल्ह्यातील २३ सहकारी व खासगी साखर...
सोलापूर जिल्हा दूध संघाचे पैसे...सोलापूर : दूध अनामत रक्कम, पशुखाद्य व गायी...