agriculture news in marathi, wells become dry due drought, yeola, nashik | Agrowon

येवल्यातील ८० हजारांवर विहिरी कोरड्याठाक
टीम अॅग्रोवन
सोमवार, 20 मे 2019

पहिल्यांदा अशा प्रकारे भयानक दुष्काळ पडला असून, विहिरी पूर्णपणे आटल्या आहेत. १९७२ च्या दुष्काळावेळेसदेखील पिण्यासाठी पाणी गावात उपलब्ध होते. परंतु या दुष्काळात विहिरींनी तळ गाठल्याने दोन महिन्यांपासून जनावरांसह माणसाचे पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात हाल होतायेत.
- पुंजाबा वैद्य, शेतकरी, ममदापूर, ता. येवला, जि. नाशिक

येवला, जि. नाशिक : ब्रिटिशकालीन अवर्षणप्रवण अन् दुष्काळी असलेल्या येवल्यातील दुष्काळाची तीव्रता यंदा भयानक आहे. उत्तर-पूर्व भागात भरपावसाळ्यातही विहिरी कोरड्याठाक राहिल्याचे चित्र यंदा होते. आजमितीस तालुक्यातील सुमारे ९९ हजार ते १ लाख विहिरींपैकी ८० हजारांवर विहिरी कोरड्याठाक झाल्या आहेत. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

राज्यातील जे ९४ अतितीव्र टंचाईग्रस्त तालुके आहे, त्यात येवल्याचे नाव अगदी वरती असून, तालुका तर दुष्काळाचे माहेरघरच बनले आहे. या वर्षी तर भरपावसाळ्यातही धो-धो पावसासाठी नागरिकांच्या नजरा कोरड्याच राहिल्या. रिमझिम सरीवरच पावसाळा संपला आणि पर्जन्याची नोंद झाली फक्त २७९ मिमी म्हणजे केवळ ६० टक्के झाली. येथील भूजलपातळी ९ मीटरपर्यंत खालावली असून, पाण्याच्या पाख्या कोरड्याच राहिल्याने हजारो विहिरींना भर पावसाळ्यातही पाणी आले नाही. पश्चिम भागातील पालखेड डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात थोड्याफार विहिरींना पाणी होते, त्याही फेब्रुवारीच्या दरम्यान कोरडया झाल्या. अर्थात या भागातील १० ते २० टक्के विहिरी आज पाण्याची गरज भागवताना दिसतात. पण उत्तर-पूर्व भागातील डोंगराळ पट्ट्यात मात्र ९५ टक्के विहिरी कोरड्याच असल्याचे चित्र आहे. 

असा आहे अंदाज
तालुक्याच्या अवर्षणप्रवण उत्तर-पूर्व भागात असंख्य तर पालखेड लाभ क्षेत्रात मात्र कमी प्रमाणात विहिरी आहे. गावोगावी साधारणतः एका शेतकऱ्याकडे एक ते पाचपर्यंत विहिरी असून, या हिशेबाने सायगाव, जळगाव नेउरसारख्या गावात हजार ते दोन हजार तर अंदरसूल, नगरसूल, राजापूरसारख्या मोठ्या गावांत दोन ते तीन हजारांपर्यंत विहिरी असल्याचाही एक अंदाज पाहणीतून पुढे आला आहे. तरीही सरासरी एका गावात ८०० विहिरी गृहीत धरल्या. तर तालुक्यातील १२४ गावांतील विहिरींची संख्या ९९ हजार २०० होते. यातील बोटावर मोजण्याइतक्या म्हणजे १५ ते १७  हजार विहिरींनाच तुरळक प्रमाणात पाणी आहे. उर्वरित ८० ते ८२ हजार विहिरी मात्र कोरड्याठाक असल्याचाही अंदाज व्यक्त होत आहे.

तालुक्याच्या पावसाचे वेगवेगळे आकड्यांमुळे यंदा पूर्ण दुष्काळ जाहीर करण्यापासून तालुका वंचित राहिला आहे. शासनाच्या अधिकृतरीत्या नोंदीत ५ मंडळांची एकत्रित सरासरी ४५९ मिमी असून, पडलेला पाऊस २७९ मिमी इतकाच असल्याचे वास्तव आहे. पण जिल्हाधिकारी कार्यालयाने मात्र सरासरी पर्जन्यमान ४८८ मिमी दाखवून पडलेला पाऊस ४३७ मिमी व टक्केवारी ८९.५१ मिमी दाखवली आहे. हास्यास्पद म्हणजे हे आकडे फक्त येवला शहराचे असून, यालाच तहसील व जिल्हाधिकारी प्रशासनाने तालुक्याची सरासरी म्हटले आहे.
 

इतर ताज्या घडामोडी
कृषी भूसुक्ष्मजीवशास्त्रातील तथ्येमागील भागामध्ये उल्लेख आलेल्या डॉ. रंगास्वामी...
योग्य वेळी करा कडधान्य पेरणीमूग, उडीद :     मध्यम ते...
नियोजन चारा पिकांचे...सकस चाराउत्पादन केल्यास जास्तीत जास्त पोषणमूल्ये...
संत्रा, मोसंबी उत्पादकांना हेक्टरी एक...अमरावती : जिल्ह्यातील तापमान, पाणीटंचाई आणि...
विखे, क्षीरसागरांना मंत्रीपदे देऊन...नाशिक : ‘‘घटना माहीत असूनही त्याविरोधात निर्णय...
पाऊसकाळातही मराठवाडा टॅंकरग्रस्त औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत ५७ लाख...
रत्नागिरी : बळिराजाला आता आर्द्रा...रत्नागिरी :  मृग नक्षत्रात पावसाने पाठ...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांतील ८४...लातूर  : मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, लातूर...
सांगलीसह पश्‍चिमेकडे पाऊस सांगली : दोन दिवसांपासून पावसाने पश्‍चिम भागात...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील...
सोलापूर झेडपी सदस्यांची दुष्काळापेक्षा...सोलापूर : दुष्काळाच्या दाहकतेत जिल्हा पुरता...
नाशिकमध्ये वांगी ३००० ते ६००० रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात होणार...पुणे : दरवर्षी शेती कामांसाठी मजुरांची चांगलीच...
बांबू उत्पादनवाढीसाठी पुणे जिल्ह्यातील...पुणे  ः बांबू उत्पादनवाढीसाठी भोर, वेल्हा...
नगर जिल्ह्यातील ६३६ वैयक्तिक पाणी योजना...नगर  ः जिल्ह्यात यंदा दुष्काळाचा सर्वाधिक...
पाच जिल्ह्यांतील ६६८ छावण्यांमध्ये चार...औरंगाबाद  : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत...
पीकविमा अर्ज करण्यासाठी तालुका कृषी...मुंबई ः पीकविम्याबाबतच्या तक्रारी लक्षात...
‘लोकमंगल’प्रकरणी विधान परिषदेत गोंधळमुंबई : सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा मुलगा...
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना लेखी,...मुंबई ः राज्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील...
दोषी कंपनीलाच शासनाचे १५ कोटींचे...मुंबई : केंद्र सरकारच्या ‘आयएलएफएस’ या...