agriculture news in Marathi, west Bengal will gave 2 rupees subsidy to milk, Maharashtra | Agrowon

पश्चिम बंगाल दुधाला देणार दोन रुपये अनुदान
वृत्तसेवा
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

कोलकाता ः राज्यातील दूध उत्पादकांना प्रोत्साहन मिळावे आणि उत्पादनात वाढ व्हावी यासाठी पश्चिम बंगाल सरकार प्रयत्नशील आहे. पश्चिम बंगाल सरकारने राज्यातील दूध उत्पादकांना खरेदी दरावर प्रतिलिटर दोन रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. सहकारी दूध सोसायट्यांच्या माध्यमातून सरकारला दूध विकणाऱ्या उत्पादकांना याचा लाभ मिळणार आहे. 

कोलकाता ः राज्यातील दूध उत्पादकांना प्रोत्साहन मिळावे आणि उत्पादनात वाढ व्हावी यासाठी पश्चिम बंगाल सरकार प्रयत्नशील आहे. पश्चिम बंगाल सरकारने राज्यातील दूध उत्पादकांना खरेदी दरावर प्रतिलिटर दोन रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. सहकारी दूध सोसायट्यांच्या माध्यमातून सरकारला दूध विकणाऱ्या उत्पादकांना याचा लाभ मिळणार आहे. 

पश्चिम बंगाल राज्यात दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणात विस्तारला आहे. इतर राज्यांप्रमाणे येथेही दूध दराचा प्रश्न कायम अस्तित्वात असतो. त्यामुळे अनेकदा शेतकऱ्यांनी आंदोलनेही केली आहेत. सध्या येथे दुधाला २५ रुपये प्रतिलिटर दर मिळत आहे. सध्याचा २५ रुपये प्रतिलिटर दर कायम राहणार असून, यावर उत्पादकांना दोन रुपये अनुदान मिळणार आहे. अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा केले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

पश्चिम बंगाल राज्यात दूध व्यवसायात सहकार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. येथील पश्चिम बंगाल सहकारी दूध उत्पादक संघाशी जवळपास १.२ लाख दूध उत्पादक जोडले गेले आहेत. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांचा विचार केल्यास राज्यातील एकूण १० लाख लोकांना या अनुदान योजनेचा लाभ होणार आहे. दुधाला अनुदान देण्यासाठी राज्य सरकाच्या तिजोरीवरही ताण पडणार आहे. राज्याला जवळपास ६.५ कोटी रुपये यावर खर्च करावे लागणार आहे आणि ही रक्कम वित्त मंत्रालयाने आधीच दिली आहे.

सरकारच्या या निर्णयाचा राज्यातील दूध उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे. यातुन कुटुंबांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांना व्यवसाय वृद्धी करण्यासही मदत होईल. सध्या राज्यात १४ दूध संघ दूध खरेदी करतात. या संघांना दूध देणाऱ्या १ लाख २० हजार उत्पादकांना थेट लाभ मिळणार आहे.

पश्चिम बंगाल दूध उत्पादन

दुभत्या जनावरांची संख्या
३५ लाख ६ हजार

दूध उत्पादन
५१.८३ लाख टन

देशातील उत्पादनातील हिस्सा
३.२ टक्के

दूध व्यवसायाची वाढ
२.४७ टक्के

सहकारी सोसायट्या
३४५

सदस्य संख्या
१ लाख २० हजार

सध्याचा दूध दर
२५ रुपये लिटर

इतर अॅग्रो विशेष
बांधावर फुलवा ‘हिरवं सोनं’ण्याचा अभाव, मजूरटंचाई, मजूर व निविष्ठांचे...
आधुनिक सेवेसोबत ग्राहकांना हवा विश्‍वास संपूर्ण जगात अग्रेसर असलेल्या आधुनिक बॅंकिंग...
'शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय लवकरच...नवी दिल्ली  : समस्याग्रस्त शेती क्षेत्र आणि...
नंदुरबार, धुळ्यात पपई काढणी बंदनंदुरबार  : पपईच्या दरावरून शेतकरी, व्यापारी...
...त्या दिवशी घरातलं कुणी जेवलं नायसुपे, जि. पुणे : एकच बैल होता. चितऱ्या...
किमान तापमानात वाढ होण्याची शक्यतापुणे  : राज्याच्या किमान तापमानात वाढ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला जगात...पुणे - द टाइम्स हायर एज्युकेशनने जाहीर...
पीक फेरपालटीवर भर देत श्रीमंती केळीचे...कलाली (ता. अमळनेर, जि. जळगाव) येथील योगेश व मनोज...
बळिराजाच्या हाती पुन्हा ‘लोखंड्या नांगर’गणूर, जि. नाशिक : शेतमालाला मिळणारे कवडीमोल भाव,...
दराच्या प्रतीक्षेतील कांद्याला फुटले...वडेल, जि. नाशिक :  आज ना उद्या दर वाढला, की...
पोटदुखीवर कडू कंद उपयुक्त कडू कंद ही वेलवर्गीय वनस्पती असून...
शिरूर ठरले मुगासाठी हक्काची बाजारपेठपुणे जिल्ह्यात शिरूर बाजार समिती ही मुगासाठी...
तहात अडकले ‘ब्रेक्झिट’युरोपीय महासंघातून बाहेर पडायचे अथवा नाही, या...
साखरेच्या कमी दराची शिक्षा ऊस...ऊस दराच्या बाबतीत कधी नव्हे एवढी आर्थिक कोंडी या...
बायोडायनॅमिक पद्धतीने कमी काळात कंपोस्ट...बायोडायनॅमिक तंत्रज्ञान हे मूलत: भारतीय वेदांवर...
पाने कुरतडणाऱ्या मुंग्यांकडूनही होते...उष्ण कटिबंधीय जंगले हे नायट्रस ऑक्साईड या हरितगृह...
पणन सुधारणेतील दुरुस्तीला शेतकरी...मुंबई ः महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व...
ताराराणी महोत्सवातून घडली उद्यमशीलता,...कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत राज विभागाच्या...
कृषी निविष्ठा अनुदानासाठी ‘ऑनलाइन'ची...पुणे : राज्यात कृषी विभागाच्या योजनांमधील विविध...
'आयमा'ची होतेय मुस्कटदाबी; मोठ्या...पुणे : ट्रॅक्टर, हार्वेस्टर, रोटाव्हेटरसारख्या...