agriculture news in marathi, western part of Kolhapur district in rain | Agrowon

कोल्हापूर जिल्ह्यात पश्‍चिम भागात संततधार
टीम अॅग्रोवन
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात रविवारी (ता. १२) दिवसभर पावसाची रिपरिप राहिली. थांबून थांबून पाऊस सुरू होता. जोरदार नसला तरी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने खरीप पिकांना हा पाऊस उपयुक्त ठरणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील ११ बंधारे पाण्याखाली गेले असून, पंचगंगा नदीवरील कोल्हापुरातील राजाराम बंधाऱ्यावरील पाणीपातळी रविवारी सकाळी ७ वाजता १९ फूट इतकी होती.

कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात रविवारी (ता. १२) दिवसभर पावसाची रिपरिप राहिली. थांबून थांबून पाऊस सुरू होता. जोरदार नसला तरी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने खरीप पिकांना हा पाऊस उपयुक्त ठरणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील ११ बंधारे पाण्याखाली गेले असून, पंचगंगा नदीवरील कोल्हापुरातील राजाराम बंधाऱ्यावरील पाणीपातळी रविवारी सकाळी ७ वाजता १९ फूट इतकी होती.

पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यामध्ये पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ हे सात बंधारे पाण्याखाली आहेत. भोगावती नदीवरील हळदी व खडक कोगे हे दोन बंधारे पाण्याखाली आहे. वारणा नदीवरील चिंचोली व माणगांव हे दोन बंधारे पाण्याखाली आहे.

पाटंबधारे विभागाच्या नोंदीप्रमाणे कोल्हापुरातील राजाराम बंधाऱ्यावरील पाणीपातळी २० फूट, सुर्वे १९ फूट १० इंच, रुई ४८ फूट ६ इंच , इचलकरंजी ४६ फूट ३ इंच, तेरवाड ४४ फूट ३ इंच, शिरोळ ३३ फूट, नृसिंहवाडी २९ फूट इतकी होती. धरणक्षेत्रातही थांबून थांबून पाऊस सुरू असून पावसाचा जोर पाहून येत्या दोन दिवसांत धरणांतून पुन्हा पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात येईल, असे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले. रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत गगनबावड्यात सर्वाधिक ३९ मि.मी. पाऊस झाला.

शिराळा परिसरात वारणा(चांदोली) धरणात झपाट्याने वाढ होत असल्याचे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले. तर राधानगरी धरणामध्ये  ८.१९  टीएमसी इतका तर कोयना धरणात ९६.८७ टीएमसी पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा कंसात एकूण क्षमता टीएमसी मध्ये ः राधानगरी - ८.१९ (८.३६१), तुळशी ३.४७ (३.४७१), वारणा ३३.३३ (३४.३९९), दुधगंगा २४.१३ (२५.३९३), कासारी २.६५ (२.७७४), कडवी २.५२ (२.५१६), कुंभी २.४२ (२.७१५), पाटगाव ३.५७ (३.७१६), चिकोत्रा ०.९२ (१.५२२), चित्री १.८९ (१.८८६), जंगमहट्टी  १.२२ (१.२२४), घटप्रभा १.५६ (१.५६०), जांबरे ०.८२ (०.३००) आणि कोदे ल. पा. ०.२१ (०.२१४).

तालुकावार पाऊस असा
हातकणंगले ४.३७, शिरोळ ०.७१, पन्हाळा १०.४३, शाहुवाडी ३१.८३, राधानगरी ३४.००, करवीर ६.९०, कागल १५.८६, गडहिंग्लज १३, भुदरगड २८, आजरा १७.२५ व चंदगड ३४.६६, राधानगरीत ८.१९.

इतर ताज्या घडामोडी
संघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...
'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...
जालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...
शिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...