agriculture news in marathi, what happen to the demands put by Yeshwant Shinha | Agrowon

यशवंत सिन्हांच्या अकोला अांदोलनातील मागण्यांचे काय झाले?
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

अकोला ः शेतमालाची हमीभावाने खरेदी, वीज जोडणी, सावकारी कर्जमुक्ती, कर्जमाफी अादी मुद्यांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांचे अकोल्यातील अांदोलन मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अाश्वासनानंतर मागे घेण्यात अाले. तीन दिवस पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर सिन्हा व शेतकरी जागर मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी ठिय्या दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून अाश्वासन दिल्याने शेतकरी अांदोलन मागे घेण्यात अाले.

अकोला ः शेतमालाची हमीभावाने खरेदी, वीज जोडणी, सावकारी कर्जमुक्ती, कर्जमाफी अादी मुद्यांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांचे अकोल्यातील अांदोलन मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अाश्वासनानंतर मागे घेण्यात अाले. तीन दिवस पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर सिन्हा व शेतकरी जागर मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी ठिय्या दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून अाश्वासन दिल्याने शेतकरी अांदोलन मागे घेण्यात अाले. अांदोलकांच्या सर्वच मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी होकार दिल्याने हे अांदोलन मागे घेत असल्याचे सिन्हा यांनी माध्यमांसमोर जाहीरही केले; परंतु यापैकी किती मागण्या मान्य झाल्या याबाबत अाता प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले अाहेत.  

मंगळवारी (ता. ३०) यशवंत सिन्हा यांनी राष्ट्रमंच स्थापन केला. या राष्ट्रमंचाची संकल्पना ही अकोल्यात काम करत असलेल्या जागर मंचाच्या पार्श्वभूमीवर अाहे. यामध्ये सर्वच पक्षांचे नेते शेतकरी प्रश्नांवर मुक्तपणे बोलू शकतात, समस्यांना वाचा फोडू शकतात. मुळात अाता या राष्ट्र्मंचाच्या स्थापनेनंतर पुन्हा एकदा सिन्हा यांचे अकोला अांदोलन चर्चेत अाले अाहे. सिन्हा यांनी अकोल्यात तीन दिवस ठिय्या केले होते. या वेळी देशभरातील सरकारविरोधी व शेतकऱ्याच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या नेत्यांनी पाठिंबा दिला होता.

मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केल्यानंतर सिन्हा यांनी माघार घेतली होती. मुळात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जी अाश्वासने मिळाली त्याबाबत अाता दोन महिन्यांचा काळ पूर्ण होऊ घातला अाहे. तरीही प्रश्नांची सोडवणूक झालेली दिसत नाही. सावकारी कर्जमाफी तशीच कायम अाहे. शेतमालाच्या भावाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत अाहे. भावांतराचा विषय कुठेही अजेंड्यावर अालेला नाही, तर कर्जमाफीचा विषय अद्याप संपलेला नाही. विशेष म्हणजे १५ जानेवारीपर्यंत या मागण्यांच्या अाश्वासनाची अंमलबजावणी करण्याबाबत अाश्वासन देण्यात अाले होते. अाता जानेवारी महिला संपला अाहे; मात्र अाश्वासनाची पूर्तता कधीपासून सुरू होईल, हा मुद्दा कायम                                                                       अाहे.

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...
हिंगोली, नांदेड, परभणीत आॅनलाइन नोंदणीत...परभणी   ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
वारणा नदीवरील बंधारा दुरुस्तीमुळे...कोल्हापूर  : वारणा नदीवरील विविध बंधाऱ्यांची...
अळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...
शेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...
नांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...
पीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...
गिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...
'योग्य आर्थिक व्यवस्थापन हा शेती...नाशिक : ‘‘योग्य आर्थिक व्यवस्थापन हाच शेती...
कपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...
जळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढजळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस...
नागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक...नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली...