agriculture news in marathi, WHATSAP group for promotion of agricultural schemes | Agrowon

कृषी योजनांच्या प्रचारासाठी व्हाॅट्सअॅप ग्रुपचा आधार
टीम अॅग्रोवन
सोमवार, 20 नोव्हेंबर 2017

अकोला : कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती लाभार्थी शेतकऱ्यांपर्यत प्रभावीपणे पोचविण्यासाठी व्हॉट्सॲप ग्रुप निर्माण करण्याची सूचना कृषी आयुक्तांनी यंत्रणांना केली आहे.

शुक्रवारी (ता. १७) कृषी आयुक्तांनी परिपत्रक काढले आहे. त्यांनी केलेल्या सूचनेनुसार या ग्रुपमध्ये आत्माअंतर्गत स्थापन केलेल्या गटांचे प्रमुख, कृषी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधी, कृषिविषयक संस्थांचे पदाधिकारी, गावचे सरपंच, लोकप्रतिनिधींना प्राधान्याने अशा ग्रुपमध्ये घेण्याचे सांगितले आहे.

अकोला : कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती लाभार्थी शेतकऱ्यांपर्यत प्रभावीपणे पोचविण्यासाठी व्हॉट्सॲप ग्रुप निर्माण करण्याची सूचना कृषी आयुक्तांनी यंत्रणांना केली आहे.

शुक्रवारी (ता. १७) कृषी आयुक्तांनी परिपत्रक काढले आहे. त्यांनी केलेल्या सूचनेनुसार या ग्रुपमध्ये आत्माअंतर्गत स्थापन केलेल्या गटांचे प्रमुख, कृषी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधी, कृषिविषयक संस्थांचे पदाधिकारी, गावचे सरपंच, लोकप्रतिनिधींना प्राधान्याने अशा ग्रुपमध्ये घेण्याचे सांगितले आहे.

सध्या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. व्हाॅट्सॲपसारखे प्रभावी माध्यम घराघरात पोचले आहे. याचा वापर करून काही अधिकारी चांगल्या प्रकारचे विस्ताराचे काम करीत आहेत. याचीच दखल घेत आता कृषी आयुक्तांनीही गावपातळीवर व्हाॅट्सॲप ग्रुप तयार करण्याबाबत कृषी विभागाला सूचना केली आहे.

गावपातळीवर काम करणाऱ्या कृषी सहायकांनी गट बनविण्याची  त्यांनी सूचना केली आहे. प्रत्येक कृषी सहायकाने त्याच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावातील किमान 50 प्रगतिशील शेतकरी अशा ग्रुपद्वारे जोडावेत. ग्रुपची क्षमता लक्षात घेता किमान पाच गावांचा यामध्ये समावेश करावा. या ग्रुपचा वापर केवळ कृषिविषयक महत्त्वाच्या संदेशांची देवाणघेवाण करण्यासाठीच केला जावा, असेही सांगितले आहे.

‘व्हाट्सॲप ग्रुप’ फायदेशीर
काही जिल्ह्यांत कृषी सहायकांनी यापूर्वीच असे व्हाट्सॲप ग्रुप बनवित शेतकऱ्यांपर्यंत ज्ञान, तंत्र पोचविले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्‍यात कृषी सहायक विठ्ठल धांडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘आम्ही कांदा बिजोत्पादक'' हा ग्रुप बनविला आहे. या माध्यमातून गेल्या दोन वर्षांपासून कांदा बिजोत्पादनासंदर्भात संपूर्ण माहिती, मार्गदर्शन या माध्यमातून तत्काळ दिले जाते. यामुळे मेहकर तालुक्‍यातील कांदा बिजोत्पादकांना उत्पादन वाढीसाठी मोठी मदत झाली.  शेतकरी आजही या ग्रुपमध्ये सक्रिय असून वेळोवेळी मार्गदर्शन घेत असतात.

इतर अॅग्रो विशेष
जगभरात अवशेषमुक्त मालालाच मागणीपुणे : निर्यातीत युरोपीय देशांप्रमाणे अन्य...
पूर्णधान्य आहाराचा आरोग्यासाठी होतो...आरोग्यासाठी साध्या धान्यांच्या तुलनेमध्ये...
सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी :...नवी दिल्ली  : २०१९ मध्ये सत्तेत आल्यास...
त्रिगुणी म्हशीची विजयी पताकाजगात सर्वप्रथम हॅंड गाईडेड क्लोनिंग म्हणजे हस्त...
जाणिवेचा लॉंग मार्चशेतकरी संपामुळे सरकारला कर्जमाफीची घोषणा...
विदर्भात विस्तारतो आहे पोल्ट्री व्यवसायकडक उन्हाळ्यामुळे पोल्ट्री व्यवसाय विदर्भामध्ये...
तुरळक पावसाचा अंदाज; तापमान वाढणारपुणे : राज्यात सोमवारी (ता. १९) मध्य महाराष्ट्र,...
कृषी योजनांचा निधी खर्च करण्यात अपयशपुणे : कृषी विभागाच्या विविध योजनांचा निधी...
शेतकरी आत्महत्यांचे सरकारला काहीच वाटत...राळेगणसिद्धी, जि. नगर : ‘‘लोकपाल आणि लोकायुक्त...
कर्जमाफीचा लाभ मिळेपर्यंत व्याज माफ;...बारामती, पुणे ः "छत्रपती शिवाजी महाराज...
अवजारांची गुणवत्ता हाच बनलाय ब्रॅंडगिरणारे (जि. नाशिक) गावातील पिंकी सुधाकर पवार...
‘तेर` करतेय पर्यावरण, शिक्षण अन्‌ सौर...पुणे येथील ‘तेर पॉलिसी सेंटर` या स्वयंसेवी...
'कृषी उद्योग'मधील वादग्रस्त सूर्यगण...पुणे : महाराष्ट्र कृषी उद्योग महामंडळातील...
‘फॉस्फोनिक ॲसिड’च्या आढळाने ‘सॅंपल फेल’...पुणे : डाळिंब पिकात केवळ सातच लेबल क्लेम...
बोंड अळी, धान नुकसानग्रस्तांना मदतीसाठी...पुणे : बाेंड अळीच्या प्रादुर्भावाने नुकसान...
बेदाण्याचे यंदा तीस टक्केच उत्पादनसांगली : राज्यात दरवर्षी सुमारे २ लाख टन...
हमीभावाच्या मुद्द्यावरून गैरसमज पसरवले...नवी दिल्ली : उत्पादन खर्चावर ५० टक्के हमीभाव...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक...पुणे : राज्यावर अवकाळीचे ढग असल्याने पावसाचे सावट...
आसामी रेडकाचा ‘क्लोन’ यशस्वीहिस्सार, हरियाणा : येथील केंद्रीय म्हैस संशोधन...
राज्यात १५ लाख टन साखर उत्पादन वाढलेकोल्हापूर : राज्यात सुरू हंगामात यंदा अंदाजपेक्षा...