agriculture news in Marathi, wheat at 2700 rupees in Nagpur, Maharashtra | Agrowon

नागपूर बाजारात गव्हाचे दर २७०० रुपये क्‍विंटल
विनोद इंगोले
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

नागपूर ः कळमणा बाजार समितीत गव्हाची आवक होत असून, शरबती गव्हाचे दर २२०० ते २७०० रुपये प्रति क्‍विंटलवर स्थिरावले आहेत. या दरात वाढ होण्याची शक्‍यता तूर्तास नसल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. गव्हाची सरासरी आवक १५० ते २०० क्‍विंटलच्या घरात आहे. 

नागपूर ः कळमणा बाजार समितीत गव्हाची आवक होत असून, शरबती गव्हाचे दर २२०० ते २७०० रुपये प्रति क्‍विंटलवर स्थिरावले आहेत. या दरात वाढ होण्याची शक्‍यता तूर्तास नसल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. गव्हाची सरासरी आवक १५० ते २०० क्‍विंटलच्या घरात आहे. 

बाजार समितीत गहू, तांदूळ, सोयाबीनची आवक होत आहे. ज्वारीची सरासरी ८ ते ९ क्‍विंटल आवक असून, दर १७०० ते २००० रुपये क्‍विंटलचे आहेत. गेल्या आठवड्यात दर १६०० ते २००० रुपये क्‍विंटल होते. त्यात १०० रुपयांची वाढ नोंदविली गेली आहे. तांदळाची १५० ते १९० क्‍विंटल आवक आहे. लुचई तांदळाची २०० ते २१५ क्‍विंटलची आवक असून, २२०० ते २४०० रुपये क्‍विंटलचा दर लुचई तांदळाला मिळत आहे.

हरभरा दरात थोडीशी सुधारणा होत आहे. गेल्या आठवड्यात हरभरा दर ३८२४ रुपये क्‍विंटल होते. त्यात अल्प वाढ होत हे दर ३१०० ते ३९७२ रुपये क्‍विंटलवर पोचले. त्यात आणखी सुधारणा शक्‍य नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. बाजारात हरभऱ्याची आवक ४५० क्‍विंटलच्या आसपास आहे. बाजारात तुरीची १००० क्‍विंटलपेक्षा अधिकची आवक नोंदविली जात आहे. तुरीचे दर ३९०० ते ४५७६ रुपये क्‍विंटल असे आहेत.

तिळाची आवक ४ क्‍विंटल तर दर ५३०० ते ५५०० रुपये क्‍विंटल असे होते. मोठ्या आकाराच्या संत्रा फळांची आवक बाजारात सुरूच आहे. संत्रा फळांना २५०० ते ३००० रुपये क्‍विंटलचा दर मिळत असून, आवक १४०० ते १७०० क्‍विंटलच्या आसपास आहे. संत्रा फळांच्या दरात आठवडाभरात चांगलीच सुधारणा झाली आहे. मोसंबी फळांची देखील आवक बाजारात होत असून, मोठ्या आकाराच्या फळांना २४०० ते २८०० रुपये क्‍विंटलचा दर असून, आवक ८०० क्‍विंटलच्या घरात आहे.

सोयाबीन दर स्थिर
वाशीम बाजारात सोयाबीनने ४००० रुपये क्‍विंटलचा पल्ला गाठला होता. आजच्या घडीला वाशीम बाजार समितीत सोयाबीन ३६०० ते ३७०० रुपये क्‍विंटलवर स्थिरावले आहे. विदर्भाच्या उर्वरित बाजार समित्यांमध्ये सोयाबीन ३२०० ते ३५०० रुपये क्‍विंटल आहे. नागपूर बाजार समितीत ३५५० रुपये क्‍विंटलने सोयाबीनचे व्यवहार होत आहेत. सोयाबीनची आवक ९५० क्‍विंटलच्या आसपास आहे.

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
पुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...
योग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...