agriculture news in marathi, wheat arrival increase in market committee, jalgaon, maharashtra | Agrowon

जळगाव जिल्ह्यात गव्हाची आवक वाढतेय
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 22 मार्च 2018
जळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये गव्हाची आवक वाढत आहे. दर स्थिर असून, सर्वाधिक आवक चोपडा बाजार समितीमध्ये होत आहे. १२५० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल असा दर लोकवन गव्हाला आहे.
 
जळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये गव्हाची आवक वाढत आहे. दर स्थिर असून, सर्वाधिक आवक चोपडा बाजार समितीमध्ये होत आहे. १२५० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल असा दर लोकवन गव्हाला आहे.
 
यंदा गव्हाची सरासरी क्षेत्रावर पेरणी झाली होती. पेरणीचे क्षेत्र तापी काठावरील चोपडा, यावल, रावेर या भागात अधिक होते. मुक्ताईनगर, जळगाव, पाचोरा भागातही बऱ्यापैकी पेरणी यंदा झाली होती. क्षेत्र २३ हजार हेक्‍टरपर्यंत होते. गहू उत्पादनही एकरी १० क्विंटलपर्यंत येत आहे. काळ्या कसदार जमिनीमध्ये अधिकचे उत्पादन येत असून, हलक्‍या, खडीमिश्रित जमिनीत एकरी सात क्विंटलपर्यंत उत्पादन मिळत असल्याची माहिती मिळाली. 
 
गव्हाची मळणी अजूनही अनेक भागात सुरू आहे. दिवाळीनंतर पेरणी केलेल्या गव्हाची मळणी पूर्ण झाली आहे. परंतु डिसेंबरमध्ये पेरणी केलेल्या गव्हाची मळणी अजून झालेली नाही. परंतु जिल्हाभरातील बहुतांश क्षेत्रावरील गहू मळणीवर आला आहे. काही ठिकाणी कापणी पूर्ण झाली असून, गव्हाचे ढीग लावले आहेत. मागील १८ ते २० दिवस जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी कापणी केली नाही.
 
कापणीनंतर पाऊस आला तर अधिक नुकसानीची भीती शेतकऱ्यांना होती. अशातच कापणी रखडली. बुधवारी (ता. २१) वातावरण निरभ्र असल्याने कापणी व मळणीची कामे गतीने सुरू झाली. अनेक शेतकऱ्यांनी मळणी केल्याने बाजार समितीमध्येही आवक वाढली आहे.
 
चोपडा बाजार समितीमध्ये चुकारे मिळण्याची पद्धत सुकर असल्याने शेतकरी या बाजार समितीमध्ये गहू नेत आहेत. जळगाव व धरणगावचे शेतकरीदेखील चोपडा बाजार समितीत गहू नेत आहेत. अमळनेर व पाचोरा बाजार समितीमध्येही चांगली आवक सुरू असून, या तिन्ही बाजार समित्यांमध्ये रोज मिळून दोन हजार क्विंटल गव्हाची आवक होत आहे.
 
रावेर व मुक्ताईनगरमधील काही शेतकऱ्यांचा गहू बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) येथील व्यापाऱ्यांनी जागेवरच खरेदी केला आहे. लोकवन प्रकारच्या गव्हास तेथील व्यापाऱ्यांनी १२०० ते १४०० रुपये क्विंटलचा दर दिला आहे. गव्हाची मागणी बरी असल्याने लिलावही हातोहात होत आहेत. दर स्थिर असून, मार्चअखेरीमुळे चाकरमानी दादरप्रमाणेच गव्हाचीदेखील वर्षभरासाठी खरेदी करून घेत आहेत. त्यामुळे दर्जेदार गव्हाला चांगली मागणी आहे.

इतर ताज्या घडामोडी
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...
जळगाव जिल्हा परिषदेत विरोधक शांत;...जळगाव : पोषण आहार, शिक्षक बदल्या यावरून जिल्हा...
नगर जिल्ह्याच्या काही भागांत पावसाचे...नगर ः गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेला आणि...
भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादनात घटीची...भंडारा : गेल्या वीस दिवसांपासून धानपट्ट्यात...
नगरमध्ये डाळिंबाच्या दरात पंचवीस...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये गेल्या दीड महिन्याच्या...
उरुग्वेतील गायीमधील लेप्टोस्पायरा...जगभरामध्ये प्राणी आणि मनुष्यामध्ये...
सागरी माशांच्या बिजोत्पादनाचे तंत्र...कोची येथील केंद्रीय सामुद्री मत्स्य संशोधन...
कोल्हापुरातील ११० गावांत कृत्रिम...कोल्हापूर : अनुवंशिक सुधारणा होऊन सशक्त जनावरांची...
पुणे विभागात ७३,७४० हजार हेक्टरवर...पुणे   ः  गेल्या साडेतीन महिन्यांत...
मराठवाड्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार...औरंगाबाद  : मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी...
पावसाअभावी वऱ्हाडात सोयाबीनचे उत्पादन...अकोला   ः या हंगामात वऱ्हाडात सर्वाधिक लागवड...
पुणे जिल्ह्यात महिनाभरात नऊ जणांचा...उरुळी कांचन, जि. पुणे : संपूर्ण राज्यात चिंतेचा...
मी 35-40 रूपयांनी पेट्रोल-डिझेलची...नवी दिल्ली : सध्या पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे मोदी...
लाल मातीचा सन्मान वाढविणारे आंदळकरकोल्हापुरातील २२ जून १९७० चा म्हणजे ४८...
डी.आर. कुलकर्णी यांचे निधनपुणे : 'सकाळ'च्या पुणे आवृत्तीतील मुख्य उपसंपादक...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज जन्मदिन...भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 68 वा वाढदिवस...
देशात सर्वाधिक महाग पेट्रोल मराठवाड्यात...लातूर : गेली सलग अठरा दिवस देशात पेट्रोल आणि...