भारतात आणखी १ लाख टन गहू आयात होणार
कोजेन्सिस वृत्तसेवा
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017
मुंबई ः पुढील काही दिवसांत केंद्र सरकारकडून गव्हावरील आयात शुल्क वाढविले जाण्याची शक्‍यता आहे. त्यापूर्वीच भारतातील व्यापारी अधिक गहू आयात करत आहेत. देशात सप्टेंबरअखेर आणि ऑक्‍टोबरच्या मध्यावधीमध्ये युक्रेनमधून १ लाख टन आयात गहू भारतातील बंदरात दाखल होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
 
मुंबई ः पुढील काही दिवसांत केंद्र सरकारकडून गव्हावरील आयात शुल्क वाढविले जाण्याची शक्‍यता आहे. त्यापूर्वीच भारतातील व्यापारी अधिक गहू आयात करत आहेत. देशात सप्टेंबरअखेर आणि ऑक्‍टोबरच्या मध्यावधीमध्ये युक्रेनमधून १ लाख टन आयात गहू भारतातील बंदरात दाखल होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
 
भारतात आयात होणारा गव्हाचा दर प्रतिटन २०७-२१० डॉलर असा आहे. ऑक्‍टोबरपासून रब्बी गहू पिकासाठी पेरणी सुरू होणार आहे. रब्बीतील गहू पेरणीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. त्यासाठी गव्हावरील आयात शुल्क केंद्राकडून दुपटीने वाढविले जाण्याची शक्‍यता आहे.
 
सध्या गहू आयातीवर १० टक्के शुल्क आहे. यामुळे देशात खासगी व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात गहू आयात केला जात आहे. याआधी देशातील व्यापाऱ्यांनी युक्रेन आणि रशियातून ६ लाख टन गहू आयातीसाठी करार केले आहेत. काळा समुद्र भूभागात गव्हाचे बंपर उत्पादन झाल्याने दर घसरले आहेत. यामुळे कमी किमतीत गहू मोठ्या प्रमाणात आयात केला जात आहे.
 
आयात गव्हामुळे दरात घसरण
देशातील व्यापारी मोठ्या प्रमाणात परदेशांतून गहू आयात करत असल्यामुळे देशांतर्गत बाजारातील गव्हाच्या दरात घसरण होऊ लागली आहे. दिल्लीत सोमवारी (ता. १८) गव्हाचा दर प्रतिक्विंटल १,७५० रुपयांपर्यंत खाली आला होता. मागणी कमी राहिल्याने गव्हाच्या दरात घसरण होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
 
युक्रेन आणि ऑस्ट्रेलियातून गहू आयात केला जात आहे. याचा परिणाम देशांतर्गत बाजारातील गव्हाच्या दरावर होत असल्याचे दिसून येत आहे

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात सर्वाधिक शेतकऱ्यांना...नगर  : राज्यात कर्जमाफी मिळणारे सर्वाधिक...
राज्य सरकारचे धोरण शेतकरी हिताचे ः जानकरउस्मानाबाद  : राज्य सरकारचे धोरण...
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा सरकारचा...नाशिक : राज्यातील शेतकऱ्यांना ऐन दिवाळीत...
सणाच्या दिवशी शेतकऱ्यांचे ठेचा भाकर...बुलडाणा : एेन सण काळात स्वाभिमानी शेतकरी...
शेतीपूरक व्यवसायाच्या आराखड्याचे काम...पुणे : शेतकऱ्यांना कर्जमाफी केली असली तरी,...
औरंगाबाद येथे कर्जमाफी प्रमाणपत्राचे... औरंगाबाद  : औरंगाबाद जिल्हाधिकारी...
देशातील सर्वांत मोठी कर्जमाफी ः... सातारा  : शेती आणि शेतकऱ्यांना चांगले दिवस...
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी... हिंगोली : अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा...
कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड ः... नांदेड : राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज...
शासन शेतीमाल प्रक्रिया उद्योगांवर भर... जळगाव  ः शेती व शेतकऱ्यांच्या विकासासाठी...
असंतोष विभागण्यासाठीच कर्जमाफीचे...मुंबई : सरकारने कर्जमाफीसाठी ज्या अटी- शर्ती लागू...
संत गजानन महाराज संस्थान करतेय...शेगाव, जि. बुलडाणा : शिस्त, सेवा अाणि समाज...
परभणीतील शेतकऱ्यांना कर्जमाफी... परभणी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
राज्यातील बहुतांशी भागांत उकाडा वाढलापुणे : परतीचा पाऊस राज्यातून गेल्याने बहुतांशी...
कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक ः सदाभाऊ खोत कोल्हापूर : शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नयेत...
कर्जमाफी शेतकऱ्यांना ताकद देणारी ः... बुलडाणा : राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज...
अपयश लपविण्यासाठी भाजपकडून खोटी...मुंबई: दुसऱ्या टप्प्यातील ३७०० ग्रामपंचायतींच्या...
औरंगाबादेत २९ ऑक्‍टोबरला 'मराठा महासभा' औरंगाबाद : मराठा समाजातर्फे राज्यभर 57 मोर्चे...
नागपुरात सोयाबीन प्रतिक्‍विंटल २७५०...नागपूर ः बाजारात सोयाबीनच्या दरात होणाऱ्या किरकोळ...
केवळ अमळनेरलाच कडधान्य खरेदी केंद्र सुरू जळगाव  ः जिल्ह्यात मंगळवारपर्यंत (ता. १७)...