agriculture news in marathi, wheat crop area decrease in pune region, maharashtra | Agrowon

पुणे विभागात गव्हाची अवघी १० टक्के पेरणी
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

पुणे   ः जमिनीत ओल नसल्याने रब्बी हंगामातील गव्हाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. पुणे विभागात पाण्याची सुविधा असलेल्या काही ठिकाणी पेरण्या सुरू आहेत. विभागात गव्हाचे सरासरी क्षेत्र एक लाख ५४ हजार ८४२ हेक्टर आहे. त्यापैकी १५ हजार ८२४ हेक्टरवर म्हणजेच अवघ्या दहा टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

पुणे   ः जमिनीत ओल नसल्याने रब्बी हंगामातील गव्हाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. पुणे विभागात पाण्याची सुविधा असलेल्या काही ठिकाणी पेरण्या सुरू आहेत. विभागात गव्हाचे सरासरी क्षेत्र एक लाख ५४ हजार ८४२ हेक्टर आहे. त्यापैकी १५ हजार ८२४ हेक्टरवर म्हणजेच अवघ्या दहा टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

यंदा जून महिन्यापासून पावसाचे प्रमाण अत्यंत कमी राहिले. पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, नगर जिल्ह्यांतील संगमनेर, अकोले या तालुक्यांत बऱ्यापैकी पाऊस झाला. त्यामुळे धरणांतील पाणीसाठ्यात काही प्रमाणात वाढ झाली होती. परंतु परतीचा पाऊस पुरेशा प्रमाणात न झाल्याने भूजल पातळीत वाढ झाली नाही. परिणामी पुणे विभागातील बहुतांशी तालुक्यांत आॅक्टोबरपासूनच टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. आगामी काळात भीषण पाणीटंचाई उद्भवण्याची शक्यता आहे. पुढील काळातील पाणीटंचाई गृहीत धरून शेतकरी पेरण्या न करण्याची सावध भूमिका घेत आहे. त्याचा उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

नगर जिल्ह्यातील राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव, अकोले, संगमनेर, राहुरी, नेवासा, शेवगाव, पाथर्डी, नगर या तालुक्यांत अत्यंत कमी क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली आहे. पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड या तालुक्यात अपेक्षित पेरणी झालेली नाही. राहाता तालुक्यात सुमारे दीड हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे.

पुणे जिल्ह्यातील जुन्नर, हवेली, वेल्हे, इंदापूर, पुरंदर, बारामती, आंबेगाव, मुळशी या तालुक्यांत गव्हाची अत्यल्प पेरणी झाली आहे. भोर, मावळ, खेड, शिरूर, दौंड तालुक्यांत अजूनही पेरणी झालेली नाही. सोलापूर जिल्ह्यातील उत्तर, दक्षिण सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, मोहोळ, मंगळवेढा तालुक्यात अल्प प्रमाणात पेरणी झाली आहे. करमाळा, पंढरपूर, सांगोला, माढा, माळशिरस ही तालुके गव्हाच्या पेरणीपासून दूर आहेत.

 

जिल्हानिहाय झालेली गव्हाची पेरणी (हेक्टर)
जिल्हा सरासरी क्षेत्र पेरणी झालेले क्षेत्र टक्केवारी
नगर ४९,७८५ ५२४२ ११
पुणे ६३,८५४ ५०२१
सोलापूर ४१,२०३ ५५६१ १३
एकूण १,५४,८४२ १५,८२४ १०

 

इतर ताज्या घडामोडी
जळगावात दादरला ३१०० रुपयांपर्यंत दरजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (...
भारतीयांच्या पचनसंस्थेतील...भारतीय लोकांच्या पचनसंस्थेमध्ये कार्यरत...
अमरावती विभागाला पाणीटंचाईच्या झळाबुलडाणा : कमी पावसामुळे अमरावती विभागातील...
तूर विक्रीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची...अकोला  : या हंगामात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या...
शेतकरी, जवान अडचणीत : भुजबळनाशिक : सध्याच्या सरकारच्या काळात देशातील...
दुष्काळात खचू नका, शासन पाठीशी :...सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी,...
शेतकऱ्यांच्‍या थकवलेल्या पैशांची...पुणे ः शेतीमालाचा लिलाव झाल्यानंतर २४ तासांत पैसे...
नगर जिल्हा परिषदेचा यंदा ४४ कोटी...नगर : जिल्हा परिषदेत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण...
नांदेड परिमंडळात सौर कृषिपंप योजनेसाठी...नांदेड ः मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत...
शेतीमाल तारण योजनेत ४०६ शेतकऱ्यांनी...औरंगाबाद : मराठवाड्यातील जालना, परभणी व हिंगोली...
ऊस उत्पादक शेतकरी देणार शहिदांच्या...कोल्हापूर : पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात...
तूर खरेदीतील अनागोंदीविरुद्ध आंदोलनअकोला  ः जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात...
'पुलवामा'चा सूत्रधार काश्‍मीरमध्येच?नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...
उन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...
केम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...
‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...
‘एसटी’साठी जागा आठ हजार अन्‌ अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...
दररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्‍...
'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...
बांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...