agriculture news in marathi, wheat crop sowing status in pune region, maharashtra | Agrowon

पुणे विभागात गव्हाची एक लाख ६६ हजार हेक्‍टरवर पेरणी
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 16 जानेवारी 2018

विभागात नगर, पुणे, सोलापूर या जिल्ह्यांतील काही तालुके गहू पिकासाठी ओळखले जातात. चांगल्या पावसामुळे गव्हाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. त्यामुळे उत्पादनातही चांगली वाढ होईल, अशी अपेक्षा आहे.
- विजयकुमार इंगळे, विभागीय कृषी सहसंचालक, पुणे विभाग.

पुणे  ः पुणे विभागात गव्हाची पेरणी उरकली असून, सध्या पीक वाढीच्या अवस्थेत आहे. आत्तापर्यंत विभागात सरासरी एक लाख ७२ हजार ३९४ हेक्‍टरपैकी एक लाख ६६ हजार ८५६ हेक्‍टरवर म्हणजेच ९७ टक्के क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

यंदा चांगल्या झालेल्या पावसामुळे गव्हाच्या पेरणीच्या क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज कृषी विभागाच्या सूत्रांचा होता. गव्हाच्या पेरणीस नोव्हेंबर ते डिसेंबर हा कालावधी योग्य असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी गव्हाची पेरणी केली आहे. सध्या पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. लवकर पेरणी झालेल्या ठिकाणी गहू ओंबी निसवण्याच्या अवस्थेत आहे. पुणे जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग, नगर जिल्ह्याच्या उत्तरेकडील तालुके, सोलापूरातील अक्कलकोट, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर हे तालुके गहू पिकासाठी ओळखले जातात.

विभागात नगर जिल्ह्यात गव्हाचे सरासरी ६९ हजार ४६१ हेक्‍टर क्षेत्र आहे. त्यापैकी ६९ हजार ७७ हेक्‍टर म्हणजेच ९९ टक्के पेरणी झाली आहे. पुणे जिल्ह्यात सरासरी ६० हजार ४९ हेक्‍टर क्षेत्र आहे. त्यापैकी ४२ हजार ३८० हेक्‍टर म्हणजेच ७१ टक्के पेरणी झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात सरासरी क्षेत्र ४२ हजार ८८४ हेक्‍टर आहे. त्यापैकी ५५ हजार ३९९ हेक्‍टर म्हणजेच १२९ टक्के पेरणी झाली आहे.

यंदा झालेल्या अधिक पेरणीमुळे गव्हाच्या उत्पादनात मोठी वाढ होण्याची शक्‍यता असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
 

इतर ताज्या घडामोडी
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...
गनिमी काव्याने राष्ट्रीय किसान...नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघातर्फे...
बीड जिल्ह्यात एक लाख क्विंटल तुरीचे...बीड  : शासनाने नाफेडमार्फत केलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी...पुणे: जिल्ह्यातील भातपट्ट्यातील शेतकऱ्यांनी खरीप...
शिवसेना-भाजपच्या कुरघोडीने युतीवरचे...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी राज्यातील...
पीककर्ज वाटप सुरू करण्याची स्वाभिमानीची...परभणी : उत्पादनात घट आल्यामुळे तसेच...
सांगली जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसांगली : जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू...
नांदेड विभागातील साखर कारखान्यांची...नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड...
नवीन ९९ लाख लाभार्थी घेतील...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत आता...
नगर जिल्ह्यातील सहा ठिकाणी हरभरा खरेदी...नगर  ः खरेदी केलेला हरभरा साठवणुकीसाठी जागा...
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...
सोलापुरात गाजर, काकडीचे दर वधारले,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांनी थकीत `एफआरपी' त्वरीत...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवलेले...