नगरला गव्हाला १६४१ ते १८५० रुपये प्रतिक्विंटल दर

नगरला गव्हाला १६४१ ते १८५० रुपये प्रतिक्विंटल दर
नगरला गव्हाला १६४१ ते १८५० रुपये प्रतिक्विंटल दर

नगर : नगर बाजार समितीत गव्हाची आवक बऱ्यापैकी होत आहे. सध्या गव्हाला १६४१ ते १८५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. चिंच, लाल मिरचीची आवकही सुरू आहे. नगर बाजार समितीत नगरसह बीड, सोलापूर भागांतूनही भुसार मालाची आवक होत असते. सध्या बाजार समितीत सर्वाधिक गव्हाची आवक सुरू आहे. गत सप्ताहात ३६३ क्विंटल गव्हाची आवक झाली. गावरान ज्वारीची १४७ क्विंटलची आवक होऊन १४०० ते २१०० रुपये दर मिळाला.   बाजरीची ४३ क्विंटलची आवक होऊन ११५० रुपये दर मिळाला. तुरीची २३० क्विंटलची आवई होऊन ३४५० ते ३९०० रुपये दर मिळाला. लाल मिरचीची २२७ क्विंटलची आवक होऊन ४८४८ ते ९७०० रुपये दर मिळाला. चिंचेची ९६१ क्विंटलची आवक होऊन ६०६५ ते ८९०० रुपये दर मिळाला. चवळीची तीन क्विंटलची आवक होऊन ४६७१ रुपये दर मिळाला. गुळडागाची ४६९५ क्विंटलची आवक होऊन २४५० ते ३२२५ रुपये दर मिळाला. मुगाची २१ क्विंटलची आवक होऊन ४७०७ रुपयाचा दल मिळाला. हरभऱ्याची २३९ क्विंटलची आवक होऊन ३२०० ते ३२५० रुपये दर मिळाला. सोयाबीनची ७० क्विंटलची आवक होऊन ३२०० ते ३४५० रुपये दर मिळाला. बाजार समितीत भाजीपाल्यात मेथी, कोथिंबीर, बटाटे, वांगी, फ्लाॅवर, टोमॅटो, ढोबळी मिरची, हिरवी मिरचीची आवक चांगली आहे. मात्र दर स्थिर आहे. फळांचीही आवक चांगली आहे, असे बाजार समितीचे सचिव अभय भिसे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com