agriculture news in marathi, wheat harvesting starts, pune, maharashtra | Agrowon

पुणे जिल्ह्यात गव्हाची काढणी सुरू
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 22 मार्च 2018
कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भात काढणीसाठी रिपर दिले होते. त्याचा गहू काढणीसाठी उपयोग केला जाऊ शकतो, याचे प्रात्यक्षिक आम्ही दोन दिवसांपूर्वी शेतकऱ्यांना दाखवले. अनेक शेतकरी रिपरचा वापर करून गव्हाची काढणी करू लागले आहे. 
- राहुल घोगरे, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक, आत्मा, मावळ,
पुणे  ः दिवसेंदिवसे शेतीकामांसाठी मजुरांचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. यावर उपाय म्हणून शेतकरी हळूहळू यांत्रिकीकरणाकडे वळू लागले आहेत. पुणे जिल्ह्यात गहू पीक काढणीचा हंगाम सुरू आहे. अनेक शेतकरी यंत्रांचा वापर करून गव्हाची काढणी करू लागले आहेत. त्यामुळे वेळेची मोठी बचत होत आहे. 
 
यंदा रब्बी हंगामात जिल्ह्यात गव्हाची ६० हजार ४९ हेक्‍टर सरासरीक्षेत्रापैकी ४७ हजार ९६० हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. ही पेरणी शेतकऱ्यांनी नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत केली. साधारणपणे साडेतीन ते चार महिन्यांनी गव्हाची काढणी केली जाते. मात्र, दरवर्षी पीक काढणीच्या वेळेस मजुरांचा प्रश्न कायम शेतकऱ्यांना भेडसावतो. त्यामुळे काढणीस विलंब होऊन काही वेळेस अधिक नुकसान होते. त्यावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरणाचा अवलंब करण्यास सुरवात केली आहे.
 
जिल्ह्यातील पूर्वेकडील बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, पुरंदर आणि उत्तरेकडील आंबेगाव, जुन्नर, खेड तालुक्‍यांत मोठ्या प्रमाणात गव्हाची पेरणी होते. त्यामुळे अनेक शेतकरी मळणी यंत्राचा, तसेच हार्वेस्टरचा उपयोग करतात. त्यामुळे कमी वेळेत गव्हाची काढणी होते.
 
पश्‍चिम पट्ट्यातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा तालुके भात पिकांसाठी प्रसिद्ध आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या पटट्यात शेतकरी पीक बदल करत आहे.
त्यामुळे या भात पट्ट्यातही अनेक शेतकरी गहू, हरभरा अशी विविध पिके घेऊ लागले आहेत. 
 
डोंगराळ भाग असल्याने या भागात यांत्रिकीकरणाचा फारसा प्रसार झालेला नाही. मात्र, कृषी विभागाने यंदा यांत्रिकीकरणावर अधिक भर दिल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना भात काढणीसाठी पन्नास टक्के अनुदानावर रिपर उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे अनेक शेतकरी या रिपरचा अवलंब करून गव्हाची काढणी करू लागले आहे.
 
त्याबाबत मावळ तालुक्‍यातील कृषी व आत्मा विभागाने देवले येथे शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण आयोजित करून रिपरच्या माध्यमातून गव्हाची काढणी करणे शक्‍य असल्याचे प्रात्यक्षिक दाखवले.  

 

इतर ताज्या घडामोडी
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...
नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...
बुलडाणा येथे २ आॅक्टोबरला सोयाबीन-कापूस...बुलडाणा   : पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक...
उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी ‘आंदोलन...कोल्हापूर : उसाचा दुसरा हप्ता मिळावा व १५ टक्के...
कोल्हापूर येथे १० ऑक्‍टोबरला ऊस परिषद...कोल्हापूर  : सरकारने एफआरपीचे तुकडे करून...
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...