agriculture news in marathi, wheat production status, jalgaon, maharashtra | Agrowon

जळगाव जिल्ह्यात काळ्या कसदार जमिनीत गव्हाचे चांगले उत्पादन
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 8 मार्च 2018
गहू व तुरीचे पीक घेऊन क्षेत्र रिकामे झाले आहे. त्यात आता केळी लागवड केली जाईल. केळीला गव्हाचे बेवड उपयुक्त असते. गव्हाचे उत्पादनही यंदा १० क्विंटलपर्यंत शेतकऱ्यांना आले आहे. 
- रमेश पाटील, शेतकरी, मंगरूळ, जि. जळगाव.
जळगाव ः जिल्ह्यात यंदा रब्बी पिकांचे उत्पादन बऱ्यापैकी हाती येत असून, गव्हाची सरासरी उत्पादकता गाठण्यात यश आल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. काळ्या कसदार जमिनीत यंदा पीक व्यवस्थित आले असून, एकरी १० ते १२ क्विंटलपर्यंत उत्पादन अनेक शेतकऱ्यांना मिळाले आहे. 
 
जिल्ह्यात गव्हाचे क्षेत्र कमी होत असले, तरी केळी पीकपट्ट्यात बेवड म्हणून गव्हाचे पीक शेतकरी घेतात. तापी काठावरील गावांमध्ये गहू पीक अधिक असते. यंदाही यावल, रावेर, चोपडा व मुक्ताईनगर भागात पेरणी अधिक होती. यापाठोपाठ जळगाव, पाचोरा, जामनेर भागात गहू पेरणी झाली होती. एकूण क्षेत्र सुमारे २५ हजार हेक्‍टर होते. नोव्हेंबरमध्ये पेरणी केलेल्या गव्हाची मळणी झाली आहे. डिसेंबरमध्ये पेरणी केलेला गहू कापणीच्या अवस्थेत येत आहे. 
 
चोपडा, यावल भागातील गव्हाखालील कमाल क्षेत्र मळणी होऊन रिकामे झाले आहे. यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या मशिनद्वारे मळणीला प्राधान्य दिले. त्यात कापणी व गहू गोळा करण्याचे श्रम वाचले. शिवाय काम लवकर झाले. वेळेची बचत झाल्याने गहू घरात लवकर पोचला. सध्या ढगाळ वातावरण आहे. त्यात मध्यंतरी वारा सुटल्याने काही ठिकाणी गहू आडवा झाला आहे. त्यात दाणे बारीक पडल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. हलक्‍या, खडीयुक्त जमिनीत गव्हाचे उत्पादन एकरी आठ क्विंटलपर्यंत आहे. काळ्या कसदार जमिनीत मात्र सरासरी उत्पादन आले आहे. मागील वर्षीही एकरी १० ते १२ क्विंटल एवढे उत्पादन तापीकाठालगतच्या भागात शेतकऱ्यांना मिळाले होते. 
 
गहू मळणीनंतर रावेर, यावल भागात शेतकऱ्यांनी केळी लागवडीसाठी जमीन तयार करायला सुरवात केली आहे. जमीन तयार करून या महिन्याच्या मध्यात किंवा अखेरीस आंबेबहार केळी लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. रावेरात आंबेबहार केळी लागवड अधिक होईल, असे सांगण्यात आले.
टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
किमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
पुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...
शाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...
मराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...
अमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...
गुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...
लोकसभेसाठी माढ्यातून तुल्यबळ उमेदवारकऱ्हाड : लोकसभेसाठी माढा मतदारसंघात भारतीय जनता...
उपोषणासाठी बाजार समित्यांच्या...नाशिक : नियमनमुक्तीमुळे बाजार समित्यांचे...
परभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर : परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...
युवकांच्या सहकारी संस्था स्थापणार :...कऱ्हाड : राज्यातील सहकारी संस्थांचे सभासद हे ६०...
बाजार समित्यांमधील...नाशिक : तेलंगण, तमिळनाडू व कर्नाटकच्या धर्तीवर...
पुलवामातील हल्ल्यात बुलढाणा जिल्ह्याचे...बुलडाणा : पुलवामा येथे झालेल्या अतिरेकी ...
हल्ल्या मागे जे आहेत त्यांना शिक्षा...नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा...
आम्ही विसरणार नाही.. माफही करणार नाही...नवी दिल्ली- जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात...
काश्‍मीरमधील शेतकऱ्याला थकबाकीची रक्कम...पुणे : काश्‍मीरमधील शेतकऱ्याला सफरचंदाचे पैसे...
बिबट्याच्या दहशतीखाली चोरट्यांकडून...आंबेठाण, जि. पुणे : शिंदे गाव (ता. खेड) येथे दोन...
‘डिंभे’चे पाणी जोड बोगद्याद्वारे ‘...मुंबई : डिंभे डाव्या तीर कालव्यातील गळती...
विदर्भात आज गारपीट, हलक्या पावसाचा अंदाजपुणे : पोषक हवामानामुळे आज (ता. १४) विदर्भात...
कापसासाठी ‘एमसीएक्‍स’कडून गोदामांची...मुंबई : कापूस उत्पादक शेतकऱ्यांना समृद्ध...
कर्ज देण्याच्या नावाखाली ७३ शेतकऱ्यांची...गोंदिया : कर्ज देण्याच्या नावाखाली ७३...