कळमणा बाजार समितीत गव्हाची आवक वाढली

कळमणा बाजार समितीत गव्हाची आवक वाढली
कळमणा बाजार समितीत गव्हाची आवक वाढली

नागपूर ः बाजारात गव्हाची आवक वाढली असून सरासरी १५०० ते २००० क्‍विंटल गहू बाजारात येत आहे. गव्हाचे व्यवहार १८०० ते १८७४ रुपये क्‍विंटलने होत असल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली. 

बाजारात गव्हाला गेल्या आठवड्यात १८५० ते १९५४ रुपये क्‍विंटलचा भाव होता. या आठवड्यात हे दर १८०० ते १८७४ पर्यंत खाली आले आहेत. १००० ते २००० क्‍विंटल अशी आवक कमी जास्त होत असल्याची माहिती देण्यात आली. लुचई तांदळाची आवक सरासरी १०० क्‍विंटलची आहे. २२०० ते २४०० रुपये क्‍विंटलचे दर आहेत. 

हरभरा आवक ८००० क्‍विंटलची आहे. ३६०० ते ३९३० रुपये क्‍विंटलचे दर गेल्या आठवड्यात हरभऱ्याला होते. या आठवड्यात हरभऱ्याचे दर २६०० ते ३९२० रुपये क्‍विंटलवर पोचले. तुरीचे दर गेल्या आठवड्यात तेजीत होते. ४४०० ते ५०६४ रुपये क्‍विंटलने तुरीचे व्यवहार झाले. या आठवड्यात तुरीची आवक १००० क्‍विंटल तर दर ४०० ते ४९८८ रुपये क्‍विंटल झाले. सोयाबीनची आवक ६०० क्‍विंटलची आहे. ३३५० ते ३५५० क्‍विंटलने सोयाबीनचे व्यवहार होत आहेत. बाजारात बटाट्याची नियमित आवक आहे.

गेल्या आठवड्यात सर्वाधिक ९ हजार क्‍विंटलची आवक बटाट्याची झाली. या आठवड्यात ३१०० क्‍विंटलपर्यंत आवक आली. ८०० ते १२०० रुपये क्‍विंटल असा बटाट्याचा दर आहे. लाल कांद्याची आवक १००० क्‍विंटलची आहे. ५०० ते ८०० रुपये दराने गेल्या आठवड्यात कांद्याचे व्यवहार झाले. पांढऱ्या कांद्याची आवक १६०० क्‍विंटलची असून दर ६०० ते ९०० रुपये असे होते. लसूण दर  १००० ते ४००० रुपये क्‍विंटल आणि आवक २०० क्‍विंटलची आहे. 

टोमॅटोची आवक १४० क्‍विंटल आणि दर १००० ते १२०० रुपये आहेत. गवार शेंगांचे व्यवहार २००० ते २५०० रुपयाने झाले. शेंगाची आवक १३२ क्‍विंटल आहे. हिरवी मिरचीचे व्यवहार २३०० ते २७०० रुपये क्‍विंटलने झाले. मिरचीची आवकदेखील १२१ क्‍विंटल होती. बाजारात कारलीदेखील नियमित येत असून २८०० ते ३२०० रुपये क्‍विंटल असा दर आहे. आवक सरासरी १६४ क्‍विंटलची आहे. 

गाजराचे दर ५०० ते ७०० रुपये क्‍विंटल आणि आवक १८० क्‍विंटल आहे. फणस १३० क्‍विंटल आवक आणि दर १५०० ते २००० रुपये असे आहेत. पालक ५०० ते ७०० रुपये क्‍विंटल आणि आवक १९० क्‍विंटल. मेथी १००० ते १२०० रुपये क्‍विंटल आणि आवक १३५ क्‍विंटल होती. लिंबू ९० क्‍विंटल आवक आणि दर ४००० ते ४५०० रुपये असे आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com