agriculture news in marathi, When action take effects of climate change ask Desarda | Agrowon

हवामान बदलाचे परिणाम केव्हा लक्षात घेणार : प्रा. एच. एम देसरडा
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 14 डिसेंबर 2017

औरंगाबाद : हवामान बदलाचे ढळढळीत वास्तव व विनाशकारी परिणाम देशातील कृषी वैज्ञानिक, सामाजिक शास्त्रज्ञ, राज्यकर्त्यांना केव्हा कळेल, हा प्रश्‍नच आहे. सिंचन, ऊर्जा, वाहतुकींच्या महाकाय प्रकल्पांचे धोके आपण केव्हा मान्य करणार, यातील कंत्राटदारांची भ्रष्ट साखळी थांबविण्याची हिंमत दाखविणार का, असा सवाल ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ तथा राज्य नियोजन मंडळाचे माजी सदस्य प्रा. एच. एम. देसरडा यांनी मंगळवारी (ता. १२) औरंगाबादेत झालेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित केला.  

औरंगाबाद : हवामान बदलाचे ढळढळीत वास्तव व विनाशकारी परिणाम देशातील कृषी वैज्ञानिक, सामाजिक शास्त्रज्ञ, राज्यकर्त्यांना केव्हा कळेल, हा प्रश्‍नच आहे. सिंचन, ऊर्जा, वाहतुकींच्या महाकाय प्रकल्पांचे धोके आपण केव्हा मान्य करणार, यातील कंत्राटदारांची भ्रष्ट साखळी थांबविण्याची हिंमत दाखविणार का, असा सवाल ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ तथा राज्य नियोजन मंडळाचे माजी सदस्य प्रा. एच. एम. देसरडा यांनी मंगळवारी (ता. १२) औरंगाबादेत झालेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित केला.  

प्रा. देसरडा म्हणाले, गुरुवारपासून (ता. १४) औरंगाबादेत हवामान बदलाचे कृषी व संलग्न इतर क्षेत्रावर होणाऱ्या परिणामावर विचारमंथन होण्यासाठी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांसह देशांतर्गत तज्ज्ञांचे चर्चासत्र होते आहे. हे चर्चासत्र केवळ सोपस्कार व समारंभाच्या गर्तेत राहू नये, अशी अपेक्षा आहे.

‘शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या बीटी अर्थात जीएम कपाशी बियाणे कंपन्यांवर, तसेच कीटकनाशकांमुळे झालेल्या मृत्यूस जबाबदार असलेल्या कंपन्यांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचे धाडस सरकारने दाखवावे, बियाणे, कीटकनाशकांचा पुरवठा करणाऱ्या बड्या कंपन्या, कृषी विद्यापीठांतील शास्त्रज्ञ, कृषी आयुक्‍तालय, उच्चपदस्थ अधिकाऱ्यांवर कारवाई करायला हवी, असेही ते म्हणाले.

हरितक्रांती अपयशी ठरली ही खेदाची बाब आहे. आजी राज्यकर्ते राज्यातील शेतकऱ्यांच्या आयुष्याची राखरांगोळी करीत भ्रष्ट राजकारण करीत आहेत. त्याचा अनुभव विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आला असल्याचा आरोपही प्रा. देसरडा यांनी केला. वसुंधरा बचाव, मानव बचाव, शेती-शेतकरी बचाव करणारी पर्यायी शेती व औद्योगिक विकास प्रणाली स्वीकारली तरच वैश्‍विक हवामान बदल रोखता येईल, अशा सूचनाही प्रा. देसरडा यांनी केल्या.

इतर ताज्या घडामोडी
कृषी सल्ला : ऊस, कापूस, उन्हाळी भुईमूग...हवामान अंदाज - शुक्रवार - शनिवारी (ता. २६ - २७)...
द्राक्ष बागेचे वाढत्या तापमानातील...नव्या आणि जुन्या द्राक्ष बागांचा विचार केला असता...
ऑस्ट्रेलियातील सुपरमार्केटची दुष्काळाशी...ऑस्ट्रेलियातील एका सुपर मार्केटने दुष्काळाशी...
गोदावरीत प्रदूषण केल्यास होणार कारवाईनाशिक : नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी...
सोलापुरात टंचाई निवारणाचा भार...सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचा ग्रामीण भाग...
खानदेशात पपईला उन्हासह पाणीटंचाईचा फटकानंदुरबार : खानदेशात या हंगामात पपई लागवड कमी...
जळगावात पांढऱ्या कांद्याच्या आवकेत घटजळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सांगली बाजारसमितीत हळद, गुळाची उलाढाल ...सांगली ः व्यापाऱ्यांना सेवाकराच्या नोटिसा...
नगर जिल्ह्यात छावण्यांवर दर दिवसाला...नगर  : नगर जिल्ह्यामध्ये दुष्काळात पशुधन...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई होतेय तीव्रसातारा ः जिल्ह्यात दिवसेंदिवस पाणीटंचाई तीव्र होत...
पुणे जिल्ह्यासाठी २६ हजार ५७३ क्विंटल...पुणे  ः खरीप हंगाम सुरू होण्यास एक ते दीड...
तंटामुक्‍त गाव अभियानाला चंद्रपुरात...चंद्रपूर : शांततेतून समृद्धीकडे जाण्याचा...
अमरावतीत तुर चुकाऱ्यासाठी हवे ८७ कोटी;... अमरावती : चुकाऱ्यांसाठी यंदा शेतकऱ्यांना...
शेतीच्या दृष्टीने सरकारचा कारभार...नाशिक : अगोदरचा कालखंड व ही पाच वर्षे यात...
अमरावतीतून ९१ विहिरी अधिग्रहणाचे...अमरावती  ः सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे...
शिल्लक एफआरपी मिळत नसल्याने साताऱ्यातील...सातारा  : अजिंक्यतारा कारखान्याचा अपवाद...
कांदा दर वाढले, तेव्हा भाजपने विरोध...नाशिक   ः कृषिमंत्री असताना मी...
'मतदान झालेल्या दुष्काळी भागात ...मुंबई  ः लोकसभेच्या मतदानाच्या तीन...
उच्चांकी मतदानामुळे कोल्हापूर मतदारसंघ...कोल्हापूर  : राज्याच्या तुलनेत कोल्हापूर...
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...