द्राक्ष उत्पादकांची फसवणूक थांबणार कधी?

व्यवहारात घाई न करता व्यापाऱ्याची अधिकृत माहिती मिळाल्यानंतर सौदा करावा. यासाठी द्राक्ष बागायतदार संघाने जनजागृती केली आहे. उत्पादकाने खबरदारी घेऊन व्यवहाराच्या नोंदी ठेवाव्यात व फसवणूक टाळावी. - रवींद्र बोराडे, विभागीय अध्यक्ष, नाशिक - महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ
द्राक्ष उत्पादकांची फसवणूक थांबणार कधी?
द्राक्ष उत्पादकांची फसवणूक थांबणार कधी?

नाशिक: नाशिक जिल्ह्यातील मुख्य अर्थकारण द्राक्षशेतीवर अवलंबून आहे. या चालू हंगामात द्राक्ष खरेदीमध्ये दलाल व व्यापाऱ्यांकडून द्राक्षबागायतदारांच्या फसवणुकीचे प्रकार समोर येत आहेत.  सय्यद पिंपरी येथील बागायतदारांकडून दिल्ली येथील व्यापारी खोटी कागदपत्रे बनवून माल खरेदी करत होता. अर्जुन शर्मा नाव असल्याचे तो सांगत असे, मात्र व्यवहार झाल्यानंतर तो पळून गेला आहे. पोलिसांनी केलेल्या तपासणीत त्यांचे नाव समीर सिद्दिकी असल्याचे समजते. मुख्यत्वे नाशिक, सांगली व सोलापूर पट्ट्यात हे व्यापारी बनावट कागदपत्रे व खोटे नाव धारण करून शेतकऱ्यांची फसवणूक करीत असल्याचे समोर आले आहे. पोलिस यंत्रणेच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून याबाबत चौकशी सुरू आहे. या प्रकारात नाशिक तालुक्यातील सय्यद पिंपरी येथील दीपक ढिकले यांची ३ लाख २१ हजार रुपयांची फसवणूक झाली. यासह अन्य दोन शेतकऱ्यांची ५ व २ लाखांची फसवणूक झाली आहे. यासह निफाड तालुक्यात नांदूर खुर्द, पालखेड, कुंभारी, वावी या गावांमध्ये २८ द्राक्ष उत्पादकांचे पैसे बुडवून व्यापारी फरार झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून खासकरून फळबागायतदारांची व्यापाऱ्यांकडून फसवणूक सुरूच आहे. त्याचेप्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकदा भावनिक करून तसेच खोटे चेक देऊन वेळ मारून नेली जाते. त्यामुळे खूप कमी गुन्ह्याची नोंद केली जाते. नोंद केलेल्या गुन्ह्यांपैकी उलगडा किंवा न्याय मिळण्याचे प्रमाण बोटावर मोजण्याइतके आहे. शेतीप्रधान राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक शासनपातळीवरून बघ्याच्या भूमिकेतून पाहिली जात असल्याचा संताप शेतकऱ्यांमध्ये वाढत आहे. पोलिस यंत्रणा, पणन व संबंधित विभाग यांनी यावर यंत्रणा उभी करणे अपेक्षित आहे. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी यावर आवाज उठविण्याची अपेक्षा द्राक्ष उत्पादक करत आहेत. प्रतिनिधी

पणनसारख्या यंत्रणांच्या माध्यमातन शिवारखरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांची आधारलिंकने आॉनलाइन नोंदणी करावी. ज्यामुळे शेतकऱ्यांना मोबदला अॉनलाइन केल्यामुळे सदर व्यापारी अधिकृत आहे किंवा नाही पाहता येईल. या बाबत कडक कायदा होणे तातडीची गरज आहे. - योगेश रायते, द्राक्ष उत्पादक, खडक माळेगाव, ता. निफाड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com