agriculture news in marathi, when get crop policy money? | Agrowon

पीकविम्याची रक्कम कधी मिळणार?
टीम अॅग्रोवन
बुधवार, 6 जून 2018

सांगली ः गतवर्षी पंतप्रधान हवामानावर आधारित पीकविमा योजनेची नुकसानभरपाई तीन महिन्यांपासून मिळालेली नाही. एक लाख सोळा हजार ५२४ शेतकऱ्यांनी ३ कोटी ३९ लाख ९४ हजारांचा हप्ता भरला होता. त्यापैकी किती शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळणार, याबाबतही विमा कंपनीकडून माहिती जिल्हा बॅंकेला देण्यात आलेली नाही. खरिपाच्या तोंडावर भरपाई मिळाली नसल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली. पीकविमा कधी मिळणार, असा सवाल शेतकरी करीत आहेत.

सांगली ः गतवर्षी पंतप्रधान हवामानावर आधारित पीकविमा योजनेची नुकसानभरपाई तीन महिन्यांपासून मिळालेली नाही. एक लाख सोळा हजार ५२४ शेतकऱ्यांनी ३ कोटी ३९ लाख ९४ हजारांचा हप्ता भरला होता. त्यापैकी किती शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळणार, याबाबतही विमा कंपनीकडून माहिती जिल्हा बॅंकेला देण्यात आलेली नाही. खरिपाच्या तोंडावर भरपाई मिळाली नसल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली. पीकविमा कधी मिळणार, असा सवाल शेतकरी करीत आहेत.

जिल्ह्यात १ लाख १६ हजार ५२४ शेतकऱ्यांनी ‘प्रधानमंत्री पीक विमा‘ योजनेंतर्गत सन २०१७ च्या खरीप पिकाचा विमा उतरविला आहे. ७० हजार ६७२ हेक्‍टर क्षेत्रावरील पीकविमा संरक्षित केलेले आहे. विमासंरक्षित रक्कम २९० कोटी ७० लाख रुपयांपर्यंत निर्धारित केलेली होती; पण प्रत्यक्षात सहभागी झालेले शेतकरी व उतरविलेला विमा पाहता, विमासंरक्षित रक्कम १६९ कोटी ९६ लाख रुपये आहे. विमा योजनेत सहभागी शेतकऱ्यांमध्ये जत, तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. दरम्यान, भरपाईच्या रकमेकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. खरीप २०१८ च्या खर्चासाठी ही रक्कम शेतकऱ्यांना उपयोगी पडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम ७ जूनपूर्वी देण्यात यावी, अशा सूचना विमा कंपन्यांना केल्या आहेत. मात्र, विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाईसाठी पात्र शेतकऱ्यांची यादीही बॅंकेला पाठवलेली नाही. त्यामुळे वेळेत भरपाई मिळणार का, याबाबत संभ्रम आहे.

शासन हिस्सा २९.४४ कोटी; शेतकरी हिस्सा ३.३९ कोटी
विमा हप्त्यापोटी शासन व शेतकरी हिश्‍श्‍याची रक्कम ३२ कोटी ८४ लाख १५ हजार ६१४ रुपये आहे. यामध्ये केंद्र शासन हिस्सा १४ कोटी ७२ लाख १० हजार ७४२ रुपये व राज्य शासन हिस्सा १४ कोटी ७२ लाख १० हजार ७४२ रुपये आहे. शेतकऱ्यांनी भरलेल्या विमा हप्त्याची रक्कम ३ कोटी ३९ लाख ९४ हजार १२५ रुपये आहे. विमा हप्त्याची रक्कम विमा कंपनीला भरलेली आहे.

इतर ताज्या घडामोडी
समुद्राच्या उधाणामुळे पीक नुकसान ...मुंबई  : समुद्र किनाऱ्यावरील शेतीचे तसेच...
‘मग्रारोहयो’त २८ नव्या कामांचा समावेशनागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
पुणे जिल्ह्यात तीन लाख जमीन...पुणे   ः जमिनीतील विविध घटकांची माहिती...
पुणे जिल्हा परिषदेत दर रविवारी ‘...पुणे  : स्वयंसहायता समूहाच्या (बचत गट)...
गोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून...कोपरगाव, जि. नगर ः शंभर वर्षांहुन अधिक आयुर्मांन...
सातारा जिल्ह्यात रब्बीत अवघे नऊ टक्के...सातारा  ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे...
महालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे  ग्रामीण...मुंबई   ः ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या...
सहकारमंत्र्यांनी राजीनामा द्यावा :...सोलापूर  ः उसाची एकरकमी एफआरपी देण्यात साखर...
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...